चालू घडामोडी : 19 SEPT 2023

1) महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

  • लोकसभेमध्ये आणि राज्यांतील विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाच्या विधेयकाला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • 2010 मध्ये UPA सरकारने हे विधेयक त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत मंजूर केले होते. परंतु त्यावेळी लोकसभेत हे मांडण्यात आले नाही.
  • राज्यसभेत मंजूर झाल्याने हे विधेयक संसदेत कायम राहणार असून आता ते लोकसभेत मांडले जाईल.
  • महिला आरक्षण लागू झाल्यास – लोकसभा 543 जागांपैकी 181 जागा महिलांच्या असतील तर महाराष्ट्र विधानसभेत 288 जागांपैकी 96 जागा महिलांच्या असतील.
  • याअगोदर देवेगौडा सरकार, वाजपेयी सरकार यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही.
  • सध्या लोकसभेत 78 महिला खासदार असून हे प्रमाण लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. राज्यसभेत तर फक्त 14% प्रमाण आहे.
  • महाराष्ट्रासह अनेक राज्यांत महिला आमदारांचे प्रमाण 10% पेक्षा कमी आहे.
  • सध्या स्थानिक स्वराज संस्थामध्ये 33% आरक्षण लागू आहे. हा निर्णय राजीव गांधी सरकारने घेतला होता.

2) आजपासून (19 सप्टेंबर 2023) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसदेमध्ये कामकाज चालणार.

  • जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या लोकशाहीचे मंदिर म्हणजे संसद भवन. सध्याची संसद भवनाची इमारत 100 वर्ष जुनी असल्याने याच इमारती जवळ संसद भवनाची नवी इमारत बनवण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 28 मे 2023 रोजी याचे उद्घाटन झाले.
  • 18 सप्टेंबरपासूनच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या मंगल दिवशी संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.
  • नवीन संसदेत आसन क्षमता
    • राज्यसभा = 384 (अगोदर 245)
    • लोकसभा = 888 (अगोदर 545)
  • नवीन संसद भवन टाटा समूहाच्या ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’ या भारतीय कंपनीने बांधले आहे.
  • या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद = बिमल पटेल (बिमल पटेलांना 2019 मध्ये स्थापत्यशास्त्रासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.)

3) ‘अमृता शेरगिल’ यांनी रेखाटलेल्या तैलचित्राला 61.8 कोटी इतके विक्रमी मूल्य मिळाले.

  • अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला ‘सॅफ्रॉनआर्ट’ च्या लिलावामध्ये 61.8 कोटी रुपये मिळाले.
  • शेरगिल यांनी 1938 मध्ये हे चित्र रेखाटले आहे.
  • या चित्राला मिळालेली ही किंमत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कलाकृतीला जगभरात मिळालेली सर्वोच किंमत आहे.

4) भाजप व AIDMK यांची युती संपुष्टात.

5) ‘होयसळ मंदिरांना’ जागतिक वारसा स्थळात स्थान.

  • कर्नाटकातील बेलूर, हळेबीड आणि सोमनाथपुरा येथील प्रसिद्ध होयसळकालीन मंदिरांना ‘यूनेस्कोने’ वारसास्थळ म्हणून घोषित केले.
  • भारतातील हे 42 वे वारसास्थळ असून कर्नाटकातील चौथे वारसास्थळ आहे.
  • या मंदिराची स्थापना 12 व्या शतकातील आहे.

Leave a Comment