Current Affairs | चालू घडामोडी | 29 Feb 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 Feb 2024

1) मोरारजी देसाई जयंती = 29 फेब्रुवारी 1896

  • भारताचे चौथे पंतप्रधान (1977 – 79)
  • बॉम्बे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री (1952 – 56)

2) एकलव्य कुशल योजना

  • शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत अनुसूचित जमातीतील तरुणांसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण

3) पुण्यातील औंधमध्ये ‘एम्स’ उभारणार

  • नागपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) धर्तीवर एम्सची उभारणी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी लेखानुदानात केली.

4) संगीत नाटक अकादमी पुरस्कार

  • शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२ आणि २३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले
  • या पुरस्कारांमध्ये २०२२ या वर्षासाठी शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना तर २०२३ साठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • याशिवाय, प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका जयश्री रामनाथ यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • २०२३ या वर्षाठीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला जाहीर झाला आहे.

5) नागपूर ‘आयआयआयटी’मध्ये देशातील पहिले ‘एआय’ केंद्र

  • राज्य सरकार आणि ‘गूगल’ यांच्यात नुकताच ‘एआय फॉर महाराष्ट्र’ हा सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या करारानुसार आता नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयआयटी) देशातील पहिल्या ‘अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा (एआय) सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात आली आहे.

6) राज्य माहिती आयुक्तपदांवर (SIC Members) तीन निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

  • राज्य सरकारने राज्य माहिती आयुक्त पदावर निवृत्त सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी मकरंद रानडे यांची नियुक्ती केली आहे.

7) सुनील मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड सन्मान

  • भारती एंटरप्रायझेस चे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment