चालू घडामोडी : 6 SEPT 2023

1) G 20 च्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ नावाचा उल्लेख.

  • राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख.
    • संविधानात काय आहे ?
  • Article 1 नुसार इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे म्हणजेच ‘इंडिया’ व ‘भारत’ हे दोन्ही शब्द वापरण्यात आले आहेत.
  • ‘इंडिया’ शब्द वगळायचा असल्यास आर्टिकल 368 नुसार घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल.

2) धन्वंतरी स्वास्थ्य योजना

  • शिक्षक दिनी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 1235 शिक्षकांना या योजनेची भेट दिली.
    • योजनेविषयी
  • सुरुवात= 1 सप्टेंबर 2015
  • पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सुरुवात.
  • महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी योजना.

3) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

  • महाराष्ट्रातील 5 व्यक्तीना
  1. मृणाल गांजाळे
  2. केशव सांगळे
  3. डॉ. राघवन बी. सुनोज
  4. स्वाती देशमुख
  5. डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील

4) आफ्रिकी देशांची पहिली हवामान परिषद ‘केनिया’ मध्ये.

5) 43 वी आसियाम परिषद 2023 इंडोनेशियातील ‘जकार्ता’ येथे पार पडली.

6) राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी= (सातारा)

7) ‘ईशानी बेंदळे’ (पुणे) “Champion of British Society for Nanomedicine”बनलेली पहिली आयुर्वेदिक डॉक्टर.

Leave a Comment