Current Affairs | चालू घडामोडी | 03 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 03 FEB 2024

1) 3 फेब्रुवारी

 • पहिली इलेक्ट्रिक ट्रेन = 3 फेब्रुवारी 1925
  • मार्ग = व्ही टी ते कुर्ला
 • बॉम्बे हाय येथील पहिली तेलविहिर खोदली = 3 फेब्रुवारी 1974
  • तेलविहिरीचे नाव = सागर सम्राट
 • उमाजी नाईक यांचा हौतात्म्य दिन = 3 फेब्रुवारी 1834

2) शिक्षक, प्राध्यापकांच्या जागा भरा अन्यथा तरुण खवळले तर प्रलय. संमेलनाध्यक्षांचा सरकारला इशारा; ९७ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन.

 • ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अमळनेर येथे लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. या संमेलनाचे अध्यक्ष = साहित्यिक रवींद्र शोभणे
 • एकीकडे प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत, तर दुसरीकडे आज हजारो उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत म्हातारे झाले आहेत. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात, असा खडा सवालही शोभणे यांनी केला.
 • बेरोजगारीचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असते. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा थेट शब्दात संमेलनाध्यक्ष यांनी सरकारला इशारा दिला.

3) चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ

 • ते झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री आहेत.

4) लखपती दीदी नंतर आता लवकरच ‘ड्रोन दीदी’

●‘लखपती दीदी’ तयार करण्याचे काम ‘उमेद’च्या माध्यमातून स्वयंसाहायता गटांमार्फत केले जात आहे.

●या महिलांना महिला आर्थिक विकास मंडळाकडूनही व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. आता शेतीतील फवारणीसाठी ‘ड्रोन’ प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

●अशा महिलांना ‘ड्रोन दीदी’ म्हटले जात आहे. अद्याप हे काम राज्यात सुरू झालेले नाही.

 • ‘लखपती दीदी’ योजना काय ?
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेले ड्रोन उपलब्ध करून दिले जाणारा असून याद्वारे महिलांना दरमहा एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते
  • देशातील निवडक 15000 बचत (एसएचजी) गटांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • किमान दहावी उत्तीर्ण महिलेला ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल
  • दहा ते बारा गावांचे एक क्लस्टर निर्माण केले जाणार
  • केंद्र सरकारकडून 80 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये बचत गटांना दिले जाणार आहेत.

5) मद्रास आयआयटी ठरलं स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारं पहिलं आयआयटी.

6) उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा सादर.

 • महिला अधिकारांना प्राधान्य, बहुपत्नीत्वासारख्या प्रथांवर बंदी आणि सर्वधर्मीयांसाठी समान विवाह वय इत्यादी शिफारशींचा समावेश असलेला ‘समान नागरी कायद्या’चा मसुदा उत्तराखंड सरकारला सादर करण्यात आला.
 • ‘समान नागरी कायद्या’च्या मसुद्याची संहिता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ज्ञांच्या समितीने तयार केली आहे.
 • आदिवासींना सूट
  • समान नागरी कायद्याला विरोध असलेल्या आदिवासी समुदायांना कायद्यातून सूट देण्याची शिफारस करण्यात आले आहे.
  • उत्तराखंडच्या लोकसंख्येत २.९ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे.
  • जौनसारी, भोटिया, थारू, राजी आणि बुक्सा या जमातींचा त्यांत प्रामुख्याने समावेश होतो.

7) संविधानभान
संविधान सभेचे सर्वसमावेशक नेतृत्व

 • संविधान सभेतील सदस्य ब्रिटिश भारतातील आणि भारतीय संस्थानांमधील होते. ब्रिटिश भारतातील सदस्य निवडून आले होते, तर संस्थानातील नामनिर्देशित (नॉमिनेटेड) होते.
 • सुरुवातीला संविधान सभेत निवडून आलेले २९६ सदस्य होते. फाळणीनंतर त्यांची संख्या झाली २२९.
 • काँग्रेसचे १९२ सदस्य संविधान सभेत महत्त्वाची भूमिका बजावत होते. जॉन मथाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. आर. जयकर यांसारखे स्वतंत्र उमेदवार काँग्रेस पक्षात नव्हते मात्र काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले.
 • महिलांसाठी राखीव जागा नव्हत्या मात्र हंसा मेहता, सरोजिनी नायडू, अम्मा स्वामीनाथन यांसारख्या १५ महिलांचा संविधान सभेत प्रवेश होऊ शकला.
 • फाळणीनंतर मुस्लीम लीगचे २९ सदस्य भारतात राहिले. त्यापैकी एक सय्यद मोहम्मद सादुल्ला हे तर पुढे मसुदा समितीचे सदस्यही झाले.
 • अकाली दलाचे उज्जल सिंग हे पूर्व पंजाबमधील होते.
 • संविधान सभेतील नेतृत्वाला तीन गटांत विभागले आहे-
  1. काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्व: नेहरू, पटेल, प्रसाद आणि आझाद यांच्यानंतर के. एम. मुन्शी, जे. बी. कृपलानी आणि सी. राजगोपालचारी अशी दुसरी नेतृत्वाची फळी होती.
  2. काँग्रेसबाहेरचे नेतृत्व- अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व संविधान सभेत महत्त्वपूर्ण होते.
  3. ‘मध्यममार्गी’ नेतृत्व: या गटात के. संथानम, टी. टी. कृष्णामचारी यांसारख्या सदस्यांचा समावेश होता. त्यांच्या कायद्याच्या अभ्यासामुळे संविधान सभेत त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकले गेले.
 • यापैकी बहुतांश सदस्य वकील होते. त्यामुळे संविधानाची भाषा काहीशी क्लिष्ट आणि पारिभाषिक झाली, असा टीकेचा सूरही लावला जातो.
 • संविधान सभेतील बहुसंख्य सदस्य हे उच्चवर्णीय, उच्चशिक्षित, शहरी भागांतील होते, हेदेखील सत्य आहे.
 • तसेच ९० टक्क्यांहून अधिक सदस्य हिंदू होते. महिलांचे प्रमाण केवळ १५ टक्के होते.

8) तांत्रिक एकलतेची संकल्पना मांडणारे रेमंड कुर्झवाइल

 • रेमंड कुर्झवाइल हे एक अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, लेखक आणि संशोधक आहेत.
 • कुर्झवाइल यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील सर्वांत महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांची टेक्नॉलॉजिकल एकलतेची संकल्पना. टेक्नॉलॉजिकल एकलता हा भविष्यातील एक असा बिंदू आहे, जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होईल. कुर्झवाइल यांना विश्वास आहे की २०४५पर्यंत हे होईल आणि २०२९ पर्यंत एकतरी मशिन ट्युरिंग चाचणीवर सिद्ध होईल.
 • २० वर्षांत मानवाकडे नॅनोबॉट्स म्हणून ओळखली जाणारी, रक्तपेशीच्या आकाराची लाखो उपकरणे असतील, अशी चर्चा आहे. नॅनोबॉट्स आपल्या शरीरातील रोगांशी लढा देतील आणि आपली स्मरणशक्ती व संज्ञानात्मक क्षमता सुधारतील.
 • शरीराचे जीर्ण किंवा रोगट अवयव बदलण्यासाठी सेंद्रिय तसेच कृत्रिम अवयवांचे रोपण करत, कार्बन-आधारित सेंद्रिय मानवाचा ५० टक्क्यांपेक्षा अधिक बायोनिक किंवा यंत्र असलेल्या ‘ट्रान्सह्युमन’ मध्ये झालेला बदल हा मानवी उत्क्रांतीची पुढील पायरी असेल.

9) सी गार्डियन ड्रोन खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आपल्या अमेरिका दौर्‍यात एमक्यू 9 बी सी गार्डियन या मानवरहित विमानांची खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतरच्या काळात याबाबत करारमदार झाल्यानंतर भारताने 31 सी गार्डियन ड्रोन खरेदी करण्याचे निश्चित केले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment