चालू घडामोडी : 17 AUG 2023

) PM  विश्वकर्मा योजना

  • देशातील विविध १८ प्रकारचे कारागीर आणि त्यांच्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत देणाऱ्या ‘ PM विश्वकर्मा ‘ योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी.
  • पुढील ५ वर्षासाठी केंद्राकडून १३ हजार कोटींची तरतूद
  • पारंपरिक कारागिरांना एकाच वेळी कमाल २ लाख रुपयांचे कर्ज विनातारण, सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होणार.
  • सुरुवात  १७ सप्टेंबर २०२३ ( विश्वकर्मा जयंती )
  • लाभ – सुतार , धोबी, शिंपी, कुंभार, मोची, गवंडी, लोहार, शिल्पकार, पाथरवट, केशकर्तनकार, बोट निर्माते, मच्छीमार जाळी विणकर, शश्त्रे  हातोडी उत्पादक,कुलूप निर्माते, हार बनविणारे, पारंपरिक खेळणी  उत्पादक.

 

२) सर्वात परवडणारे शहरांच्या यादीत ‘ अहमदाबाद ‘ पहिल्या स्थानावर

  • पुणे, कोलकत्ता २ ऱ्या
  • मालमत्ता क्षेत्रातील नाईट फ्रॅंक संस्थेने अहवाल जारी केला.

३) वंचित शेतकर्यांना कर्जमाफी

  • २०१७ – फडणवीस सरकारने ‘ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ‘ योजने अंतर्गत कर्जमाफी योजना.
  • महाविकास आघाडीने या ऐवजी ‘ महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ‘ लागू

४) चांद्रयान ३ चंद्राच्या अखेरच्या कक्षेत दाखल

  • २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरणार

५) नेयमार आता ‘ अल  हिलाल ‘ संघाकडून खेळणार

  • यापूर्वी’ पॅरिस सेंट जर्मन ‘ संघातर्फे ६ हंगाम खेळला .

Leave a Comment