चालू घडामोडी : 12 SEPT 2023

1) शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा (2022)

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘शांतिस्वरूप भटनागर’ पुरस्कारांची घोषणा 10 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
  • देशभरातील 12 तरुण शास्त्रज्ञांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये 3 शास्त्रज्ञ महाराष्ट्रातील आहेत.
  • महाराष्ट्रातील 3 शास्त्रज्ञ खालीलप्रमाणे आहेत.

1.1 गणित = डॉ. अपूर्व खरे (IISc, बेंगलूरू)

1.2 रसायनशास्त्र = डॉ. देवव्रत मैत्री (IIT, मुंबई)

1.3 भौतिकशास्त्र = डॉ. वासुदेव दासगुप्ता (TIFR, मुंबई)

  • सन 2022 या वर्षासाठीचे हे पुरस्कार आहेत.
  • एकूण सात विविध क्षेत्रांत हा पुरस्कार दिला गेला आहे.
  • पुरस्काराविषयी
    • ‘Council of Scientific and Industrial Research’ (CSIR) यांच्याकडून दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी भटनागर पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
    • मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तरुण संशोधकांना 1957 पासून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
    • पहिल्यांदा 2022 मध्ये यामध्ये खंड पडला. 2022 चे पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आले.
    • शांतिस्वरूप भटनागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तरुण संशोधकाना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
    • विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधन करणाऱ्या 45 वर्ष वयाच्या आतील संशोधकांची यासाठी निवड होते.
    • 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

2) भारत – सौदी अरेबियामध्ये द्विपक्षीय व्यापार संरक्षण कराराला चालना देण्यासंदर्भात चर्चा झाली.

  • दोन्ही देशांच्या नेत्यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारत – सौदी अरेबिया स्ट्रटेजिक पार्टनरशिप कौन्सिलची’ पहिली बैठक 11 सप्टेंबर रोजी पार पडली.
  • काही गंभीर स्वरूपाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्याच्या उद्देशाने 2019 मध्ये या कौन्सिल ची स्थापना झाली होती.

3) मेरी माटी, मेरा देश

  • महाविद्यालयीन विद्यार्थ्याना 21 सप्टेंबरपर्यंत एक मूठ माती गोल करून हातात माती घेऊन ती अमृत कलशामध्ये टाकतानाचा सेल्फी अपलोड करावा लागणार आहे.
  • एक भारत श्रेष्ठ भारत‘ चे भव्य प्रतीक बनण्यासाठी नवी दिल्लीत ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहेत.
  • योजनेविषयी
    • सुरुवात = 9 ऑगस्ट 2023
    • उद्देश = देशातील शहिद शूरवीरांच्या सन्मानार्थ देशातील लाखों ग्रामपंचायती मध्ये विशेष शिलालेख लावण्यात येणार आहेत.

4) भारताचा पाकिस्तानवर आशिया चषकातील क्रिकेट सामन्यात ऐतिहासिक विजय .

  • पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा हा पाकिस्तान विरुद्ध सर्वात मोठा विजय आहे. 228 धावांनी भारताने विजय मिळवला.

Leave a Comment