Interim Budget 2024 | अंतरिम अर्थसंकल्प 2024
1) अंतरिम बजेट 2024 = आयकरामधे कसलाही बदल नाही
- नवीन कर प्रणाली
- 0 ते 3 लाख = Nil
- 3 ते 6 लाख = 5%
- 6 ते 9 लाख = 10%
- 9 ते 12 लाख = 15%
- 12 ते 15 लाख = 20%
- 15 लाखावर = 30%
2) अंतरिम बजेट 2024: सर्वाधिक महसूल संरक्षण मंत्रालयाला
- संरक्षण मंत्रालय
- रस्ते वाहतुक मंत्रालय
- रेल्वे मंत्रालय
3) अंतरिम बजेट 2024 = महसुलाचे वितरण
- सर्वात जास्त येणे –
- कर्जे आणि इतर दायित्व – 28%
आयकर – 19%
वस्तू आणि सेवा कर (GST) – 18%
कॉर्पोरेशन कर – 17%
- कर्जे आणि इतर दायित्व – 28%
- सर्वात जास्त खर्च –
- व्याज – 20%
राज्यांचा वाटा – 20%
केंद्र सरकारच्या योजना – 16%
- व्याज – 20%
4) अंतरिम बजेट 2024: सरकारचे आज 1 फेब्रुवारी अंतरिम बजेट सादर केले. याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 5 वेळा अर्थसंकल्पीय भाषण केले त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा कालावधी.
- कालावधी
- 2019 – 20 = 140 मिनिटे
- 2020 – 21= 160 मिनिटे
- 2021 – 22 = 100 मिनिटे
- 2022 – 23 = 91 मिनिटे
- 2023 – 24 = 87 मिनिटे
- 2024 – 25 = 56 मिनिटे
5) अंतरिम बजेट 2024: Key Points
- विकासदर १०.५
- आगामी आर्थिक वर्षामध्ये नाममात्र विकासदर १०.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याला अनुसरून यंदाच्या आर्थिक वर्षात नाममात्र सकल राष्ट्रीय उत्पन्न २ कोटी ९७ लाख ७१ हजार ८०८ कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे.
- मध्यमवर्गासाठी घरे घेण्यासाठी नवी योजना सादर होणार
- राज्यातील रेल्वेला १५,५५४ कोटी
- तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर देखील मंजूर केले असून त्यामुळे ४० हजार किमीचे नवे रेल्वे मार्ग तयार होतील.
- वित्तीय तूट
- २०२३-२४ साठी सुधारित वित्तीय तूट ५.८ टक्के असेल तर,
- २०२४-२५ मध्ये ही तूट ५.१ टक्के असेल असा अंदाज आहे.
6) अंतरिम बजेट 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना राज्यातील 7 शहरांत
- छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नांदेड, नाशिक, पुणे या शहरांत
- या योजनेचा शुभारंभ = 22 जानेवारी 2024 (रामलल्ला स्थापनेच्या दिवशी)
- या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे
- या योजनेमुळे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा मोफत ३०० युनिटपर्यंत वीज मिळू शकेल, तसेच वर्षाला १८ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकेल.
- भारताने २०३०पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्राोतांपासून ५०० गिगावॅट ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच २०७०पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनचेही लक्ष्य आहे. त्या दृष्टीने या योजनेचा शुभारंभ केला गेला.
7) अंतरिम बजेट 2024: शालेय शिक्षणाच्या तरतुदीत वाढ. मात्र ‘यूजीसी’च्या तरतुदीत ६० टक्क्यांहून अधिक कपात
8) अंतरिम बजेट 2024: ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट तीन कोटींवर
- सरकारने ‘लखपती दीदी’ बनवण्याचे लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘लखपती दीदी’ योजनेचे उद्दिष्ट बचत गटांमध्ये महिलांना प्रशिक्षण देणे आहे. जेणेकरून त्यांना वर्षाला किमान १ लाखाचे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल.
- नऊ कोटी महिलांचा समावेश असलेले ८३ लाख स्वयं-सहायता गट सक्षमीकरण आणि स्वावलंबनाने बदलत ग्रामीण सामाजिक-आर्थिक स्थितीत बदल घडवत आहेत.
9) अंतरिम बजेट 2024: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण
- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणास सरकार प्रोत्साहन देईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
- मिशन इंद्रधनुष अंतर्गत, लसीकरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि या संदर्भात प्रयत्नांना गती देण्यासाठी नव्याने तयार केलेल्या ‘यू विन’ व्यासपीठावर देशभरात वेगाने काम सुरू केले जाईल
10) अंतरिम बजेट 2024: तेलबिया, दुधाच्या उत्पादनावर भर
- ‘आत्मनिर्भर खाद्यातेल अभियाना’अंतर्गत देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनाला चालना देऊन भारताला खाद्यातेलामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी एक रणनीती आखली आहे. उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांवर संशोधन, आधुनिक कृषी तंत्रांचा स्वीकार, संलग्न बाजारपेठा प्रस्थापित करणे अशा महत्त्वाच्या पैलूंचा त्यात समावेश आहे.
- दुग्धविकासासाठी एक सर्वंकष उपक्रम तयार केला जाणार आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय गोकूळ मोहीम’, ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ यांसारख्या योजनांचाच वापर केला जाणार आहे.
11) अंतरिम बजेट 2024 : पी एम गतिशक्ती योजना
- पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत तीन प्रमुख रेल्वे मार्गिका योजना
- ऊर्जा खनिज आणि सिमेंट मार्गिका
- बंदर दळणवळण मार्गिका
- जास्त वर्दळीची मार्गिका
12) अंतरिम बजेट 2024: सरकार ‘मेड इन इंडिया’ नॅनो डीएपी खताचा वापर वाढवणार.
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी वापर करण्याची घोषणा केली.
- पारंपरिक डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी)च्या तुलनेत नॅनो डीएपी खताचे काही प्रमुख फायदे आहेत.
- डीएपी आणि नॅनो डीएपी खतातील फरक
- डीएपी किंवा डाय-अमोनियम फॉस्फेट हे युरियानंतर भारतात सर्वांत जास्त वापरले जाणारे दुसरे खत आहे. त्यात फॉस्फरस (पी) जास्त आहे. झाडे त्यांच्या सामान्य आकारात वाढू शकत नाहीत किंवा परिपक्व होण्यास खूप वेळ घेतात, तेव्हा मुळांच्या स्थापना आणि त्याच्या विकासाला हे खत उत्तेजन देते.
- अमित शहा यांनी गेल्या एप्रिलमध्ये इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह (IFFCO)चे नॅनो डीएपी खत लाँच केले. त्यामध्ये व्हॉल्युमनुसार ८% नायट्रोजन आणि १६% फॉस्फरस आहे.
- पारंपरिक डीएपी खत दाणेदार स्वरूपात येते; तर आयएफएफसीओचे नॅनो डीएपी खत द्रव स्वरूपात येते.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel