राजर्षी शाहू महाराज | Rajarshi Shahu Maharaj

जन्म

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोल्हापूर मधील कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यात 26 जून 1874 रोजी झाला. छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवत जयसिंगराव घाटगे होते. ते अवघ्या 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे निधन झाले. शाहू महाराज यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते पुढे त्यांनीच त्यांचा सांभाळ केला. या नंतर चौथे शिवाजी महाराज यांच्या महाराणी आनंदीबाई साहेब यांनी यशवंतरावांना 17 मार्च 1884 साली दत्तक घेतले व त्यांचे नाव ‘शाहू छत्रपती’ असे ठेवले. दत्तक समारंभ मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या नागरिकांकडून आणि पुण्याच्या सार्वजनिक सभेमार्फतही नवीन छत्रपतींना मानपत्रे अर्पण करण्यात आली.

शिक्षण

राजर्षी शाहू महाराजांचा दत्तक समारंभ झाल्या नंतर श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व श्री. हरीपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते व मुख्य म्हणून मि.फिटझिराल्ड हे होते. महाराजांना 1885 साली राजकोट येथील राजकुमार कॉलेज मध्ये पाठवण्यात आले. तेथील प्रिन्सिपल मॅकनॉटन साहेबांच्या देखरेखेखाली सन 1889 मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. यानंतर सन 1890 ते 1894 पर्यंत महाराजांचे शिक्षण सर एस.एम. फ्रेजर या गार्डीयनच्या देखरेखेखाली झाले. इंग्रजी भाषा, राज्यकारभार, जगाचा इतिहास वगेरे सर्व विषयांचे महाराजांनी अत्यंत सखोल असे अध्यनन केले. अशा प्रकारे धारवाड येथे अत्यंत अभ्यासू वृत्तीने व चिकाटीने महाराजांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

महाराजांचा धारवाड येथे शिक्षण चालू असताने त्यांच्या आयुष्यात घडलेली आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा विवाह. 1 एप्रिल 1891 साली श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. लक्ष्मीबाईसाहेब ह्या 11 वर्षाच्या होत्या. बडोद्याचे मे. गुनाजीराव खानविलकर यांच्या त्या कन्या होत्या.

2 एप्रिल 1894 रोजी महाराजांचा राजयभिषेक करण्यात आला. वयाच्या 20 व्या वर्षी संस्थानांची अधिकार सूत्रे महाराजांच्या हाती आली. या वेळेपासूनच महाराजांच्या कर्तबगारीला खरी धार चढत गेली.

छत्रपती शाहू महाराज

राजयभिषेक झाल्यानंतरचा काळ

त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. संस्थानातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत दिले. त्यांनी जाती प्रथेला विरोध केला. 1894 मध्ये वेठबिगारी बंद केली. 1899 मध्ये शाहू महाराजांच्या जीवनास कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले. शाहू महाराज यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोत्मक मंत्र म्हणत असल्याचे महाराजांच्या लक्षात आले. या बाबत महाराजांनी विचरणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले. येथूनच खऱ्या अर्थाने ब्राहमणेत्तर चळवळीला सुरुवात झाली. अप्पासाहेब राजोपाध्ये (छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करण्यासाठी 30,000 वार्षिक वेतनावर ठेवलेले) यांनी देखील भटजींची बाजू घेतली. यानंतर 1902 मध्ये अप्पासाहेब राजोपाध्ये यांचे हक्क काढून घेतले व त्याच्या जागी तात्याराव जोशी यांची निवड करण्यात आली. 1896 साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी ‘राजाराम’हे वस्तीगृह सुरू केले. 1901 मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली परंतु या बोर्डिंग मध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्याने त्यांनी निरनिराळ्या जातीतील लोकांसाठी वस्तीगृहे सुरू केली. 26 जुलै 1902 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी 50 टक्के जागा आरक्षित ठेवल्या. 1911 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर संस्थानात उभारली. परशराम घोसरवडकर यांच्या अध्यक्षतेखाली या सभेची स्थापना करण्यात आली. भास्करराव जाधव हे या संस्थेचे अध्यक्ष होते.अण्णासाहेब लठ्ठे हे उपाध्यक्ष होते तर हरिभाऊ चव्हाण ये कार्यवाहक होते. 1913 साली सत्यशोधक समाजाची शाळा स्थापन केली व त्याची संपूर्ण जबाबदारी विसाजी ढोणे यांच्यावर सोपवली. 1919 सत्यशोधक समाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच सभेत कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली.
शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून 1917 मध्ये त्यांनी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव मांडला. मुलींना ही सक्ती लागू नव्हती. 7 ते 14 या वयातील मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक. तसे न केल्यास 1 रुपया प्रत्येक महिन्यात दंड.असा नियम त्यांनी लागू केला. 1918 मध्ये चिखली ( पेटा करवीर ) येथे पहिली शाळा चालू केली. 1918 साली त्यांनी आर्य समाज शाखेची स्थापना केली. डी टी मालक हे व्यवस्थापक होते. शाहू महाराजांवर आर्य समाजाचा सर्वाधिक प्रभाव होता. 1917 साली डॉ कुर्तकोटी यांची करवीर पिठावर शंकराचार्य म्हणून नियुक्ती.1918 मध्ये त्यांनी कुलकर्णी वतने नष्ट केली. हे न पटल्याने डॉ कुर्तकोटी यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. यानंतर आत्मशास्त्री चित्रे हे करवीर पिठाचे शंकराचार्य.1920 मध्ये महाराजांनी क्षात्रजगतगुरु पिठाची निर्मिती केली परंतु हा निर्णय वि रा शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील यांना आवडला नाही. 1920 मध्ये ब्राम्हणेतर पुरोहित तयार करण्यासाठी कोल्हापुरात ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल’ ची स्थापना केली. 1920 साली पाटगाव धर्मपिठावर ‘सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर’ यांची नियुक्ती केली.

राजर्षी शाहू महाराजांनी अंमलात आणलेले कायदे

राजर्षी शाहू महाराजांनी 1901 मध्ये गोवध बंदी कायदा अंमलात आणला. 1912 मध्ये शाहू महाराजांनी सहकारी संस्था चा कायदा अंमलात आणला. हा कायदा भारतातील सहकारी संस्थांच्या क्षेत्रातील ऐतिहासिक कायदा होता. सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी आणि कामकाजासाठी कायदेशीर चौकट प्रदान करणे आहे,हे या कायद्याचे उद्दिष्ट होते.
छत्रपती शाहू महाराजांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या आत्याचाराबद्दल कायदा निर्मिती केली. 1917 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा आणला. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत महिलांच्या हक्क आणि कल्याणाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला चालना दिली, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि महिलांवरील भेदभाव करणाऱ्या प्रथा रद्द करण्यासाठी काम केले.1919 मध्ये “महिलांवरील क्रूरता कायदा” नावाचा विशिष्ट कायदा अंमलात आणला. घटस्फोट कायद्यांशी संबंधित उपक्रमांना किंवा स्त्रियांना लाभ देणाऱ्या सुधारणांचे त्यांनी समर्थन केले व 1920 मध्ये घटस्फोटाचा नवीन कायदा अंमलात आणला.

राजर्षी शाहू महाराजांनी भरवलेल्या परिषदा

खामगाव मराठा परिषद ही भारतातील महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाचे शासक राजर्षी शाहू महाराज यांच्या संरक्षणाखाली 1917 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण संस्था होती. 1917 मध्ये खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्ष स्वतः छत्रपती शाहू महाराज हे होते. 1918 मध्ये स्थापन झालेली पीपल्स युनियन असेंब्ली ही कोल्हापूर, महाराष्ट्र, भारतातील छत्रपती शाहू महाराज यांच्या आश्रयाखाली असलेली आणखी एक संस्था होती.पीपल्स युनियन असेंब्ली याचे अध्यक्षपद छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे होते. 1919 मध्ये कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी कुर्मी क्षत्रिय समाजाशी संबंधित व्यक्तीला “राजर्षी” ही पदवी बहाल केली.1920 मध्ये माणगाव येथे आयोजित दक्षिण महाराष्ट्र दलित परिषद हा कोल्हापूर, महाराष्ट्र, भारताचे राज्यकर्ते छत्रपती शाहू महाराज यांनी पाठिंबा दिलेला आणखी एक उपक्रम होता. या कार्यक्रमाचा उद्देश या भागातील दलित समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि उन्नती करणे हे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे या परिषदेचे अध्यक्ष होते. 1920 साली नागपूर मध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष स्वत: शाहू महाराज होते व स्वागताध्यक्ष बाबू कालीचरन नंदागवळी हे होते. या परिषदेचे सचिव गणेश गवई आणि किसन फगोजी होते. 1922 मध्ये दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद आयोजित केली.

1907 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली, ज्याला एका ब्रिटिश महिलेच्या सन्मानार्थ “मिस क्लार्क” असे नाव देण्यात आले. 1918 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी “महार वतने बंद” आंदोलन सुरू केले. अस्पृश्यांना सूर्यवंशी संबोधण्याच्या सूचना तर त्यांच्यातील पहिलवानांना ‘जाट पहिलवान’ म्हणत. गंगाराम कांबळे यास हॉटेल टाकून दिले व त्याचे नाव सत्यसुधारक हॉटेल असे ठेवले. कोल्हापूर नगरपालिकेचे अध्यक्ष दत्तोबा पवार या दलितास दिले.

राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक कार्य

1895 मध्ये स्थापन झालेली शाहूपुरी गुळाची व्यापारीपेठ, भारतातील महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाचे शासक, छत्रपती शाहू महाराज यांनी हाती घेतलेल्या अग्रगण्य आर्थिक उपक्रमांपैकी एक होती. शाहूपुरी गुळाची व्यापरपेठ, ज्याचे इंग्रजीत भाषांतर “शुगरकेन ट्रेडर्स मार्केट” असे केले जात होते , हे विशेषत: ऊस आणि संबंधित उत्पादनांचा व्यापार सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले बाजारपेठ होते. 1906 मध्ये शाहू महाराजांनी शाहू छत्रपती स्पिनिंग मिल स्थापन केले. औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी या मिलची स्थापना करण्यात आली. 907 मध्ये स्थापन झालेली सहकारी तत्ववर्धक कापड गिरणी, ही सहकारी उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कापड उद्योगाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. भोगावती नदी धरण बांधण्याची योजना, छत्रपती शाहू महाराजांनी 1907 मध्ये सुरू केली, हा एक महत्त्वाचा आर्थिक प्रकल्प होता, ज्याचा उद्देश सिंचन, जलविद्युत निर्मितीसाठी जलस्रोतांच्या संभाव्यतेचा उपयोग करणे आणि कोल्हापूर, महाराष्ट्रातील एकूण सामाजिक-आर्थिक विकासासाठी होते.1908 मधे याचे नाव ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराजांनी लिहलले ग्रंथ

सिद्धांत विजय” हा छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलेला एक उल्लेखनीय ग्रंथ आहे. शाहू महाराजांनी अनेक ब्राह्मनेत्तर वृत्तपत्रांना मदत केली. जशे की जागरूक, मूकनायक, विजयी मराठा, शिवछत्रपती, हंटर, प्रबोधन, जागृती, इ.

राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू

6 मे 1922 रोजी पन्हाळा लॉज, मुंबई येथे राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment