चालू घडामोडी : 7 SEPT 2023

1) ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘मालिनी राजुरकर’यांचे निधन.

  • ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘मालिनी राजुरकर’ यांचे 82 व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले.
  • त्यांचे ‘ख्याल आणी टप्पा’ या गायन प्रकारांवर विशेष प्रभुत्व होते.
  • त्यांचा जन्म 1941 साली ‘अजमेर’ येथे झाला.
  • त्यांनी ‘गणित’ विषयात पदवी संपादन करून अध्यापनही केले होते.
  • वैद्यकीय अभ्यासासाठी त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता.

2) G 20 परिषद ‘भारत मंडपम’ येथे होणार.

  • दिल्ली मध्ये या भवणाची विशेष निर्मिती करण्यात आली आहे.
  • ‘भारत मंडपम’ बाहेर ‘नटराजाची’ मूर्ती उभारण्यात आली आहे.
  • तमिळनाडूमधील ‘स्वामी मलाई’ येथील प्रख्यात शिल्पकार ‘राधाकृष्णन स्थापती’ यांनी ही घडवली आहे.
  • 9 व 10 सप्टेंबर रोजी G 20 ही 18 वी परिषद नवी दिल्ली येथे होणार असून भारतात पहिल्यांदाच नियोजित आहे.
    • motto = ‘वसुधैव कुटुंबकम’
    • 17 वी परिषद 2022 =बाली (इंडोनेशिया)
    • 18 वी परिषद 2023 = दिल्ली (भारत)
    • 19 वी परिषद 2024 = ब्राझील
  • G 20 विषयी
  • स्थापना = 1999
  • सदस्य = 19 देश व ‘युरोपियन संघ’ असे 20 सदस्य.

3) ‘गिरिप्रेमी’ च्या महिला गिर्यारोहकांकडून ‘सुदर्शन’ शिखर सर.

  • गिर्यारोहक प्रमुख, गिर्यारोहक =स्मिता कारीवडेकर. इतर = पूर्वा शिंदे, पद्मजा धन्वी, स्नेहा गुडे, स्नेहा तळवटकर, सीमा पै. मार्गदर्शक = उमेश झिरपे
  • सुदर्शन शिखर = गढवाल हिमालयात स्थित आहे.
  • ऊंची = 6529 मीटर
  • अशी कामगिरी करणारा देशातील पहिलाच संघ.

4) संकटग्रस्त मुलांसाठी ‘बाल आधार’ दूरध्वनी सेवा सुरू.

5) मराठवाड्यातील ‘मराठा’ समाज कुणबी आहे हे दर्शवण्यासाठी निजामकाळातील नोंदीनुसार दाखले देण्यात येणार.

  • यासाठी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिति स्थापन.

6) ‘अरुणकुमार सिन्हा’ यांचे निधन.

  • ते ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) चे संचालक होते.
  • 1987 च्या केरळ केडरचे अधिकारी होते.
  • SPG स्थापना = 1985 मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात झाली होती.

7) महाराष्ट्रात ’17 सप्टेंबर – 31 डिसेंबर’ = ‘आयुषमान भव’ मोहीम.

8) 2023 चा ऑगस्ट ठरला आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना.

  • जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले.
  • या अगोदर ‘जुलै 2023’ म्हणजे मागचाच महिना सर्वात उष्ण ठरला होता.
  • उत्तर गोलार्धातील सर्वात उष्ण उन्हाळा देखील 2023 च ठरला आहे.

9) भारत ठरला ‘पोर्टेबल हॉस्पिटल’ बनविणारा जगातील पहिलं देश.

  • पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे 8 मिनिटात कुठेही उभे राहणारे हॉस्पिटल ‘भीष्म’ प्रकल्पांतर्गत तयार केले गेले.
  • या हॉस्पिटलला ‘आरोग्य मैत्री’ असे नाव देण्यात येणार आहे.

Leave a Comment