Current Affairs | चालू घडामोडी | 28 FEB 2024
1) राष्ट्रीय विज्ञान दिवस
- रमण इफेक्ट सिद्धांत यादिवशी प्रकाशित झाला = 28 फेब्रुवारी 1928
- शास्त्रज्ञ = सी व्ही रमण
- पुरस्कार = नोबेल (1930)
- भारतरत्न = 1954
2) बारीपाडाचे (धुळे) चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार 2024 जाहीर
- सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- चंद्रपूर येथे 3 मार्च 2024 रोजी होणाऱ्या ताडोबा महोत्सवात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
- वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास १०० गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे.
3) राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day] = 28 फेब्रुवारी
- भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला ‘रमण परिणाम’ सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
- पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986)
- 2024 ची थीम: ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ आहे. ( ‘Indigenous Technologies for Viksit Bharat’ )
- रमन इफेक्ट ही अशी घटना आहे जेव्हा प्रकाश पारदर्शक सामग्रीवरून जातो आणि काही प्रकाश तरंगलांबीमध्ये बदलतो.
- सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या बद्दल
- भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
- जन्म: 7 नोव्हेंबर 1818
- मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
- 1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
- रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
- 1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.
4) बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना : राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा
- महत्वाच्या संस्था
- आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (मातंग समाजासाठीची संस्था)
- बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
- सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था
- महाज्योती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
- अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी
- वनार्टी : बंजारा समाजासाठीची संस्था (सध्या फक्त घोषणा)
- या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात.
5) माजी न्यायाधीश अजय खानविलकर यांची नवे लोकपाल म्हणून नियुक्ती
- लोकपाल मधील न्यायिक सदस्य पदी :
- न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी
- न्यायमूर्ती संजय यादव
- न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी
- लोकपाल मधील गैर न्यायीक सदस्य पदी :
- सुशील चंद्र
- पंकज कुमार
- अजय तिरकी
- पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष यांचा कार्यकाळ 22 मे 2022 रोजी संपला होता.
- हंगामी लोकपाल म्हणून न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती यांनी काम पाहिले.
6) गगनयान मधील अंतराळवीरांची नावे जाहीर
- ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर
- मूळचे केरळमधील तिरुवाझियाड येथील.
- एनडीएमधील प्रशिक्षणात मानाची तलवार पटकावली होती.
- १९९८ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल.
- ३००० तासांहून अधिक काळ विविध विमानांतून उड्डाण.
- ‘सुखोई ३०’ च्या तुकडीचे नेतृत्व.
- ‘अ’ श्रेणीतील उड्डाण प्रशिक्षक व चाचणी वैमानिक.
- ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
- मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे.
- एनडीएचे माजी छात्र.
- २००४ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात.
- विविध विमानांवर २००० तासांहून अधिक काळ उड्डाण.
- हवाई दलात उड्डाण प्रशिक्षक व चाचणी अधिकारी.
- ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
- मूळचे चेन्नईचे
- एनडीएमधील प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रपतीचे सुवर्णपदक आणि हवाई दल प्रबोधिनीत मानाची तलवार पटकावली.
- २००३ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात.
- विविध विमानांवर २९०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव.
- हवाई दलात उड्डाण प्रशिक्षक व चाचणी वैनानिक,
- विंग कमांडर शुभांशू शुक्ला
- मूळचे लखनौचे
- एनडीएचे माजी छात्र.
- २००६ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात.
- लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्व.
- तसेच चाचणी वैमानिक, विविध प्रकारच्या विमानोड्डाणाचा २००० तासांहून अधिकचा अनुभव.
- गगनयान मोहिमेच्या मानवरहित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मानवी मोहिमेतून चार पैकी तिघा अंतराळवीरांना जमिनीपासून ४०० किलोमीटरच्या कक्षेत पोचवण्यात येईल.
- तीन दिवस या कक्षेत प्रयोग केल्यानंतर तिघा अंतराळवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्यात येईल
- गगनयान मोहिमेची शृंखला त्यापुढेही सुरू राहणार असून, २०३५ पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती करणे आणि २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे ‘इस्रो’चे लक्ष्य आहे.
7) स्वदेशी ‘जीएमआरटी’चा ३८ देशांकडून वापर
- संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून उभारलेल्या ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या महाकाय रेडिओ दुर्बिणीचा जगातील ३८ देशांतील शास्त्रज्ञांकडून संशोधनासाठी वापर केला जात आहे.
- विश्वाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातर्फे (एनसीआरए) नारायणगाव नजीकच्या खोडद येथे हा रेडिओ दुर्बीण प्रकल्प तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आला.
- शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.
- इंटरफोरोमीटर या प्रकारातील जीएमआरटी ठरावीक वैशिष्ट्यांमुळे जगातील एक मोठी रेडिओ दुर्बीण ठरली.
- जीएमआरटी प्रकल्पात सुमारे २५ किमी व्यासाच्या वर्तुळात ३० अँटेना इंग्रजी वाय आकारात उभारण्यात आल्या आहेत.
8) ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ चा वापर. आभासी भिंत उभारणार
- मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने एक ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर आधारित उपाय शोधला आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ९०० गावे जंगलव्याप्त आहेत. त्यामुळे बाराही महिने येथे मानव-वन्यजीव संघर्ष सुरू असतो.
- हा संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा- ‘आर्टिफिशियल इन्टेलिजन्स’चा (एआय) वापर करून जंगल आणि गावांमध्ये आभासी भिंत तयार करण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘मन की बात’मध्ये, हा प्रयोग जगात प्रथमच होत असल्याचा उल्लेख केला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel