चालू घडामोडी : 18 SEPT 2023

1) PM विश्वकर्मा योजनेस प्रारंभ – (17 सप्टेंबर 2023)

 • उद्देश = कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक पाठबळ देणे व स्थानिक उत्पादने कला आणी हस्तकलेच्या माध्यमातून परंपरा, संस्कृति आणि वारसा जिवंत ठेवणे.
 • 18 पारंपरिक कलाकुसरींचा समावेश.

2) Department of Science & Technology च्या सचिवपदी ‘अभय करंदीकर’.

 • IIT कानपूरचे संचालक आणि दूरसंचारतज्ञ ‘अभय करंदीकर’ यांची ‘Dept. of S & T (DST) च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
 • DST च्या स्थापनेपासून दुसऱ्यांदा मराठी शास्त्रज्ञाची या पदावर निवड झाली आहे.
  • पहिले मराठी शास्त्रज्ञ = डॉ. वसंत गोवारीकर (1986-1991)
 • करंदीकर यांच्या अगोदर डॉ. राजेश गोखले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता व त्याआधी डॉ. S. चंद्रशेखर यांच्याकडे ही जबाबदारी होती.
 • अभय करंदीकर यांच्याबद्दल
  • दूरसंचारतज्ञ म्हणून ओळख
  • जन्म = ग्वाल्हेरचा ; शिक्षण = IIT कानपूर मधून इलेक्ट्रिकल इंजीनियर
  • 5-G तंत्रज्ञान लागू करण्यासाठीच्या सल्लागार समितीत होते.
  • केंद्राच्या ‘भारतनेट’ प्रकल्पाचे सल्लागार

3) महाराष्ट्रात ‘नमो 11’ कार्यक्रम राबवणार.

 • नमो 11 = नरेंद्र मोदींच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त

3.1 – 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ.

3.2 – 73 हजार गावे आत्मनिर्भर करणार.

3.3 – 73 हजार शेततळ्यांची निर्मिती.

3.4 – प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी.

3.5 – स्मार्ट शाळांची उभारणी.

3.6 – दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणी.

3.7 – क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी.

3.8 – 73 शहरांत सौंदर्यीकरण प्रकल्प.

3.9 – 73 धार्मिक स्थळांची सुधारणा.

3.10 – 73 हजार बांधकाम कामगरांना सुरक्षा मंच.

3.11 – गरीब आणि मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगीण विकास.

4) ‘शांतिनिकेतन’ आता जागतिक वारसा स्थळ.

 • जगप्रसिद्ध कवी रविंद्रनाथ टागोर यांनी ज्या ठिकाणी ‘विश्व भारती’ विद्यापीठाची स्थापना केली ते ठिकाण म्हणजे ‘शांतिनिकेतन’ आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आलेले आहे.
 • स्थापना = 1901 ( ‘विश्व भारती’ विद्यापीठाची स्थापना = 1921 )
 • ठिकाण = प. बंगालमधील विरभूम जिल्ह्यात.
 • शांतिनिकेतन हे भारतातील 41 वे तर पश्चिम बंगालमधील 3 रे जागतिक वारसा स्थळ असेल.
 • जागतिक वारसा स्थळांची घोषणा ‘यूनेस्को’ मार्फत केली जाते.

5) भारताने क्रिकेटमधील ‘आशिया चषक’ जिंकला.

 • भारताने अंतिम फेरीत ‘श्रीलंकेला’ नमवत आशिया चषकावर आपले नाव कोरले.
 • भारताने 8 व्यंदा हा चषक जिंकला. (श्रीलंका 6 वेळा)

6) डायमंड लीग स्पर्धेत ‘नीरज चोप्रा’ ला रौप्यपदक. ( 2022 = सुवर्णपदक )

7) डेव्हिस कपमध्ये भारताचा मोरोक्कोवर विजय. (रोहन बोपण्णाचा हा डेव्हिस चषकतील अंतिम सामना होता).

Leave a Comment