Current Affairs | चालू घडामोडी | 26 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 26 JULY 2024

अनुक्रमणिका

1) 26 जुलै दिनविशेष

1.1) कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद = 26 जुलै 1902

  • शाहू महाराजांनी संस्थानात मागासवर्गीयांना 50 टक्के नोकरी राखीव ठेवण्याचा आदेश दिला

1.2) कारगिल विजय दिवस = 26 जुलै 1999

2) कारगिल युध्दात शहीद झालेल्या व विजयी तिरंगा ध्वज शत्रूच्या छाताडात रोवणाऱ्या शूर वीरांना कारगिल रौप्य विजयी महोत्सवी प्रसंगी विनम्र अभिवादन

  • 25 वा कारगिल विजय दिवस
    • कारगिल विजय दिवस : 26 जुलै
    • कारगिल युद्ध वर्ष  : 1999
    • कारगिल युद्ध सुरुवात : 3 मे 1999
    • कारगिल युद्ध समाप्ती : 26 जुलै 1999
    • पाकिस्तानने दिलेले नाव :ऑपरेशन बद्र
    • भारताने दिलेले नाव : ऑपरेशन विजय
  • परमवीर चक्र विजेते
    • १)रायफलमन संजय कुमार
    • २)ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव
    • ३)लेफ्टनंट मनोज कुमार पांडे
    • ४) कॅप्टन विक्रम बत्रा

3) ‘लाडक्या बहिणीं’ना मोफत गॅस सिलिंडर : ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेची व्याप्ती वाढविली

  • उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असून त्याचा फायदा किमान दोन कोटी महिलांना होणार आहे.
  • महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करताना नारी शक्तीला खूश करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ या दोन महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली होती.

4) दरबार हॉल आता ‘गणतंत्र मंडप’, तर अशोक हॉल ‘अशोक मंडप’

  • राष्ट्रपती भवनातील महत्त्वाच्या सभागृहांचे नामांतर

5) आजपासून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात

  • उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियमऐवजी सीन नदीच्या पात्रात; खेळाडूंचे संचलन बोटीवरउद्घाटन सोहळ्याबाबत
  • भारताचे ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची निवड
  • सहभाग : 205 देशांच्या खेळाडूंचा सहभाग
  • एकूण 117 खेळाडूंच्या भारतीय ऑलिंपिक चमू मध्ये महाराष्ट्राच्या 5 शिलेदारांचा समावेश आहे.

6) चीन अन् पाकचे हवाई हल्ले हवेतच नष्ट करणार; कोणत्याही प्रकारचे हवाई लक्ष्य करण्यास सक्षम

  • लडाखमध्ये ‘समर’ क्षेपणास्त्र तैनात
  • समर-2 अधिक घातक आणि जड
    • 2982 किमी तास याने गाठते लक्ष्य
    • 13.4 फूट लांब
    • 30.4 इंचाचे पंख
    • 253 किलो वजन
    • 9.1 इंच त्याचा व्यास
    • 39 किलो वजनाचे वॉरहेड पंखात बसवणे शक्य
  • समर-1 कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र
    • त्याच्या लाँचरवर दोन क्षेपणास्त्रे बसवण्याची तरतूद आहे.
    • या क्षेपणास्त्राची क्षमता 12 ते 40 किमी आहे.
    • समर एअर डिफेन्स सिस्टिममध्ये दोन प्रकारची क्षेपणास्त्रे वापरली जातात.
    • SAMAR 1 बदलानंतर ते आता जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र बनले आहे.
    • त्याचे वजन 105 किलो, लांबी 9.7 फूट, व्यास 6.5 इंच आणि 7.4 किलो वजनाचे वारहेड आहे.

7) प्रख्यात पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि अग्रगण्य सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने निधन झाले. 

  • पद्मश्री पुरस्कार: 2019 मध्ये त्यांच्या सेंद्रिय शेतीमधील अपवादात्मक कार्यासाठी प्रदान करण्यात आला.
  • इतर पुरस्कार: 2002 मध्ये ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड’ आणि 2004 मध्ये ओडिशा सरकारचा बेस्ट फार्मर अवॉर्ड मिळाला.
  • योगदान: सेंद्रिय शेतीला चालना दिली, तांदळाच्या विविध 100 वाणांची लागवड केली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment