चालू घडामोडी : 21 SEPT 2023

1) ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक लोकसभेत मंजूर

  • 128 वे घटनादुरुस्ती विधेयक ‘नारीशक्ती वंदन’ हे लोकसभेत प्रचंड बहुमताने मंजूर झाले. यावर 8 तास चर्चा झाली.
  • या विधेयकासाठी दोन्ही सभागृहात 2/3rd चे बहुमत हवे होते कारण हे घटना दुरुस्ती विधेयक आहे.
  • विधेयकाच्या बाजूने 454 मते तर विरोधात केवळ 2 मते पडली. MIM च्या दोन्ही खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
  • आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. तेथे जर संमत झाले तर मग राष्ट्रपतीच्या सही नंतर कायदा अस्तित्वात येणार.
  • परंतु कायदा अस्तित्वात आल्यानंतर लगेच हे लागू होणार नाही. यासाठी अद्याप दीर्घ घटनात्मक प्रक्रिया बाकी आहेत.

2) भारत – कॅनडा वादाचे आंतरराष्ट्रीय पडसाद.

  • अमेरिका व ऑस्ट्रेलिया कडून भारताला तपासात सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • ‘खलिस्तान टायगर फोर्सचा’ नेता ‘हरदीपसिंग निज्जर’ हत्येच्या मुद्द्यावरून दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडात राहणाऱ्या व कॅनडाला भेट देणाऱ्या भारतीयांसाठी काळजी घेण्याच्या आवाहन एका सूचनेद्वारे करण्यात आले.
  • कॅनडातील पंजाबी गायक ‘शुभनीत सिंगचा’ भारत दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.

3) ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम’ नुसार महाराष्ट्रातील १९ शहरे प्रदूषित.

  • 2017 मध्ये ‘राष्ट्रीय स्वच्छ वायु’ कार्यक्रम ची सुरुवात.
  • महाराष्ट्रातील 19 शहरात ‘PM10’ ची मात्रा अधिक आहे.
  • हवेतील विविध आकाराचे प्रदूषक घटक (घन व द्रव सूक्ष्म कण) यांचे मिश्रण होऊन ‘पार्टीक्युलेट मॅटर’ (PM) तयार होतात.

4) शासकीय शाळांसाठी ‘दत्तक योजना’

  • राज्यात गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या प्रसारासाठी ‘शाळा दत्तक योजना’ सुरू होणार.
  • केवळ शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही योजना असेल.

5) ‘मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान’

  • राज्यातील मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान 2 ऑक्टोंबर पासून वर्षभर राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
  • राज्यातील किमान एक कोटी महिलांना बचत किंवा शक्ती गटाच्या माध्यमातून जीवनात येणार असून दहा लाख महिलांना तांत्रिक व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाईल.
  • नवीन लघु उद्योगांसाठी व उद्योग वाढीसाठी सहाय्य आणि आवश्यक मदतही पुरवली जाईल.
  • जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6) प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ‘जो बायडन’ यांना निमंत्रण.

Leave a Comment