चालू घडामोडी : 13 SEPT 2023

1) ‘समुद्रयान’

  • यशस्वी चंद्रयान मोहिमेनंतर भारत ‘समुद्रयान’ मोहिमेची तयारी करत आहे.
  • या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशी बनावटीच्या पाणबुडीतून 3 संशोधकाना समुद्रात 6000 मी. खोल पाठवले जाणार आहे.
  • यातून समुद्रातील मौल्यवान धातू आणी कोबाल्ट, निकेल आणी मॅंगनीज यासारख्या खनिजांचा शोध घेतला जाणार आहे.
  • या मोहिमेसाठी ‘मत्स्य 6000’ नावाची पाणबुडी समुद्रात पाठवली जाणार आहे. याची निर्मिती ‘National Institute of Ocean Technology’ यांच्यामार्फत केली जाणार आहे.
  • ‘Deep Ocean Mission’ या 4077 कोटी खर्चाच्या मोहिमेअंतर्गत ‘समुद्रयान’ प्रकल्पाचे काम होत आहे.

2) आयुष्मान भव: अभियानाचा शुभारंभ

  • 13 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 हा कालावधी
  • अभियानाचे प्रमुख घटक

2.1 आयुष्मान आपल्या घरी

2.2 रक्तदान, अवयवदान मोहीम

2.3 आयुष्मान सभा

2.4 आयुष्मान मेळावा

2.5 अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी

2.6 18 वर्ष वरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम.

3) रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला ओलांडला.

  • हे यश गाठणारा रोहित भारताचा सहावा तर 15 वा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला आहे.

4) ज्येष्ठ अभिनेते ‘बिरबल’ यांचे निधन.

  • मूळ नाव = सत्येंद्र कुमार खोसला
  • जन्म = पंजाब
  • जवळपास 500 सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.

Leave a Comment