चालू घडामोडी : 5 SEPT 2023

* शिक्षक दिन *

1) NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा.

  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा.
  • यामुळे आता NCERT ला पदवी ते पीएचडी पर्यंतचे अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होणार आहे तसेच स्वत:चा अभ्यासक्रमही तयार करता येईल.
  • विद्यापीठाच्या व्यतिरिक्त शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणाऱ्या शिक्षण संस्थाना UGC च्या सल्ल्यानुसार अभिमत विद्यापीठाचा दर्जा देता येऊ शकतो.

NCERT बद्दल ?

  • स्थापना – 1 सप्टेंबर 1961
  • HQ – दिल्ली
  • कार्य – प्राथमिक शिक्षणसाठीची Nodal Agency तसेच शिक्षक शिक्षण, प्रौढ शिक्षण, संशोधनात महत्वपूर्ण योगदान.

2) इस्रो मोहिमांच्या उलटगणतील आवाज देणाऱ्या ‘N. वलरमथी’ यांचे निधन.

  • चंद्रयान 3 ठरली अखेरची उलटगणती.

3) G-20 परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘क्षीजिनपींग’ व रशियाचे अध्यक्ष ‘व्लादिमिर पुतीन’ यांची अनुपस्थिती.

4) चंद्रयान मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हर व ‘विक्रम’ लँडर निद्रावस्थेत.

  • परतीची चाचपानी करताना 40 सेंटीमिटर ची उडी मारून पुन्हा एकदा सॉफ्ट लॅंडींग केली.
  • भविष्यातील चंद्रावरील माती, खडक, याचे नमुने आणण्यासाठी किंवा मानवी मोहिमांसाठी चंद्राच्या पृष्ठभागावरून पुन्हा उड्डाण करण्याच्या दिशेने हा प्रयोग करण्यात आला.

5) लिगो इंडिया

  • ‘हिंगोली’ येथे गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची स्थापना होणार आहे.
  • 2030 पर्यन्त स्थापण्याचे उद्दिष्ट.
  • गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील ‘हँडफोर्ड’ लिव्हिंगस्टन अशा जगातील दोन प्रयोगशाळेनंतरची ही तिसरी प्रयोगशाळा.
  • गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणारे इतर देश = अमेरिका, इटली, जपान.

6) ‘पापलेट’ आता राज्यमासा

  • राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटिवार यांची माहिती.
  • पापलेटचे दुसरे नाव ‘सीलव्हर पोम्फ्रेट’.

7) 5 सप्टेंबर= शिक्षक दिन.

  • सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती.
  • ते भारताचे दुसरे राष्ट्रपति तर पहिले उपराष्ट्रपती.
  • जन्म = तामिळनाडू

Leave a Comment