Current Affairs | चालू घडामोडी | 16 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 16 JULY 2025

1) 16 जुलै दिनविशेष

1.1) 1909 = अरुणा असफअलींची जयंती

  • दिल्लीच्या प्रथम महापौर
  • 1942 = गोवलिया टँक सभेत ध्वजारोहन त्यांनी उषा मेहतांसोबत केले
  • भूमिगत रेडिओ स्टेशन (१९४२)
  • भारतरत्न – १९९७

1.2) २०२०: महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांचे निधन (जन्म: ५ फेब्रुवारी १९४८)

2) INS कवरत्ती येथून “एक्सटेंडेड रेंज अँटी-सबमरीन रॉकेट (ERASR)” ची यशस्वी चाचणी

  • ERASR हे पूर्णपणे स्वदेशी अँटी-सबमरीन रॉकेट आहे
  • विकसित – DRDO ने (ARDE पुणे, HEMRL आणि NSTL विशाखापट्टणम यांच्या मदतीने)
  • एकूण 17 रॉकेटची चाचण्या घेण्यात आल्या.
  • चाचण्या – 23 जून 2025 ते 7 जुलै 2024 दरम्यान घेण्यात आल्या
  • ERASR ची रेंज 8.5 ते 8.9 किलोमीटरपर्यंत आहे
  • ERASR मध्ये दोन मोटर प्रणाली

3) पहिली हस्तलिखित वारशावरील जागतिक परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे.

  • Global Conference on Manuscript Heritage
  • दिनांक – 11 ते 13 सप्टेंबर
  • ठिकाण – भारत मंडपम , नवी दिल्ली
  • आयोजन – भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र
  • थीम – हस्तलिखित वारशातून भारताच्या ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणे
  • 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संसदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या सन्मानार्थ हे संमेलन आयोजित
  • भारत आणि परदेशातील 75 प्रतिष्ठित विद्वान, विचारवंत आणि 500+ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

4) राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून राज्यसभेसाठी चार मान्यवरांची नियुक्ती

  • भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a)(3) अंतर्गत राष्ट्रपतींकडे कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रात विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तींना राज्यसभेत नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.
  • नवीन नामनिर्देशित सदस्य (2025):
  • हर्षवर्धन श्रृंगला – माजी परराष्ट्र सचिव
    • परराष्ट्र सेवा १९८४ बॅचचे अधिकारी
    • बांगलादेशातील भारताचे राजदूत, नंतर अमेरिकेत भारताचे राजदूत
    • भारताच्या परराष्ट्र धोरणात निर्णायक भूमिका
  • उज्ज्वल निकम – विशेष सरकारी वकील
    • २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट अशा अनेक प्रकरणांत महत्त्वपूर्ण भूमिका
    • अफजल गुरू, अजमल कसाब यांच्याविरोधात यशस्वी युक्तिवाद
  • सी. सदानंदन मास्टर – केरळमधील भाजप नेते व सामाजिक कार्यकर्ते
    • केरळमधील अनुसूचित जाती-जमातींसाठी शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणांवर काम
    • RSS व BJP मध्ये दीर्घकालीन योगदान
  • डॉ. मीनाक्षी जैन – इतिहासकार व लेखिका
    • DU मधील राजकीय शास्त्र विभागातील माजी प्राध्यापक

5) ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजादेवी यांचे निधन

  • कन्नड चित्रपटांची पहिली महिला सुपरस्टार आणि तमिळ चित्रपटांची अभिनय सरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बी. सरोजादेवी (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
  • बंगळुरूमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • तमिळमध्ये त्यांना ‘कन्नडात पेंगिली’ (कन्नड पोपट) म्हणत.
  • १९५५ मध्ये ‘महाकवी कालिदास’ (कन्नड) या चित्रपटातून पदार्पण; पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार.
  • MGR सोबत ‘नदोदी मन्नन’ (१९५८) पासून तमिळ चित्रपटांत मोठा प्रवास – ४८ चित्रपट एकत्र!
  • हिंदीतील प्रसिद्ध चित्रपट:
    • पैगाम (१९५९) – दिलीपकुमार
    • ससुराल (१९६१) – राजेंद्रकुमार
    • प्यार किया तो डरना क्या (१९६३) – शम्मीकपूर
    • बेटी बेटे (१९६४) – सुनील दत्त
    • अंतिम चित्रपट: आधवन (२००९)
  • महत्वाचे सन्मान:
    • पद्मश्री – 1969
    • पद्मभूषण – 1992
    • राष्ट्रीय जीवनगौरव – 2008
    • कलैममाणी पुरस्कार – 2009
  • त्यांच्या निधनाने दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

6) भारताचा अंतराळात ऐतिहासिक झेंडा – शुभांशू शुक्ला यांची परतफेर!

  • अ‍क्सिओम-४ मोहिमेअंतर्गत शुभांशू शुक्ला हे १५ जुलै आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून यशस्वीपणे पृथ्वीवर परतले. त्यांनी अमेरिकेच्या सॅन दिएगो किनाऱ्यावर स्प्लॅशडाउन लॅन्डिंग केली.
  • राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय म्हणून शुक्ला यांचे नाव इतिहासात कोरले गेले आहे.
  • शुक्ला हे १८ दिवस अवकाशात राहून ‘ड्रॅगन’ स्पेस कॅप्स्यूलद्वारे पृथ्वीवर उतरले. त्यांच्यासोबत मिशन लीडर पेगी व्हाइटसन (अमेरिका), स्लावोझ उइनान्स्की (पोलंड) आणि टिबर कापू (हंगेरी) होते.
  • शुक्ला यांच्यामुळे भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला गाठले, हे भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी मोठं पाऊल ठरले आहे.
  • या मोहिमेवर इस्रोने ५५० कोटी रुपये खर्च केले असून, ती इस्रो, नासा, स्पेसएक्स आणि अ‍क्सिओम स्पेस यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवली गेली.
  • २०२७ मध्ये गगनयान मोहिमेची तयारी सुरू असून, भारतीय हवाई दलातील चार अंतराळवीरांची निवड झाली आहे – शुक्ला हे त्यातीलच एक.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment