विठ्ठल रामजी शिंदे | Vitthal Ramji Shinde

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

जन्म

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी जमखिंडी (कर्नाटक) येथे झाला. घरातील कौटुंबिक वातावरणात त्यांच्या संगोपनाचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला. ते कन्नड आणि मराठी अस्खलित बोलत. नंतर त्यांनी इंग्रजी, पाली, संस्कृत आणि इतर प्राकृत भाषांचा अभ्यास केला. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने त्यांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी दरमहा 10 रू.शिष्यवृत्ती दिली. त्याने एलएलबीचे पहिले वर्ष पूर्ण केले.1898 मध्ये त्यांनी बी.ए.चा कोर्स पूर्ण केला. नंतर त्यांना महाराजा सयाजीराव यांनी 25 रुपये स्कॉलरशिप दिली. या काळात ते शिंदे समाजाकडे ओढले गेले. त्यांनी 1901 मध्ये मुंबई प्रार्थना समाज व कोलकाता ब्राह्मो समाज तर्फे इंग्लंड मधील मँचेस्टर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी दोन वर्षे बौद्ध धर्म, पाली भाषा आणि तुलनात्मक धर्माचा अभ्यास केला. अस्पृश्यता, समाजशास्त्र आणि समाज यासह अनेक सामाजिक समस्यांवर त्यांनी वैज्ञानिक संशोधन केले. अशा प्रकारच्या तपासणीसाठी ते भारतातील पहिले वैज्ञानिक-डॉक्टर म्हणून ओळखले जातात. नंतर ऑक्टोबर 1903 मध्ये ते मुंबईला परतले.

सामाजिक कार्य

 विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०५ मध्ये पुण्याच्या मीठगंज भागात अस्पृश्यांसाठी रात्रशाळा उघडली. साधारणपणे १९०३ ते १९१० या काळात त्यांनी एकेश्र्वरवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करत प्रार्थना समाजाचे कार्य केले. होळी सन बंदीच्या विरोधात मोहीम राबवली. या कार्यक्रमात कोल्हापूर प्रार्थना समाजही सहभागी झाला होता. 1911 मध्ये मुरळी बंद होण्यापूर्वी मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली.आणि 1916 मध्ये त्यांनी गुन्हेगारी जाती सुधारणेवर व्याख्यान दिले. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना 8 नोव्हेंबर 1917 रोजी झाली आणि त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ आणि पक्षाच्या विरोधात भाष्य केले. महिला सक्षमीकरण आणि शिक्षेच्या समर्थनार्थ ज्ञानप्रकाशमध्ये लेखांची मालिका लिहिली गेली. 1919 मध्ये त्यांनी पुणे महापालिकेच्या विरोधात मोर्चा काढला आणि 1920 मध्ये त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1924 मध्ये वैकोम येथे सत्याग्रह करण्यात आला. 1930 मध्ये त्यांनी पुणे पार्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहातही भाग घेतला होता. जगद्गुरूंच्या स्थापनेच्या विरोधात त्यांच्या शिष्यांनीही त्यांना साथ दिली. शिंदे हे अस्पृश्यता प्रश्नाचे पहिले संशोधक म्हणून ओळखले जातात.महात्मा फुले यांना शिंदे गुरुस्थानी मानीत. मिशनतर्फे पुढील दोन वर्षे मोफत दवाखान्याचेही काम चालू होते.


१४ मार्च, १९०७ रोजी सोमवंशीय मित्र समाजाची स्थापना महर्षी शिंदे यांनी केली. अस्पृश्य लोकांकरवीच स्व-उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेणे हा त्यामागचा हेतू होता. १९१० पासून त्यांनी प्रार्थना समाजाशी असलेले संबंध संपवले.
१९१२ साली डिप्रेस्ड क्लास मिशनच्या एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, इतर बारा संस्था व ५ प्रचारक होते. निरनिराळ्या सात प्रांतांत मिशनचे काम पसरले होते. १९१७ साली त्यांनी अखिल भारतीय निराश्रित अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला.

संस्था

१८ ऑक्टोबर, १९०६ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाची (डिप्रेस्ड क्लास मिशन) स्थापना केली. मिशनचे हेतू पुढीलप्रमाणे निश्चित केले गेले- शिक्षण प्रसार;  निराश्रितांना नोकर्‍या मिळवून देणे; सामाजिक अडचणींचे निराकरण करणे; सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील, नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार. या स्थापनेचे अध्यक्ष चंदावरकर आणि सेक्रेटरी वि. रा. शिंदे हे होते. डॉ. संतुजी रामचंद्र लाड हे आद्य संस्थापकांपैकी एक होते. ह ना आपटे, रँग्लर परांजपे, रमाबाई रानडे, गोपाळराव देवधर हे सभासद होते. १९२२ साली त्यांनी ‘अहिल्याश्रम’ बांधून पूर्ण केला. १९२५-२६ मध्ये ते ब्राह्मदेशाच्या दौर्‍यावर गेले आणि तेथील समाज व बौद्धधर्माचा अभ्यास करून परतले. पुण्यात कॅम्प, पेठांमधे शाळा स्थापन केल्या. सय्यद अब्दुल कादर (शिक्षक) , वामनराव सोहोनी (ब्राह्मण मित्र) यांनी संस्थेच्या कार्यात हातभार लावला. तांदूळ फंड, कापड फंड, रुपी फंड यांची स्थापना शिंदे यांनी केली. संपूर्ण भारतात त्यानी अस्पृश्यता परिषदा आयोजित केल्या.

1907 मध्ये सूरत येथे अस्पृश्यता परिषदा आयोजित केली त्याचे अध्यक्ष पद सत्येंद्रनाथ बोस यांना सोपवले. 1910 मध्ये मद्रास येथे अस्पृश्यता परिषदा आयोजित केली त्याचे अध्यक्ष पद गोपाळराव गोखले यांना देण्यात आले.पुणे येथे 1912 साली आयोजित केलेली अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष पद भांडारकर यांच्या कडे देण्यात आले. लाला लजपतराय हे कराची येथील अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष होते. 1917 साली कोलकाता येथे आयोजित केलेल्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष ॲनी बेझंट हे होते. 1918 साली अस्पृश्यता निवारण परिषद मुंबई येथे झाली. सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते तर स्वागताध्यक्ष न्या. चंदावरकर होते. 1920 नागपूर अ. भा. अस्पृश्यता परिषदा म. गांधी यांनी लॉर्ड साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखालील मतदान कमिटीत वि. रा. शिंदे व आंबेडकर यांची निवड केली.


नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होणार हे जाहीर झाल्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा उत्साह दाखविला व निवडणुकीच्या संदर्भात जेधे मॅन्शनमध्ये एक सभा बोलावली. ह्या सभेस विठ्ठल रामजी शिंदे यांना आग्रहपूर्वक बोलावणे केले होते. आगामी निवडणुकीमध्ये शिंदे यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे असे दोन्ही पक्षांच्या मंडळींनी आग्रहपूर्वक सांगितले. शिंदे यांनी याप्रसंगी मी राखीव जागेसाठी उभा राहणार नाही. त्यातील जातिवाचक तत्त्वाच्या मी विरुद्ध आहे असे ठामपणे सांगितले. मात्र पुणे शहराच्या सर्वसाधारण जागेसाठी सर्व पक्षांनी मिळून मदत करावयाची ठरवल्यास आपण निवडणुकीस उभे राहण्यास तयार आहोत, असे सांगितले.बहुजन पक्ष असा स्वतंत्र जाहीरनामा काढून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यापाठीमागे विठ्ठल रामजी शिंदे यांची वैचारिक भूमिका असणार. स्वराज्या मिळविणे हा काँग्रेसचा निकडीचा प्रश्न होता. हे स्वराज् अथवा स्वातंत्र्य मिळविल्यावर देशाची भावी घटना कशी असावी ह्या प्रश्नामध्ये काँग्रेसने लक्ष घातले नव्हते. त्याबद्दल काँग्रेसला विशेष आस्था असल्याचेही जाणवत नव्हते. त्यांच्या ददृष्टीने काँग्रेसमधील जहाल व मवाळ हे ध्येयावरून नव्हे, तर पद्धतीवरून पडलेले भेद होते. तेव्हा स्वराज्य मिळाले तरी दलित, शेतकरी, स्त्रिया इत्यादी दुर्बल समाजघटकांची दाद काँग्रेसकडे सत्ता आली तरी लागेलच अशी शिंद्यांना खात्री नव्हती. म्हणून विद्या, सत्ता, संपत्ती यांनी आचवलेल्या व म्हणून दुर्बल राहिलेल्या बहुजन जमाजातील विविध गटांचा कैवार घेणारा बहुजन पक्ष या नावाने जाहीरनामा काढून आपली भूमिका विशद करून निवडणूक लडवावी असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले असावे. 1920 साली त्यांनी ‘बहुजन पक्ष’ स्थापन केलाआपण राजकारणात का भाग घेत आहोत यासंदर्भात आपली भूमिका कोणती आहे हे प्रकट व्हावे यासाठी शिंदे यांनी ‘बहुजन पक्ष’ ह्या नावे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1924 साली कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली.

शेतकरी परिषदा

वि.रा. शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. वि.रा. शिंदे यांनी 1926 मध्ये, पुण्यात अस्पृश्य शेतकरी परिषदेच्या स्थापनेने उपेक्षित कृषी समुदायांचे उत्थान करण्याच्या उद्देशाने चळवळीची घोषणा केली. दोन वर्षांनंतर, 1928 मध्ये, मुंबई इलाखा शेतकरी परिषदेची स्थापना करण्यात आली आणि बाबूराव जेधे यांनी अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारून, शेतकऱ्यांच्या हक्कांची वकिली करण्यासाठी संघटनेला चालना दिली. 1931 मध्ये वाळवे तालुका शेतकरी परिषद आणि 1932 मध्ये तेरदाळ शेतकरी परिषद स्थापन करून ही गती कायम राहिली, प्रत्येकाने आपापल्या प्रदेशात एकता आणि सामूहिक कृतीचे बुरुज म्हणून काम केले. याव्यतिरिक्त, 1932 मध्ये, चांदवड तालुका शेतकरी परिषदेची स्थापना करण्यात आली, ज्याने ग्रामीण कृषी समुदायांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तळागाळातील प्रयत्नांना आणखी मजबूत केले. या खुणा शेतकऱ्यांच्या त्यांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचा पाठपुरावा करण्याची लवचिकता आणि दृढनिश्चय अधोरेखित करतात.

ग्रंथसंपदा

वि.रा. शिंदे यांनी 1933 साली ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा पहिला ग्रंथ लिहला. त्यानंतर ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहले. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.धर्म जीवन व तत्त्वज्ञान हे पुस्तक वि.रा. शिंदे यांनी लिहले.

निधन

आपल्या हयातभर प्रामुख्याने अस्पृश्योद्धारासाठी झटणार्‍या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे २ जानेवारी, १९४४ रोजी निधन झाले.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment