Current Affairs | चालू घडामोडी | 14 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 14 सप्टेंबर दिनविशेष
1.1) राष्ट्रीय हिंदी दिवस
- 14 सप्टेंबर 1949 = संविधान सभेकडून हिंदी चा अधिकृत भाषा म्हणून स्वीकार
2) अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं
- केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम असे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली.
- आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे.
- चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्यापर्यंत सर्व गोष्टींचे हे बेट साक्षीदार आहे.
3) चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
- ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि लेखिका अरुणा वासुदेव यांचे गुरुवारी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे नवी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.
- ‘आशियाई सिनेमाची जननी’ अशी अरुणा यांची ओळख होती.
- गेल्या काही दिवसांपासून अरुणा वासुदेव या आजारी होत्या. अल्झायमर आणि वृद्धापकाळाशी संबंधीत आजारांमुळे त्या त्रस्त होत्या.
4) चार विशाल प्रकल्पांना मान्यता
- एक लाख १७ हजार २२० कोटींची गुंतवणूक
- मान्यता मिळालेले प्रकल्प
- पुणे :- ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया’चा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प •
- छत्रपती संभाजीनगर: ‘टोयोटा- किर्लोस्कर मोटर कंपनी’चा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प
- अमरावती: ‘रेमंड लक्झरी कॉटन्स’चा वस्त्रोद्योग प्रकल्प
- पनवेल :- ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ व ‘अदानी समूहा’चा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प
5) जागतिक सहकार परीषद नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदाच भारतात आयोजन.
- जागतिक स्तरावर सहकारी चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या (आयसीए) 130 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, तिच्या आमसभेचे आणि जागतिक सहकार परिषदेचे आयोजन भारतात होत आहे.
- ‘इफ्को’ च्या पुढाकाराने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होत आहे.
- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षपद भूषवतील.
6) जेष्ठ नागरिकांनाही आता महामंडळ
- सामाजिक न्याय विभागाकडून शिक्कामोर्तब.
7) राजेश नार्वेकर मंत्रालय माहिती तंत्रज्ञानाचे संचालक.
8) राज्य शिक्षण मंडळ शाळांत आता सीबीएसई अभ्यास पॅटर्न.
- दीपक केसरकर:- पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी
- विशेष काय ?
- तिसरी ते बारावपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित
- अकरावी, बारावी साठी मराठी विषय अनिवार्य
- व्यावसायिक शिक्षणासह परदेशी भाषाही शिकवणार
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel