चालू घडामोडी : 17 SEPT 2023

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

1) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला 75 वर्ष पूर्ण.

  • 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाचे राज्य संपुष्टात येऊन हैदराबाद व परिणामी ‘मराठवाडा’ भारतात विलीन झाला. या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाले. यंदाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
  • त्यावेळी मराठवाड्यात 5 च जिल्हे होते. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद (धाराशीव).
  • हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी भारतातर्फे त्यावेळच्या गृहमंत्र्यानी म्हणजेच लोहपुरुष सरदार ‘वल्लभभाई पटेल’ यांनी पोलिस कारवाई करताना ‘ऑपरेशन पोलो’ राबवण्यात आले होते. त्यावेळी खऱ्या अर्थाने निजामाच्या गुलामगिरीतून हैदराबाद संस्थानाची मुक्तता झाली होती.

2) P. M. विश्वकर्मा योजना आजपासून प्रारंभ.

  • देशातील विविध 18 प्रकारचे कारागीर व त्यांच्या छोट्या उद्योगांना आर्थिक बळ देण्याची योजना.
  • 15 ऑगस्ट 2023 रोजी याची घोषणा केली गेली होती.

3) स्वच्छ् महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत ‘स्वच्छ्ता हीच सेवा’ अभियानाचा शुभारंभ.

  • अभियान कालावधी = 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023

4) आदि शंकराचार्य यांच्या 108 फुट उंचीचा पुतळा मध्य प्रदेशातील ‘खांडवा’ येथे उभारला.

  • शिल्पकार = भगवान रामपुरे (सोलापूर)

5) रशियाच्या ‘किंझल’ क्षेपणास्त्राची किम जोंग कडून पाहणी.

6) ‘यशोभूमी’ Convention and Expo Center, द्वारका ,नवी दिल्ली चे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

  • आशियातील सर्वात मोठे हे सेंटर असून याचे नाव ‘यशोभूमी’ ठेवण्यात आले.
  • 17 सप्टेंबर रोजी याचे उद्घाटन.

7) ‘अप्रूव्हल रेटिंग’ नुसार नरेंद्र मोदी यांचे लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत अव्वल स्थान कायम.

Leave a Comment