Skip to content1) कॅनडाच्या नागरिकांना व्हिसाबंदी.
- कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दुतावासांना ‘सुरक्षाविषयक धोका’ असल्याने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित केले आहे.
- तसेच भारताने कॅनडाला त्यांच्या दुतवासामधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेशही दिले आहेत.
2) महिला आरक्षण राज्यसभेतही मंजूर.
- 128 वी घटनादुरुस्ती असल्याने नियमानुसार झालेल्या मत विभागणीमध्ये विधेयकाच्या बाजूने 215 तर विरोधात एकही मत पडले नाही.
- हे विधेयक अगोदरच लोकसभेत संमत झालेले असल्याने आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी नंतर महिलांच्या आरक्षणाचा कायदा अस्तित्वात येईल.
3) ‘मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान मोहिमेला’ स्थगिती.
- 24 तासा अगोदरच मोहिमेची घोषणा झाली होती . त्यानंतर लगेच प्रशासकीय कारण देऊन स्थगिती दिली गेली.
4) मध्य प्रदेशातील ‘खांडवा’ येथे आदी शंकराचार्यांच्या १०८ फुटी पुतळ्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते अनावरण.
- या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ असे नाव देण्यात आले आहे.