चालू घडामोडी : 23 SEPT 2023

1) JDS व भाजपची युती.

  •  भाजपा व जनता दल सेक्युलर (JDS) यांनी आगामी निवडणुकांसाठी युती केली.
  •  जेडीएस (JDS) अधिकृतपणे एनडीए (NDA – नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) मध्ये सामील.
  • जेडीएस चे नेते व माजी मुख्यमंत्री H.D. कुमार स्वामी यांनी ही घोषणा केली.

2) 21व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात. चीनचा भारतीय खेळाडूंना अटकाव

  •  स्पर्धा हांगजाऊ चीन येथे होत आहेत.
  • 2022 ची ही स्पर्धा कोरोनामुळे 2023 मध्ये होत आहे.
  • भारतातील अरुणाचल प्रदेश मधील 3 खेळाडूंना चीनने प्रवेश नाकारला. त्यांच्या मतानुसार अरुणाचल हा चीनचा भूभाग आहे.
  • भारताकडून  चीनच्या या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे. भारतीय क्रीडा मंत्र्यांनी (अनुराग ठाकूर) चीन दौराही रद्द केला.

3)  सिंगापूर येथे पहिली ‘आयुर्वेद आरोग्य परिषद’ होणार.

4) 54वा व्याघ्र प्रकल्प म्हणून मध्य प्रदेशातील ‘सागर’ येथील ‘विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला’ मान्यता.

5) समूह शाळा.

  •  राज्यातील 14000 शाळा बंद करून त्यांना एकत्र करून समूह शाळा निर्माण करण्यात येणार.
  •  यामुळे ‘गाव तिथे शाळा’ ही संकल्पनाच हद्दपार होणार.

6) QUAD (युएस, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान) च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कमध्ये झाली.

7) I2U2 (India, Israel, USA, UAE) यांनी नवीन संयुक्त अवकाश उपक्रमाची घोषणा केली.

8) भारतीय क्रिकेट संघ आता कसोटी, एकदिवसीय व T20 या तिन्ही प्रकारच्या क्रमवारीत जगात ‘पहिल्या’ स्थानावर.

  • तिन्ही प्रकारात एकाच वेळी अव्वल स्थान पटकावणारा भारत हा दुसराच देश. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका या देशाने ही कामगिरी केली होती.

Leave a Comment