चालू घडामोडी : 22 AUG 2023

) SC ने सोमवारी, बलात्कारपीडितेस २७ आठवड्यानंतर गर्भपातास परवानगी दिली.
– वैद्यकीय कायद्यानुसार २४ आठवड्यापर्यंत अशी परवानगी दिली जाऊ शकते.

२) BRICS परिषद २०२३ – २२ ते २४ ऑगस्ट
– ठिकाण- जोहान्सबर्ग ( द आफ्रिका )
BRICS विषयी =
– गोल्डमन सॅक्सचे जागितक अर्थशास्त्र संशोधन प्रमुख ‘ टेरेन्स जेम्स ओ ‘निल’ यांनी २००१ मध्ये ‘BRIC’ हि संज्ञा मांडली.
– जिम ओ ‘निल’ यांच्या म्हणण्यानुसार ब्राझील, रशिया , भारत व चीन या चार उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत.
– २००६ मध्ये UN आमसभेच्या निमित्ताने वरील चार देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची अनौपचारिक भेट झाली व ‘ब्रिक’ समूह उदयास आला.
– २००९ मध्ये रशियातील ‘येकातेरिनबर्ग’ या शहरात ‘ब्रिक’ देशांच्या पहिल्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.
– २०१० मध्ये या गटात दक्षिण आफ्रिकेला निमंत्रित करण्यात येऊन हा समूह निव्वळ आर्थिक कल्पना न उरता दशकभरात राजकीय गट म्हणून उभा राहिला

Leave a Comment