Current Affairs | चालू घडामोडी | 07 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 07 SEPT 2024

अनुक्रमणिका

1) 7 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 7 सप्टेंबर 1791 = नरवीर उमाजी नाईक यांची जयंती

  • उमाजी व अमृता नाईक यांनी 1824 मध्ये भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला व रामोशी बंडांचे नेतृत्व केले

2) ख्रिस्तियानो रोनाल्डो चे ऐतिहासिक 900 गोल

  • क्रोएशिया विरूध्द पोर्तुगाल कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने 900 वा गोल करून इतिहास रचला.
  • अशी कामगिरी करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला. रोनाल्डोने 900 तर मेस्सीने 838 गोल केले आहेत.
  • रोनाल्डोने कारकिर्दीची सुरुवात 2002 मध्ये केली होती.

3) पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सहावे सुवर्ण

  • उंच उडीत प्रवीणकुमारची कामगिरी

4) हरविंदर, प्रीती समारोप सोहळ्यासाठी ध्वजवाहक

  • पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी सुवर्णपदक विजेता तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक असतील.
  • पॅरालिम्पिकच्या एकाच स्पर्धेत दोन पदके मिळविणारी प्रीती पहिली महिला धावपटू ठरली आहे.
  • त्याचबरोबर हरविंदर तिरंदाजीत सुवर्णपदक मिळविणारा पहिला तिरंदाज ठरला आहे. टोक्योत तो कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता

5) यागी चक्रीवादळ चीनच्या हैयान प्रांतात

  • चीन मधील शरद ऋतूतील सर्वांत मोठे चक्रीवादळ

6) राजस्थान रॉयल्स च्या मुख्य प्रशिक्षपदी राहील द्रविड यांची निवड

7) कुस्तीपटू विनेश फोगट, बंजरंग पूनिया यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

8) राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू.

  • पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित केला आहे.
  • जगातील सर्वांत मोठा प्रकल्प
  • मुख्यमंत्री सौर कृषी ऊर्जा योजना २.० अंतर्गत राज्यात ९ हजार २०० मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यांपैकी ३ मेगावॉट क्षमतेचा पहिला प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात झाला.

9) आयकर भरण्यात अभिनेता शाहरुख खान अव्वलस्थानी

  • सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी
    1. शाहरुख खान – 92 कोटी
    2. विजय थालापती – 80 कोटी
    3. सलमान खान – 75 कोटी
    4. अमिताभ बच्चन – 71 कोटी
  • सर्वाधिक कर भरणारे क्रिकेटर
    1.  विराट कोहली – 66 कोटी
    2.  महेंद्रसिगं धोनी – 38 कोटी
    3.  सचिन तेंडुलकर – 28 कोटी
    4.  सौरव गांगुली – 23 कोटी
    5.   हार्दिक पंड्या – 13 कोटी

10) FDI मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

  • भारतातील एकूण गुंतवणुकीच्या FDI मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे
  • गेल्या दोन वर्षांपासून एफडीआय मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
  • पहिले 3 राज्य :
    1. महाराष्ट्र
    2. कर्नाटक
    3. दिल्ली

11) मुख्यमंत्री योजनादूत

  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे.
  • त्या अंतर्गत राज्यात 50 हजार योजना दुतांची निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
  • मुख्यमंत्री योजनादूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील

12) हिमाचल प्रदेशात मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्ष

  • हिमाचल प्रदेश विधानसभेने महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे विधेयक मंजूर केले.
  • बालविवाह प्रतिबंध (हिमाचल प्रदेश सुधारणा) विधेयक, 2024 आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
  • या विधेयकाने बालविवाह प्रतिबंध (पीसीएम) कायद्यात सुधारणा केली, जी संसदेने 2006 मध्ये मंजूर केली.

13) सापांमुळे बीड जिल्ह्यातील सुकळी गावाचे विशेष पुनर्वसन

  • बीड जिल्ह्यातील गुणवंती पाटबंधारे प्रकल्पातील सुकळी गावाचे (धारुर तालुका) खास बाब म्हणून इतरत्र पुनर्वसन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • धरणाच्या खाली असलेले हे गाव बुडीत क्षेत्रात येत नाही पण धरणाच्या पाण्याचा या गावात वर्षभर ओलावा राहात असल्याने या गावात सातत्याने साप आणि इतर सरपटणारे प्राणी आढळून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते.
  • या पुनर्वसनासाठी ११ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. १५ हजार ४२० चौरस मीटर क्षेत्रावरील घरे रिकामी होणार असून ही जमीन पाटबंधारे महामंडळास वर्ग करण्यात येणार आहे.
  • सरपटणाऱ्या प्राण्याच्या त्रासापासून ग्रामस्थांना मुक्ती मिळावी यासाठी खास बाब म्हणून पुनर्वसन करण्यात येणारे हे राज्यातील पहिले गाव आहे.

14) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषात सुधारणा

  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाख रुपयांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.
  • इनवेल बोअरिंगसाठी आता ४० हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मीटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
  • शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment