Current Affairs | चालू घडामोडी | 27 FEB 2024
1) मराठी भाषा गौरव दिन
- कुसुमाग्रज जयंती निम्मित साजरा केला जातो
- पूर्ण नाव = विष्णू वामन शिरवाडकर
- साहित्य = नटसम्राट नाटक, विशाखा काव्यसंग्रह (1942), राजमुकुट
- ज्ञानपीठ पुरस्कार 1987
2) सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन
- त्यांनी पहिल्यांदा ‘कामना’ या चित्रपटासाठी गाणे गायले होते. तो चित्रपट अपयशी ठरला, मात्र त्यांचे गाणे लोकप्रिय झाले.
- उधास यांना चित्रपट संगीतापेक्षा गझल गायकीत अधिक रस निर्माण झाला. त्यासाठी त्यांनी उर्दू भाषा शिकून घेतलीच, पण सुरूवातीला त्यांनी परदेशात गझल गायनाचे कार्यक्रम करत आपली गायकी पक्की केली.
- चित्रपट संगीताबरोबर इंडी पॉपचा प्रभाव वाढण्याच्या सुरूवातीच्या काळात पंकज उधास यांनी ‘आहट’ हा पहिला स्वतंत्र गझलचा अल्बम काढला. या पहिल्याच अल्बमला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला
- ‘तरन्नूम’, ‘मुकर्रर’, ‘मेहफिल’ असे पन्नासहून अधिक स्वतंत्र गझलचे अल्बम्स काढले.
- त्यांना ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणे खूप हिट झाले. केवळ पडद्यामागे गाणे न गाता पहिल्यांदा त्यांच्यावर हे गाणे प्रत्यक्ष चित्रित झाले.
- त्यांच्या गझल गायकीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना 2006 मधे पद्मश्री किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते.
3) ‘पेटीएम’ बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा पायउतार
- ग्राहकांच्या ‘केवायसी’ पूर्ततेतील टाळाटाळ करण्यासह अन्य गंभीर चुकांकडे बोट दाखवत रिझर्व्ह बँकेने १५ मार्च पासून पेटीएम पेमेंट्स बँकेला ठेवी स्वीकारण्यास व कर्जे देण्यास मनाई केली होती. या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी राजीनामा दिला.
- ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या पेटीएमच्या मालक कंपनीने याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये या कंपनीची हिस्सेदारी ४९ टक्के असून विजय शेखर शर्मा यांच्या ताब्यात ५१ टक्के भांडवली समभाग आहेत.
4) ‘बायजू’च्या ताळेबंदांची आता सरकारकडून तपासणी
- २३ फेब्रुवारीला बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत, बायजूच्या प्रमुख भागधारकांनी संस्थापक मुख्याधिकारी बायजू रवींद्रन आणि कुटुंबीयांना कथित ‘गैरव्यवस्थापन आणि अपयश’ या कारणावरून कंपनीवरून पदच्युत करण्यासाठी एकमताने कौल दिला आहे.
5) सायबरसुरक्षा उत्कृष्टता मोहिमेचा पुण्याला मान
- सायबर सुरक्षा क्षेत्रातील भारत आणि अमेरिकेतील कंपन्या एकत्र येऊन कौशल्य विकासासोबत सायबर सुरक्षा उपाययोजनांवर काम करणार आहेत.
- ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅड अॅग्रीकल्चर’च्या (एमसीसीआयए) वतीने आयोजित पाचव्या ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’मध्ये या मोहिमेची घोषणा करण्यात आली.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel