चालू घडामोडी : 3 SEPT 2023

1.आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण ( श्रीहरीकोटा ) येथून

वैशिष्ट्य =
  • 15 लाख किमी चा प्रवास करून सूर्याच्या सर्वात जवळच्या मानल्या जाणाऱ्या ‘लॅग्रेजिअन पॉइंट – यल – 1’ च्या कक्षेत पोहचेल आणी सूर्याची चित्रे पाठवेल.
  • सूर्याच्या कोरोनल हीटिंग बद्दल, सौर वाऱ्यांचा प्रवेग, सौर वातावरण, तेथील तापमान, सौरप्रभेतील वस्तुमान आदींचा अभ्यास ‘आदित्य L-1 करणार आहे.
  • या मोहिमेच्या संचालिका = निगार शाजी

2. ‘गिरीप्रेमी’ संस्थेकडून ‘मेरू’ शिखर सर.

  • भारतातील मेरू मुख्य शिखरावर पश्चिम बाजूने चढाई करणारा जगातील पहिला संघ.
  • गणेश मोरे, विवेक शिवदे, वरुण भागवत, मिंग्या शेर्पा या चार गिर्यारोहकानी चढाई केला.
  • मेरू शिखर हे उत्तराखंडातील गढवाल हिमालयात असून हे शिखर 6660 मीटर उंच आहे.
  • गिर्यारोहण क्षेत्रात हे शिखर ‘एवरेस्ट’ पेक्षाही कठीण मानले जाते.
  • गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक ‘उमेश झिरपे’ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.

Leave a Comment