मित्रांनो, तुम्ही खालील महत्त्वाच्या मुद्यांवर क्लिक करून त्याविषयी अधिक माहिती मिळवू शकता.
Current Affairs – January 2024 | चालू घडामोडी – जानेवारी २०२४
मित्रांनो, जानेवारी २०२४ या महिन्यामधील दैनिक चालू घडामोडी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
राजकीय #political
1) वाहतूकदारांचे आंदोलन
- केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार (New Motor Vehicle Act) यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे.
- दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली होती
- तर, हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा (Petrol-Diesel Supply) करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. ज्यात 1 ते 3 जानेवारीदरम्यान टँकरचालक संपावर गेले होते.
- दरम्यान ‘हिट अँड रन’ प्रकरणांमध्ये शिक्षेच्या कठोर तरतुदींविरोधात ट्रक वाहतूकदारांना तूर्त अभय देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर वाहतूकदारांनी देशव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
2) हिट अँड रन कायदा काय?
- अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षा
- ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला, अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेल्यास दहा वर्षांचा कारावास, सात लाखांचा दंड
- अपघात झाला आणि ड्रायव्हरने पोलिसांना कळवलं , जखमींची मदत केली तर दंडासह 5 वर्षांचा कारावास
- गुन्हा?
- आधी: जामीनपात्र गुन्हा
- आता: अजामीनपात्र गुन्हा
3) मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.
- मंत्रालय बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय.
4) ऊसतोड कामगारांना ३४ टक्के दरवाढ
- शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय घेतला.
5) बिल्किस बानो बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ११ दोषींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवितानाच सर्व दोषींना दोन आठवड्यांच्या आत पुन्हा तुरुंगात डांबण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
- २००२ साली झालेल्या गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींदरम्यान, पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून ११ जणांना दोषी ठरवण्यात आले होते.
- गुजरात सरकारने या सर्वांची शिक्षा माफ करून १५ ऑगस्ट २०२२ रोजी तुरुंगातून सुटका केली.
- शिक्षामाफीचा अधिकार महाराष्ट्र शासनाचा: सर्वोच्च न्यायालय
- दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारला अधिकार नव्हता. हा खटला मुंबईमध्ये चालला होता. त्यामुळे कायद्यानुसार दोषींच्या शिक्षामाफी याचिकेवर निर्णय घेण्याचा अधिकार गुजारात सरकारला नव्हे, तर महाराष्ट्र शासनाला होता.
- शिक्षामाफी देऊन गुजरात सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, अशा शब्दांत खंडपीठाने ताशेरे ओढले.
- कायदा असे सांगतो की ज्या राज्यात मूळ खटला चालला त्याच राज्य सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे.
- बिल्किस बानोवर अत्याचार जरी गुजरात राज्यात झाले होते तरी त्या राज्यात हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले जाणार नाही, असे वाटल्याने या प्रकरणाचा खटला महाराष्ट्रात चालवला गेला.
- याचा अर्थ बिल्किसवर अत्याचार करणाऱ्यांची शिक्षा माफ करायची असेल तर तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवा.
6) शपथ मंत्रिपदाची
- राज्यघटनेतील अनुच्छेद ७४ आणि १६३ नुसार उपपंतप्रधान, उपमुख्यमंत्री अशी पदे अस्तित्वात नाहीत. परिणामी त्यांच्या शपथांचाही संविधानातील परिशिष्ट अथवा तिसऱ्या अनुसूचीत समावेश नाही.
- अनुच्छेद १८८ नुसार तिसऱ्या परिशिष्टात दिलेली शपथ कुठल्याही विधानसभा अथवा परिषदेच्या सदस्याला घेणे अनिवार्य आहे.
- राज्यघटनेतील शपथेची कलमे
- कलम 60 : राष्ट्रपती पदाची शपथ
- कलम 69 : उपराष्ट्रपती पदाची शपथ
- कलम 74 : राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रीपरिषद
- कलम 99 : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
- कलम 159 : राज्यपाल पदाची शपथ
- कलम 163 : राज्यपालास सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ
- कलम 188 : विधिमंडळातील सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
7) लोकशाही या मराठी न्यूज चॅनलचे लायसन्स निलंबित
- माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे.
- 15 August 1947 ला हे मंत्रालय स्थापन करण्यात आले.त्याला 75 वर्ष पूर्ण झाले.
8) केंद्राच्या निवडणूक आयुक्त संदर्भातील कायद्याला स्थगिती नाही.
- मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकी संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
- आयुक्तांच्या नेमणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीत त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना वगळण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी केंद्र सरकारमधील एक मंत्री समितीत असतील असे सरकारने स्पष्ट केले होते. याच तरतुदीला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती आता फेटाळण्यात आली
- निवडणूक आयुक्त नेमणुकीसाठीची समिती
- अध्यक्ष= पंतप्रधान
- सदस्य 1 = संसदेतील विरोधी पक्षनेता
- सदस्य 2 = केंद्र सरकारमधील एक मंत्री
9) राम मंदिर प्रतिष्ठापना निम्मित महाराष्ट्र सरकारने शासकीय सुट्टी जाहीर. त्याविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली
- ‘सुट्टीचा निर्णय धर्मनिरपेक्षता तत्त्वाशी सुसंगत’ = न्यायालय
- राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय धोरणात्मक बाब आहे. देशातील विविधतेच्या वैशिष्ट्यांचा विचार करता हा निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाशी सुसंगत आहे, असे उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने स्पष्ट केले.
10) शिक्षण हक्क कायद्यानुसार वाहतूक भत्त्यासाठी १९ हजार विद्यार्थी पात्र
- या निर्णयामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
- शिक्षण हक्क कायद्यानुसार (2009)
- पहिली ते पाचवीच्या स्तरावर एक किलोमीटरच्या आत शाळा
- सहावी ते आठवीच्या स्तरावर तीन किलोमीटरच्या आत शाळा
- तसेच पाच किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा, वाहतूक भत्ता देण्यात येतो.
- गेल्या काही महिन्यांत राज्यात समूह शाळांची निर्मिती करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. आता शासन निर्णयात कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असे याच शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
11) राष्ट्रीय मतदार दिन = २५ जानेवारी
- 2011 पासून दरवर्षी भारतात हा दिवस साजरा केला जातो
- भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना (कलम 324) = 25 जानेवारी 1950 रोजी झाली त्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी मतदार शिक्षण व निवडणूक साक्षरतेचे अभ्यासक्रम तयार केले असून त्यासाठी आवश्यक श्रेयांक देण्यात येणार आहेत.
- निवडणूक साक्षरतेसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
12) राष्ट्रगीताचे अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण
- ‘जण गण मन’ या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताला 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताची (नॅशनल अँथम) मान्यता मिळाली आणि त्याचे प्रथमच गायन झाले.
- त्याचबरोबर ‘वंदे मातरम् ‘ ला ‘जण गण मन’ च्या बरोबरीने मान दिला जाईल आणि त्याची प्रतिष्ठा राष्ट्रीय गीत (नॅशनल साँग) म्हणून राहील असे घोषित केले.
- भारतीय घटना समितीची शेवटची सभा 24 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच सभेत वरील दोन्ही गोष्टी स्वीकारल्याची घोषणा करण्यात आली.
- ‘जण गण मन’ = कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत ‘भारतो भाग्यो बिधाता’ या नावाने रचले होते.
13) न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांची न्यायमूर्ती पदी नियुक्ती
- सर्वोच्च न्यायालयात आता 34 न्यायाधीश.
- प्रथमच दलीत समाजातील 3 वर्तमान न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात असतील.
14) मराठा आरक्षण – कुणबी प्रमाणपत्र आता प्राप्त कुणबी ‘सगेसोयरे’ यांना देखील
- मनोज जरांगे-पाटलांच्या मागणीनुसार अधिसूचना
- सगेसोयरे व्याख्या.
- जर एखाद्याचे कुणबी प्रमाणपत्र निघालेले असेल तर त्याच्या नात्यातील सर्वांना (मामा,आत्या,मावशी, ई.)त्याचा लाभ घेता येईल.
- यासाठी एक शपथपत्र दिल्यानंतर गृह चौकशी अहवाल(शक्यतो ग्रामीण भागात तलाठी करेल) प्राप्त झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल.
- सध्या महाराष्ट्रात कुणाला किती आरक्षण?
- SC. = 13%
- ST = 7%
- OBC = 19%
- VJ & NT = 11%
- SBC = 2%
- EWS = 10%
एकूण = 62%
15) निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले.
- टॅगलाइन: ‘चुनाव का पर्व, देश का गर्व
- निवडणूक आयोगाने 2024 साली ब्रँड एंबेसडर म्हणून ‘राजकुमार राव’ यांची निवड केली आहे
16) बिहारचे नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू पुन्हा एनडीए मध्ये
- विक्रमी 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ
- बिहारमध्ये आता 2 उपमुख्यमंत्री
- NDA (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) मधील घटक पक्ष
- BJP, JDU , HAM (हिंदुस्तानी आवाम मोर्चा)
- सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे
- नितीश कुमार (JDU) = 9 वेळा
- जयललिता (AIADMK) = 6 वेळा
- वीरभद्र सिंग (काँग्रेस) = 6 वेळा
17) सुप्रीम कोर्ट स्थापन = 28 January 1950
- मुख्यालय नवी दिल्ली
- सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पंतप्रधान मोदींना भेट दिला
18) भारतीय न्याय संहिता, २०२३ (बीएनएस)
- 3 नवीन कायद्यांची नावे
- भारतीय न्याय संहिता, 2023 (भारतीय दंडविधान संहिता IPC च्या जागी)
- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 (फौजदारी दंडविधान कायदा CRPC च्या जागी)
- भारतीय साक्ष कायदा, 2023 (भारतीय पुरावा कायद्याच्या जागी)
- भारतीय न्याय संहिता, २०२३ (बीएनएस)
- यामध्ये आता नवीन ३५८ तरतुदींचा समावेश केला जाईल (भादंवि च्या ५११ तरतुदी सोडून)
- या कायद्यात नवीन २० गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यामधील ३३ गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे.
- लैंगिक स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी, कलम ६९ नुसार एका नवीन खंडाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, ज्याद्वारे एखाद्या स्त्रीस लग्नाचे वचन देणे, जेव्हा असे वचन पाळण्याचा कोणताही उद्देश नसेल आणि त्याद्वारे सदर स्त्रीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करणे, हा या कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
- प्रथमच ‘दहशतवादा’ची व्याख्या करण्यात आली आहे.
- ‘राजद्रोह’ हा गुन्हा नवीन कायद्यातून वगळण्यात आलेला आहे. समुदायाद्वारे हत्या (मॉब लिंचिंग) हा बीएनएस च्या कलम १०३ (२) द्वारे नवीन गुन्हा म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे, ज्यासाठी कमाल शिक्षा म्हणून देहांत शासन दिले जाऊ शकते. यापूर्वी समुदायाद्वारे हत्या या गुन्ह्यासाठी कोणतीही वेगळी शिक्षा दिली जात नसे.
- बीएनएसच्या तरतूदींनुसार ‘नियोजित गुन्हा’ ही व्याख्या प्रथमतःच करण्यात आली असून त्यामध्ये आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्ह्यांचाही अंतर्भाव आहे. याद्वारे प्रथमतःच आर्थिक गुन्ह्यांवर कडक कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. नियोजित गुन्ह्याकरीता देहांतशासन आणि किमान दहा लाख रुपयांचा दंड कमाल शिक्षा ठरविण्यात आलेली आहे.
- आता प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ही इलेक्ट्रॉनिक / संगणकीय पद्धतीद्वारे नोंदविली जाऊ शकते आणि ‘शून्य एफआयआर’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.
- आता पीडित व्यक्ती कोणत्याही पोलिस चौकीशी संपर्क करू शकते, त्यासाठी सदर पोलिस चौकीचे कार्यक्षेत्र विचारात घेण्याची आवश्यकता नाही.
- बीएनएसएस कायद्याच्या कलम २५० प्रमाणे अथवा कलम २६२ (१) प्रमाणे, यातील आरोपी सदर गुन्हा घडल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत मुक्त होण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. यापूर्वी, असा अर्ज दाखल करण्यासाठी अशी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती.
- फौजदारी दंडसंहितेच्या कलम २३५ शी निगडीत बीएनएसएस कायद्याच्या कलम २५८ नुसार, एखादा युक्तिवाद संपल्यानंतर, न्यायाधिशाने खटल्याचा निकाल ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे, हा कालावधी विशेष कारणांचा उल्लेख केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. पूर्वी निकाल देण्यासाठीची कोणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली नव्हती.
- बीएनएसएस, २०२३ च्या कलम ४७९(१) अन्वये, कच्च्या कैद्याला किती मुदतीपर्यंत बंधक बनवून ठेवता येईल, याची कमाल कालमर्यादा निश्चित केली आहे. गुन्हेगार हा प्रथमवेळ गुन्हेगार असेल तर तो त्यास होऊ शकणाऱ्या एकूण शिक्षेच्या एक तृतीयांश काळ शिक्षा भोगल्यानंतर जामीन मिळण्यास पात्र ठरू शकतो. सराइत गुन्हेगारांसाठी जामीन कालमर्यादा ही त्यांच्या पात्र शिक्षेच्या निम्मा काळ शिक्षा भोगल्यानंतर अशी राहील. अशा पात्र कैद्यांना जामिनावर सोडण्याकरीता अर्ज करण्याची जबाबदारी ही त्या कारागृह अधीक्षकाची असेल.
19) भारतीय राज्यघटनेच्या कलम 139A अन्वये सर्वोच्च न्यायालयाला प्रकरणे स्वतःकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे.
- खटले हस्तांतरित करण्यासाठी न्यायालय कलम 32 अंतर्गत रिटच्या आपल्या Extraordinary अधिकारांचा वापर करू शकते.
20) लेखानुदानाचे महत्त्व काय? (Vote on Account)
- नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल २०२४ पासून सुरू होईल. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होऊन नवीन संसद सदस्यांसह, नवे सरकार केंद्रात स्थानापन्न झालेले असेल. त्यामुळे लवकरच मावळत असलेल्या लोकसभेला संपूर्ण अर्थसंकल्पावर मतदान करता येत नाही.
- यासाठी सरकारला तात्पुरत्या अवधीसाठी देशाचा कारभार चालवता येण्यासाठी निधीची गरज लक्षात घेऊन, ही लेखानुदानाची घटनात्मक तरतूद आहे.
- एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित असून, यंदा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प त्यानंतर म्हणजे जूनमध्ये सादर केला जाईल.
21) 2014 ते 2024 पर्यंत प्रजासत्ताक दिनी आलेले प्रमुख अतिथी
- 2024 = एम्यानुएल मॅक्रोन (फ्रान्स)
- 2023 = अब्दुल फतेह अल सिसी (इजिप्त)
- 2020 = जैर बोल्सणारो (ब्राझील)
- 2019 = सिरील रामाफोसा (दक्षिण आफ्रिका)
- 2018 = असियान संघटनेच्या दहा देशांचे प्रमुख
- (2021 आणि 2022 साली कोविड मुळे कोणत्याच देशाचे प्रमुख नव्हते)
जागतिक #world
1) गुंड गोल्डी ब्रार UAPA अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित.
2) United Nation ने 2024 हे उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.
3) अपहृत जहाजावरून २१ कर्मचाऱ्यांची सुटका
- अरबी समुद्रात अपहरण करण्यात आलेल्या लायबेरियन व्यावसायिक जहाजावर ताबा मिळवून भारतीय नौदलाच्या कमांडोंनी त्यावरील २१ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. त्यांत १५ भारतीयांचा समावेश आहे.
- लायबेरियाच्या ‘एमव्ही लिला नॉरफोक’ या जहाजावर सुमारे पाच ते सहा शस्त्रधारी असल्याचा संदेश गुरुवारी संध्याकाळी यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) या संस्थेला पाठवण्यात आला होता.
- ही संस्था जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवते. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौथी दहशतवाद्यांनी हल्ले वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर हे जहाज अपहरण चिंतेत टाकणारे होते.
4) मालदीव सरकारातील 3 मंत्र्यांचे निलंबन
- मालदीवमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होऊन सत्तांतर झाले. यातून अध्यक्षपदी मोहम्मद मुईझ्झू यांची निवड झाली. ते प्रोग्रेसिव्ह अलायन्सकडून निवडणूक लढले आणि इब्राहीम सोली या तत्कालीन अध्यक्षांचा त्यांनी पराभव केला. प्रोग्रेसिव्ह अलायन्सचे सर्वेसर्वा आहेत अब्दुल्ला यामीन. त्यांना भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही.
- पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप येथे भेट दिली व या भेटीच्या निमित्ताने मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमी व्यासपीठावर तेथील छायाचित्रे प्रसृत केली. या लघुसंदेशांमध्ये कुठेही मालदीवचा उल्लेखही नव्हता. परंतु मालदीवमधील बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर मोदींवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली
- मुईझ्झू मंत्रिमंडळातील मरियम शिउना, माल्शा शरीफ, माहझूम माजिद या 3 मंत्र्यांनी भारतावरील चिखलफेकीत सहभागी झाले. लक्षद्वीपची तुलना मालदीवशी कधीही होऊ शकत नाही, हा युक्तिवाद पुढे अत्यंत घाणेरड्या पातळीवर घसरला. पंतप्रधान मोदी यांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत निर्भर्त्सना करण्यात आली.
यामुळेच त्यांचे निलंबन करण्यात आले.
5) बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार
- त्यांचा पक्ष अवामी लीगनं 300 जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. 2009 पासून बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या.
6) 34 वर्षीय शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे.
- गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत.
7) तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपी) उमेदवार लाई चिंग-ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे.
8) मालदीवमध्ये तैनात केलेले भारतीय लष्कर 15 मार्च पर्यंत माघारी हटवण्यास सांगितले.
- मालदीवचे अध्यक्ष मोइझू यांनी आपला भारत विरोध कायम ठेवला आहे. त्यांनी निवडणूक याच मुद्द्यावर लढवून जिंकली होती.
9) ‘ब्रिक्स’ अध्यक्षपदासाठी रशियाला पाठिंबा
- रशियाने १ जानेवारी २०२४ पासून ‘ब्रिक्स’चे अध्यक्षपद स्वीकारले.
- 2023 = साऊथ आफ्रिका कडे अध्यक्षपद
10) इराणने आपले शेजारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
- पाकिस्तानचे देखील इराणवर प्रतिहल्ले
11) म्यानमार सीमेवर होणार काटेरी कुंपण
- बांगलादेश सीमेप्रमाणे आता भारत आणि म्यानमार या सीमेवर लवकरच काटेरी कुंपण घालण्यात येईल.
12) कॅनडा देशाचा महत्त्वाचा निर्णय 22 जानेवारी हा दिवस ‘अयोध्या राम मंदिर दिन’ म्हणून साजरा करणार .
आर्थिक #finance #economy
1) अरविंद पनगरिया १६ व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी
- ३१ ऑक्टोबर २०२५ = वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची तारीख
- अहवालाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
- आयोगाच्या जबाबदाऱ्या
- करमहसुलाची केंद्र आणि राज्यांदरम्यान विभागणी
- त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा
- भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदानरूपी मदत
- राज्यांच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावयाचा निधी
- सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा
- 16 व्या वित्त आयोगाचे सचिव = रित्विक रंजनम् पांडेय
- वित्त आयोगाचे शेवटचे चार अध्यक्ष
- १२ वे- सी रंगराजन
- १३ वे – विजय केळकर
- १४ वे – Y.V.रेड्डी
- १५ वे – NK सिंग
- 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य =
- ज्येष्ठ पत्रकार आणि ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष,
- माजी व्यय सचिव अजय नारायण झा,
- निवृत्त सनदी अधिकारी अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि
- स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष या चार नवीन सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी करण्यात आली.
- मराठी मातीतून चौथे प्रतिनिधित्व
- सोळाव्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक आणि मिंट या अर्थविषयक दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक डॉ. निरंजन राजाध्यक्ष हे आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ज्ञ ठरले आहेत.
- यापूर्वी धनंजय गाडगीळ आणि विजय केळकर यांनी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, तर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही वित्त आयोगात जबाबदारी निभावली होती.
2) भारताकडून जागतिक पतमानांकन संस्थांवर टीका
- सार्वभौम पतमानांकन म्हणजे काय?
- कोणत्याही देशाचे पतमानांकन ठरवताना त्या देशाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, विविध वित्तसंस्था, संशोधन संस्था यांच्याकडून वेळोवेळी प्रकाशित होत असलेली आकडेवारी, कंपन्यांचे वार्षिक-तिमाही अहवाल अशा सर्वाचा अभ्यास करून मानांकन दिले जाते.
- यात देशाच्या कर्जाची पातळी, कर्जफेडीचा इतिहास, अर्थव्यवस्थेचा दरडोई उत्पन्नाचा स्तर, महागाई दर, व्याजदर, व्यापार तूट, विकासदर आदी अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शविणाऱ्या पैलूंचा विचार असतो.
- याचबरोबर बऱ्याचदा अर्थतज्ज्ञ, उद्याोजक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चाही केली जाते.
- राजकीय स्थैर्य, भ्रष्टाचाराचे प्रमाण, देशाची संस्थात्मक आणि प्रशासनात्मक व्यवस्था या बाबींचा देखील सार्वभौम पतमानांकन निश्चित करताना विचार होतो.
- मुख्य पतमानांकन संस्था कोणत्या?
- मूडीज = ही सर्वात जुनी संस्था = स्थापना १९००
- स्टँडर्ड अँड पुअर्स = स्थापना १९२० .
- फिच रेटिंग्स ही एक अमेरिकी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. तिची स्थापना जॉन नोल्स फिच यांनी २४ डिसेंबर १९१४ रोजी न्यूयॉर्क शहरात फिच प्रकाशन कंपनी म्हणून केली होती.
3) कोटक महिंद्र बँकेच्या प्रमुखपदी अशोक वासवानी
4) जीएसटी संकलन १.६४ लाख कोटींवर
- एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीत सरासरी मासिक जीएसटी संकलन हे १.६६ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारे राहिले. हेच आधीच्या वर्षातील याच कालावधीतील मासिक सरासरी १.४९ लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेतही १२ टक्क्यांची वाढ दर्शवणारी आहे.
5) १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान (Vote on Account) मांडले जाईल.
- निवडणूक-वर्षात केवळ खर्चाला मंजुरी देणाऱ्या या लेखानुदानात कोणताही महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.
- नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल २०२४ पासून सुरू होईल. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होऊन नवीन संसद सदस्यांसह, नवे सरकार केंद्रात स्थानापन्न झालेले असेल. त्यामुळे लवकरच मावळत असलेल्या लोकसभेला संपूर्ण अर्थसंकल्पावर मतदान करता येत नाही. यासाठी सरकारला तात्पुरत्या अवधीसाठी देशाचा कारभार चालवता येण्यासाठी निधीची गरज लक्षात घेऊन, ही लेखानुदानाची घटनात्मक तरतूद आहे.
- एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित असून, यंदा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प त्यानंतर म्हणजे जूनमध्ये सादर केला जाईल.
6) ई रुपयांचे झाले दहा लाख व्यवहार
- ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (CBDC) चे ‘ई रुपी’ हे संक्षिप्त रूप आहे. ही मुळात एक डिजिटल पावती आहे जी लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा QR कोड संदेश रुपात मिळेल.
- हे आभासी चलनांप्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
- ही एक प्री-पेड पावती (व्हाऊचर) आहे, जे तो/ती (लाभार्थी) कोणत्याही केंद्रात-जिथे ते स्वीकारले जाईल, तिथे जाऊन, ते दाखवून त्याच्या बदल्यात पैसे मिळवू शकेल.
- ई-रुपी म्हणजे डिजिटल चलन नाही. उलट ई-रुपी हे व्यक्ती-विशिष्ट, तसेच निश्चित उद्दिष्टासाठी जारी केले जाणारे डिजीटल व्हाउचर आहे.
- RBI ने 1 डिसेंबर 2022 रोजी ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (CBDC) रिटेल जरी केले.
7) गुगल पे आणि पेटीएमशी स्पर्धा करण्यासाठी आता बाजारात येणार टाटा पे, RBI ने दिली मंजुरी
- सन २०२२-२३ या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.२ टक्के होता, त्याहून सरस असा हा चालू वर्षाचा अंदाज आहे.
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय = ‘एनएसओ’
9) गौतम अदानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- ब्लूमबर्ग च्या रिपोर्ट नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून अदानी ग्रुप ऑफ कंपन्यांचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
10) जगात आर्थिक विषमता वाढत आहे : ऑक्सफॅम चा अहवाल
- जागतिक आर्थिक मंचाच्या(WEF) बैठकीत ऑक्सफॅम ने ‘इनइक्वालिटी इंक’ नावाचा अहवाल मांडला. त्यात खालील गोष्टी नमूद केल्या आहेत.
- जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती २०२०पासून दुप्पट झाली असून तब्बल पाच अब्ज लोक अधिक गरीब झाले आहेत.
- मागील दशकभरात पाच अब्ज लोक गरिबीत
- संपूर्ण गरिबी संपविण्यासाठी २२९ वर्षांची प्रतीक्षा
11) दावोस जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum -WEF)
- जागतिक आर्थिक परिषदेची स्थापना क्लाऊस श्वॅब यांनी १९७१ मध्ये केली.
- जागतिक पातळीवर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य वाढावे, असा त्यांच्या परिषदेच्या स्थापनेमागील हेतू होता. आता या परिषदेचे मुख्यालय जिनिव्हामध्ये आहे. जागतिक समस्यांवर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून चर्चा घडविण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जाते.
- ‘जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध’ असे या परिषदेचे ब्रीदवाक्य आहे.
- केवळ २००२ चा अपवाद वगळता दावोसमध्ये (स्वित्झर्लंड ) ही परिषद झाली आहे. त्यावेळी ९/११ च्या हल्ल्यानंतर न्यू यॉर्कमध्ये ही परिषद झाली होती.
- या परिषदेत २००० मध्ये जागतिक लसीकरण सहकार्य गटाची (गावी) स्थापना झाली. यामुळे अनेक देशांना विविध रोगांवरील लशी उपलब्ध होऊ लागल्या. या गटामुळे जगभरात ७६ कोटी मुलांचे लसीकरण होऊ शकले आहे.
12) ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट
- ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वत:चे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे.
- वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी आणि मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो.
13) ‘विकसित भारता’ची ‘ई-वाहनांद्वारे’ स्वप्नपूर्ती!
- देशाला २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यात ई-वाहनांकडे होऊ घातलेले वेगवान स्थित्यंतर महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरणार आहे.
- अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सरकारने १०० टक्के थेट परकीय गंतवणुकीला परवानगी दिली आहे.
- भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत भारत विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यात विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. त्यात आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन या बाबींचा समावेश आहे.
14) प्राप्तिकर तसेच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) मासिक संकलनात उत्साही वाढ सुरू असल्याने सरकारच्या कर महसुलात अपेक्षेपेक्षा सरस वाढ
15) जगातील सर्वात मोठे क्रुझ निघाले पहिल्या सफारीवर
- नाव = आयकॉन ऑफ द सीज
- 7 दिवसांची कॅरिबियन सफर करणार
16) या वर्षी आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey) मांडला जाणार नाही.
- वित्त मंत्रालयाने ‘भारतीय अर्थव्यवस्था : अवलोकन’ नावाचे टिपण प्रसिद्ध केले. ते ‘आर्थिक पाहणी अहवाल’ नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- या वर्षी पासूनच्या नवीन तरतुदी
- यंदा १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प अर्थात पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अल्पावधीसाठी सादर होणारे केवळ लेखानुदान असेल.
- त्यामुळे अर्थसंकल्पपूर्व देशाच्या प्रगतीचा आलेख मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार नाही.
- या सामान्य प्रथेपासून फारकत घेत, वित्त मंत्रालयाने ‘भारतीय अर्थव्यवस्था : अवलोकन’ नावाचे हे टिपण सादर करून नवा पायंडा पाडल्याचे मानले जात आहे.
- मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांची याला प्रस्तावना आहे.
- येत्या तीन वर्षांत भारत पाच लाख कोटी (पाच ट्रिलियन) डॉलरच्या सकल देशांतर्गत उत्पादनासह (जीडीपी) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय वित्त मंत्रालयाने व्यक्त केला.
17) ‘पेटीएम पेमेंट्स बँके’ला ठेवी स्वीकारण्यास बंदी
सामाजिक #social
1) सासवड, लोणावळा नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सर्वोत्तम
- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सासवड (ता. पुरंदर) आणि लोणावळा (ता. मावळ) या दोन्ही नगरपालिका सलग दुसऱ्यांदा देशात सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत.
- सासवड व लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त
2) केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण – २०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
3) केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने घोषित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ द्वारे इंदोर आणि सुरत यांना भारतातील सर्वात स्वच्छ शहरे म्हणून घोषित केले आहे.
- स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार क्रमवारी
- इंदोर आणि सुरत
- नवी मुंबई
- स्वच्छ शहर (1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या)
- सासवड
- पाटण
- लोणावळा
- महाराष्ट्राला स्वच्छ पहिल्या क्रमांकाचा राज्याचा पुरस्कार.
4) 27 वे राष्ट्रीय युवा महोत्सव = नाशिक
- पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
- या महोत्सवात महाराष्ट्राला विजेतेपद
5) प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत (पतंप्रधान जनमन योजना) ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत एक लाख आदिवासी लाभार्थ्यांना ५४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरित
6) ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरी येथील ८०० कोटी रुपयांच्या श्री जगन्नाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले.
7) नवउद्यामींच्या पोषणांत गुजरात, कर्नाटक पुन्हा अव्वल
(स्टार्टअप रँकिंग, 2022)
- नाविन्यपूर्ण उपायांसह, अभिनव संकल्पनांवर आधारीत व्यवसाय उभारणाऱ्या नवउद्यामी अर्थात ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन आणि त्यांच्यासाठी पोषक वातावरण मिळवून देणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी सर्वोच्च कामगिरी
- त्यानंतरची दुसरी वर्गवारी, म्हणजे चांगली कामगिरी (Top Performer) करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा यांना वर्गीकृत करण्यात आले आहे.
8) ‘असर’ चा १५ वा अहवाल
- ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने देशभर केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन (असर) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले.
- शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचे दिसते आहे.
- असर सर्वेक्षण नेमकं काय?
- Annual Status of Education Report (ASER)(असर)
- असर हा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणि शालेय मुलांचं वाचन आणि अंकगणितातलं आकलन या विषयांवर देशपातळीवर घेण्यात येणारं हे एक वार्षिक सर्व्हेक्षण आहे.
- हे सर्व्हेक्षण ‘प्रथम’ या एनजीओकडून गेल्या 15 वर्षांपासून केलं जातं. यावर्षी हे सर्व्हेक्षण फोनच्या माध्यमातून घेण्यात आलं होतं. यात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ग्रामीण भागांतील 52 हजार 227 घरांचा समावेश होता.
9) शालेय स्तरावर कोचिंग सेंटर बंद
- केंद्र शासनाने इयत्ता दहावीच्या खाली किंवा सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश देण्यास मनाई केलेली आहे
- विद्यार्थी आत्महत्या, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खाजगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिकवण्यांसाठीची नियमावली जाहीर केलेली आहे.
- नियमावली
- दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांनाच कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश
- किमान पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती
- प्रत्येक कोचिंग सेंटर मध्ये समुपदेशाची नियुक्ती बंधनकारक
- नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई
- परीक्षेत अव्वल विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये शिकल्याचे फलक लावण्यास मज्जाव
- गुणवत्ता यादीत स्थानाचे आश्वासन देण्यास बंदी
- आठवड्याची सुट्टी तसेच सण उत्सवांच्या कालावधीत सुट्टी देणे आवश्यक
10) PM किसान योजना अंतर्गत राज्यनिहाय 15 नोव्हेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 या काळातील सर्वाधिक महिला लाभार्थी
- उत्तर प्रदेश
- राजस्थान
- मणिपूर
- महाराष्ट्र
11) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आवरण
- ‘स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस’ = आंध्र प्रदेश
- उंची = 206 फूट
- जगातील सर्वाधिक उंचीच्या 50 पुतळ्यांमधे समावेश
12) सोलापूरजवळ कुंभारी येथे ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसह राज्यातील सुमारे ९० हजार घरांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.
13) श्रीरामाची मूर्ती स्थापित
- अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात २२ जानेवारीला समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
- श्रीरामाची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी काळ्या दगडातून साकारली आहे. मूर्तीची उंची ५१ इंच आहे.
- अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्या’नुसार ही सुट्टी जाहीर केली असून त्यामुळे बँकांचे कामकाजही बंद राहणार आहे.
14) ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’
- राज्यात १ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या व दीड महिना राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानासाठी ८६ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
15) ‘पीडीएस = पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम’ म्हणजेच ‘रास्त भाव दुकान’ म्हणजेच ‘रेशन दुकान’ आणि ‘आनंदाचा शिधा’ योजना
- रचना = शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीत धान्य विकत घेणे आणि ते पीडीएस द्वारे भारतभर पोहोचवणं अशी एकूण रचना.
- 2012 13 च्या सुमारास पीडीएस मध्ये आमुलाग्र बदल सुरू केले
- आधार कार्ड कार्यक्रम
- आधार क्रमांक बँक खाते परस्परांशी जोडणे
- त्यातून लाभार्थीच्या थेट बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी) सबसिडी जमा करणे.
- महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये ‘आनंदाचा शिधा’ या नावाने योजना आणली. शिधापत्रिकेवर रेशन दुकानातून शंभर रुपयांत अन्नधान्य पुरवण्याची ही योजना.
16) अयोध्या राम मंदिर = नागर प्रकारचे मंदिर
- मंदिर बांधणारे प्रमुख आर्किटेक्चर = चंद्रकांत सोमपुरा
- मंदिराचे प्रकार
- हेमाडपंथी मंदिरे
- नागर शैली मंदिरे
- द्रविड शैली मंदिरे
- वेसर शैली मंदिरे
- भूमीज शैली मंदिरे
17) समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप तरी निर्णय नाही.
- राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
18) अयोध्या लवकरच सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र
- धार्मिक पर्यटन केंद्रे
- अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात वर्षाला अंदाजे ३ ते ३.५ कोटी तर तिरुपती बालाजी मंदिराला २.५ ते ३ कोटी पर्यटक भेट देतात.
- जागतिक स्तरावर व्हॅटिकन सिटीला दरवर्षी ९० लाख पर्यटक येतात. सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी दोन कोटी पर्यटक भेट देतात.
- धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधांतील अडथळे असूनही वर्षाला एक ते तीन कोटी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच पायाभूत सुविधांसह नवे धार्मिक पर्यटन केंद्र तयार केल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पर्यटनामुळे अयोध्येत आर्थिक व धार्मिक स्थलांतर वाढेल, असा अंदाज असून हॉटेल, हवाई वाहतूक, आदरातिथ्य, पर्यटन यांसह विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे
19) शिक्षण हक्क कायद्यानुसार वाहतूक भत्त्यासाठी १९ हजार विद्यार्थी पात्र
- या निर्णयामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
- शिक्षण हक्क कायद्यानुसार (2009)
- पहिली ते पाचवीच्या स्तरावर एक किलोमीटरच्या आत शाळा
- सहावी ते आठवीच्या स्तरावर तीन किलोमीटरच्या आत शाळा
- तसेच पाच किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा, वाहतूक भत्ता देण्यात येतो.
- गेल्या काही महिन्यांत राज्यात समूह शाळांची निर्मिती करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. आता शासन निर्णयात कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असे याच शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
20) राष्ट्रीय पर्यटन दिवस = 25 जानेवारी
21) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर (‘मनरेगा’)
- यंदा ‘मनरेगा’च्या मजुरीचा दर २५६ रुपये आहे. या योजनेत हजेरीपत्रक बंद झाल्यावर १५ दिवसाच्या आत मजुरी मजुराच्याबँक किंवा पोस्टातील खात्यात जमा करण्याची सक्ती आहे. अन्यथा ०.५ टक्के प्रतिदिन विलंब आकार सरकारला द्यावा लागतो.
22) पहिली ते दहावी सर्व शाळांना मराठी अनिवार्य
23) राज्यातील पहिले बालस्नेही न्यायालय पुण्यात
- बाललैंगिक अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी उभारण्यात येणारे हे न्यायालय राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय असणार आहे.
- लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वर्ष २०१२ मध्ये पॉक्सो कायदा केला गेला.
24) सार्वत्रिक लसीकरणात गर्भाशयाच्या कर्करोगाची लस
- सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मार्फत निर्मिती
- ह्युमन पाॅपीलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रकारातील कार्वाव्हॅक नावाची लस
- महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक लस
25) निपुण भारत
- नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारताचे माननीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशन हा कार्यक्रम सुरु केला.
- निपुण (NIPUN) म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी,
- भारत सरकारची हि तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे,
- या योजनेच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित या विषयांचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे या योजनेचे ध्येय आहे.
- उद्देश = देशातील प्रत्येक मुलाला 2026 – 27 पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित (संख्यात्मकता) कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचण्याची, लिहिण्याची शिकण्याची क्षमता प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे
पर्यावरण व कृषी #environment #agriculture
1) कुनो राष्ट्रीय उद्यानात तीन चित्यांचा जन्म
- 3 पिल्लांच्या जन्मानंतर एकूण चित्त्यांची संख्या = 15
2) सन 2023 सर्वात उष्ण वर्ष: युरोपमधील हवामान संस्था
3) मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका नामिबियन चित्त्याचा (शौर्य) मृत्यू झाला.
4) पंतप्रधान सूर्योदय योजना
- या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे
5) ताडोबा-अंधारी, पेंच व्याघ्रप्रकल्पात गिधाड संवर्धन
6) देशात ‘हिम बिबट्यां’ची संख्या ७१८; पहिला अहवाल जाहीर
- भारतात आढळणाऱ्या ‘हिम बिबट्यां’चा पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर झाला असून भारतात सद्या:स्थितीत या प्रजातीचे ७१८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देशातील निम्म्यापेक्षा जास्त, ४७७ हिम बिबटे एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत.
7) राज्यातील रेशीम उद्योगासाठी ‘सिल्क समग्र -2’ योजना राबविणार
- योजना कार्यकाळ = 2021-22 ते 2025-26
8) आशियाई देशांत आयात शुल्क लावल्याने नागपुरी संत्र्यांची निर्यात ठप्प
- नागपुरी संत्री
- 200 वर्षांचा इतिहास
- मराठा साम्राज्याचे राजे रघुजीराव भोसले यांनी नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यातून आणलेल्या संत्र्यांच्या कलमांची नागपुरात लागवड केली होती.
- नागपूरची संत्री मॅंडरिन गटात मोडते
- GI टॅग देखील प्राप्त
संरक्षण #defence
1) अपहृत जहाजावरून २१ कर्मचाऱ्यांची सुटका
- अरबी समुद्रात अपहरण करण्यात आलेल्या लायबेरियन व्यावसायिक जहाजावर ताबा मिळवून भारतीय नौदलाच्या कमांडोंनी त्यावरील २१ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. त्यांत १५ भारतीयांचा समावेश आहे.
- लायबेरियाच्या ‘एमव्ही लिला नॉरफोक’ या जहाजावर सुमारे पाच ते सहा शस्त्रधारी असल्याचा संदेश गुरुवारी संध्याकाळी यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) या संस्थेला पाठवण्यात आला होता.
- ही संस्था जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवते. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौथी दहशतवाद्यांनी हल्ले वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर हे जहाज अपहरण चिंतेत टाकणारे होते.
2) पहिली स्वदेशी असाॅल्ट रायफल तयार.
- ‘उग्रम’ ची ‘एआरडीई’कडून निर्मिती; चाचण्यानंतर संरक्षण दलांना उपलब्ध होणार
- प्रकार:-7.62 बाय 51 मिलिमीटरची असाॅल्ट रायफल
- मारक क्षमता:- 500 मीटर
- चालवण्याची पद्धत:- स्वयंचलित
- वजन:- 4 किलोग्रॅम पेक्षा कमी
- मॅगझीन:- 20 गोळ्या
3) भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे उड्डाण
- अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस च्यावतीने भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे हैदराबाद येथे अनावरण.
4) ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्यायावत ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेतली.
5) युद्धसराव प्रात्यक्षिकात प्रथमच स्वदेशी बनावटीच्या ‘स्वार्म’ ड्रोनचा वापर
- स्वदेशी बनावटीचे ‘स्वार्म’ ड्रोन झुंड युद्धतंत्रासाठी, शत्रूवर पाळत ठेवणे तसेच आक्रमण मोहिमांसाठी यांत्रिकी पायदळात दाखल केले आहे. त्याचे नोडल सेंटर म्हणून नगरमधील यांत्रिकी पायदळ केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.
6) म्यानमार सीमेवर होणार काटेरी कुंपण
- बांगलादेश सीमेप्रमाणे आता भारत आणि म्यानमार या सीमेवर लवकरच काटेरी कुंपण घालण्यात येईल.
7) कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र
- यंदा सहा जणांना कीर्तीचक्र जाहीर झाले असून त्यापैकी तिघांना तो मरणोत्तर जाहीर झाला आहे.
- कॅप्टन अंशुमन सिंह (पंजाब रेजिमेंट, २६ वी बटालियन),
- हवालदार अब्दुल माजिद (पॅराशूट रेजिमेंट, ९वी बटालियन) आणि
- शिपाई पवनकुमार (राष्ट्रीय रायफल्स, ५५ वी बटालियन)
यांना मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर झाला आहे.
- मेजर दिग्विजयसिंह रावत ( पॅराशूट रेजिमेंट, २१ वी बटालियन, विशेष दल),
- मेजर दीपेंद्र विक्रम बसनेत ( शीख रेजिमेंटमधील चौथी बटालियन),
- हवालदार पवनकुमार यादव (महार रेजिमेंट २१ वी बटालियन)
यांना कीर्तीचक्र जाहीर झाला आहे.
- १६ जणांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. त्यातील दोघांना तो मरणोत्तर दिला जाईल.
- देशात शांतता काळात दिला जाणारा कीर्ती चक्र हा अशोक चक्रानंतरचा दुसऱ्या तर शौर्य चक्र तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.
8) प्रीती रजक = लष्करातील पहिल्या महिला सुभेदार
विज्ञान व तंत्रज्ञान #technology #science
1) ‘एक्सपोसॅट’ उपग्रहाचे प्रक्षेपण = 1 जानेवारी 2024
- या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल.
- ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल.
- PSLV-C58 या प्रक्षेपकडवरे आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडले जातील.
- अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्राो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे.
- ‘इस्राो’व्यतिरिक्त, अमेरिकन संस्था ‘नासा’ने डिसेंबर २०२१ मध्ये ‘सुपरनोव्हा’ स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.
- ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’ = एक्सपोसॅट (XPoSat)
- या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास केला जाणार आहे.
- या मोहिमेद्वारे अशा खगोलीय घटकांचा अभ्यास करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरणार आहे.
2) जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पासाठी भारताने 1,250 कोटी रुपये मंजूर केले
- स्क्वेअर किलोमीटर Array (SKA) = आंतरराष्ट्रीय वेधशाळा
- काय आहे प्रकल्प ?
- विश्वाच्या निर्मितीनंतरच्या पहिल्या घटना, तारे, दीर्घिकांची निर्मिती, पृथ्वीबाहेरील जीवसृष्टी, सूर्य, विश्वातील चुंबकीय क्षेत्र, विश्वातील प्रचंड स्फोट यांचा अभ्यास याद्वारे केला जाईल.
- सहभागी देश = ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, ब्रिटन, नेदरलँड, इटली, स्पेन, चीन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि भारत
3) जीसॅट-एन 2 (जीसॅट-20) साठी स्पेसएक्स चा प्रक्षेपक
- ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ (NSIL) ही इस्रो ची व्यावसायिक शाखा स्पेसएक्स च्या फाल्कन-9 प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-20 चे प्रक्षेपण फ्लोरिडातून करणार आहे.
4) अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत १३.५ गिगावॉटने वाढ
- जागतिक आघाडीवर भारताला चौथ्या क्रमांका नेणारी ही कामगिरी आहे.
- पवन ऊर्जानिर्मितीत भारत चौथ्या, तर सौरऊर्जा निर्मितीत पाचव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिली.
- केंद्र सरकारने जानेवारी २०२३ मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली असून, त्यासाठी १९ हजार ७४४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
- भारताला जगातील हरित हायड्रोजनचा सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनविण्यासाठी देशात ४ लाख ५० हजार हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
5) ‘आदित्य-एल १’ यानाची अंतिम कक्षेत प्रस्थापना
- आदित्य-एल१ पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवर अंतरावरील, सूर्य-पृथ्वीदरम्यानच्या ‘लगरेंज पॉइंट १’च्या आसपास त्रिमितीय ‘प्रभामंडल’ कक्षेत पोहोचेल.
- ‘लॅंगरेंज पॉइंट’ हा असा समतोल बिंदू आहे जिथे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होते.
- ‘हॅलो’ कक्षा ही ‘एल१’, ‘एल२’ किंवा ‘एल३’ या ‘लॅंगरेज पॉइंट’जवळील एक नियमित-त्रिमितीय कक्षा आहे.
- ‘एल१ पॉइंट’च्या चारही बाजूंनी ‘हॅलो’ कक्षेतून उपग्रह सूर्याचे निरीक्षण करू शकतो. यामध्ये सौर प्रक्रियांचे निरीक्षण करता येईल, तसेच त्याचे थेट अवकाशीय हवामानावर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण-नोंदी करता येतील.
- पीएसएलव्ही सी५७ ने श्रीहरिकोटा येथुन २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपण
- ‘आदित्य एल १’ काय करणार?
- सौर वातावरणातील गतिशीलता, सौर वादळे, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंपांचा अभ्यास
- सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रभामंडल वस्तुमानाच्या उत्सर्जन (कोरोनल मास इजेक्शन) प्रक्रियांचा अभ्यास करणे
- सौर वातावरणातील घडामोडींच्या पृथ्वीच्या जवळील अवकाशातील हवामानावरील परिणामांचा अभ्यास करणे
- सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे 15 कोटी किमी आहे. L1 हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किमी अंतरावर असल्याने आदित्य एल 1 सूर्याच्या नव्हे तर पृथ्वीच्या जवळ आहे. सूर्याच्या दिशेने फक्त 10% अंतर त्याने कापले आहे. पृथ्वीजवळ असल्याने आदित्य एल 1 ने पाठवलेला विदा जलद गतीने डाऊनलोड करता येईल. तसेच त्याच्याशी संपर्क व देवाणघेवाण वेगवान पद्धतीने होईल.
- यावर एकूण 7 उपकरणे आहेत पैकी 4 उपकरणे कार्यान्वित असून 3 उपकरणे एल 1 बिंदूवर गेल्यावर सुरू होतील.
- आदित्य एल 1 मधील ‘सूट’ या उपकरणाची निर्मिती पुण्यातील आयुका या संस्थेने केलेली आहे.
- अमेरिकेच्या नासा तसेच युरोपियन अवकाश संस्थेची ‘साहू’ ही वेधशाळा एल 1 या बिंदूवर आहेत.
6) 50 वर्षांनंतर अमेरिकेची चंद्रमोहिम
- अमेरिकेतील ‘युनायटेड लाँच अल्लायन्स’ या कंपनीच्या ‘व्हल्कन’ या रॉकेटचे प्रक्षेपण. ‘अस्ट्रोबाॅटिक टेक्नॉलॉजी’ या खाजगी कंपनीचे लॅंडर अवकाशात पाठवण्यात आले.
- दोन्ही खाजगी कंपन्यांना नासा चे सहाय्य
7) निपाह प्रतिबंधक लशीची ऑक्सफर्ड कडून निर्मिती
- निपाह विषाणू विरोधात असलेली जगातील पहिली लस
- ‘सीएचएडीओएक्स1 निपाह बी’ असे या लशीचे नाव आहे.
- वटवाघूळ, डुक्कर अथवा अन्य बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचा संसर्ग होतो.
8) ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट
- ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वत:चे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे.
- वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी आणि मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो.
9) जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी
- जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे.
- जपानच्या आधी रशिया, अमेरिका , चीन आणि भारत हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत.
- स्लिम = स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन (SLIM – Smart Lander for Investigating Moon)
- जपानची अंतराळ संशोधन संस्था = JAXA
- 2013 नंतरच्या चंद्र मोहिमा
- 2013 = चांग ई 3 = चीन = यशस्वी
- 2018 = चांग ई 4 = चीन = यशस्वी
- 2019 = बेरेशीत = इस्राइल = अयशस्वी
- 2019 = चंद्रयान 2 = भारत = अयशस्वी
- 2020 = चांग ई 5 = चीन = यशस्वी
- 2022 = ओमोतेनाशी = जपान = अयशस्वी
- 2022 = हाकुतो -R = जपान = अयशस्वी
- 2023 = लुना – 25 = रशिया = अयशस्वी
- 2023 = चंद्रयान 3 = भारत = यशस्वी
- 2024 = पेरेग्राईन = अमेरिका = अयशस्वी
- 2024 = स्लिम = जपान = यशस्वी
10) भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले ब्लॅकहोलचे रहस्य
- AstroSat च्या माध्यमातून ‘सिग्नस एक्स 1’ कडून येणाऱ्या एक्स रे च्या नोंदीचे विश्लेषण.
- मानवाला सापडलेल्या ‘सिग्नस एक्स १’ या पहिल्या कृष्णविवराच्या (ब्लॅकहोल) जवळून उत्सर्जित होणाऱ्या ‘एक्स रे’चे (क्ष किरण) रहस्य भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले आहे.
- या अभ्यासातून उच्च ऊर्जेच्या क्ष किरणांची उत्पत्ती कशी होते यावर भारतीय शास्त्रज्ञांनी प्रकाश टाकला आहे.
- २०१५मध्ये प्रक्षेपित झालेल्या ‘ॲस्ट्रोसॅट’ या भारतीय वेधशाळेवर असलेल्या ‘कॅडमिअम झिंक टेल्युराइड इमेजर’ (सीझेडटीआय) या उपकरणाच्या साह्याने भारतीय शास्त्रज्ञांनी हंस तारकासमूहातील कृष्णविवरांकडून येणाऱ्या क्ष किरणांच्या आठ वर्षे नोंदी घेतल्या.
11) सार्वत्रिक लसीकरणात गर्भाशयाच्या कर्करोगाची लस
- सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मार्फत निर्मिती
- ह्युमन पाॅपीलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रकारातील कार्वाव्हॅक नावाची लस
- महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक लस
12) मानवी मेंदूत प्रथमच ‘चिप’चे प्रत्यारोपण. मनातील विचारांतून हाताळता येणार संगणक
- एलोन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीकडून चाचणी
- ‘चिप’चे वैशिष्ट्य आणि उपयोग
- एका छोट्या नाण्याप्रमाणे आकार
- कंपनीने या पहिल्या उपकरणाचे नाव ‘टेलिपथी’ असे ठेवले आहे
- मानवी मेंदू आणि संगणकामध्ये थेट संपर्क होऊ शकेल
- जर ही मानवी चाचणी यशस्वी ठरली तर भविष्यात ‘चिप’च्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींना पाहणे शक्य होईल
- अर्धांगवायूचे रुग्ण चालू -फिरू शकतील आणि संगणकही हाताळू शकतील
पुरस्कार #awards
1) ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार, कॅलिफोर्निया अमेरिका
- पुरस्कार यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – ओपनहाइमर
- सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट – पुअर थिंग्ज
- दूरचित्रवाणी मालिका – सक्सेशन
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- लिली ग्लॅडस्टोन
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ड डाउनी (ओपनहाइमर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – डा वाइन जॉय रैंडोल्फ
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्रिस्तोफर नोलन
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन सिनेमा – द बॉय अँड द हेरॉन
- सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अॅचिवमेंट अवॉर्ड – बार्बी
2) अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने खेळाडूंचा गौरव
- राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्टला पार पडतो. मात्र, गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाल्याने पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे हा सोहळा मंगळवारी संपन्न झाला. या वेळी पॅरा खेळाडूंसह एकूण २६ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
- सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल ध्यानचंद जीवनगौरव, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अशा पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
- खेलरत्नसाठी पदक आणि रोख २५ लाख, तर अर्जुनसाठी वीर अर्जुनाचा कांस्य पुतळा आणि रोख १५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
- संपूर्ण पुरस्कार यादी
- मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी
- (बॅडमिंटन)
- द्रोणाचार्य (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब).
- द्रोणाचार्य (जीवनगौरव) : जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस).
- मेजर ध्यानचंद जीवनगौरव : मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी).
- अर्जुन पुरस्कार : ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग).
3) जयपूरची दिव्यकृती सिंग ठरली अश्वारूढ खेळांमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला
4) पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पुरस्कार
- रेडिओ उद्घोषक अमीन सयानी, दिग्दर्शक व अभिनेते गौतम घोष आणि ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्य कलाकार लीला गांधी यांना यंदाचा ‘पिफ पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
- तर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल गीतकार, गायक एम. एम. कीरवानी यांना ‘संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
5) विशाखा विश्वनाथ = मराठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार
- ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना’ या कवितासंग्रहासाठी पुरस्कार
6) राष्ट्रपतींकडून बाल पुरस्कार प्रदान
- महाराष्ट्रातील 12 वर्षीय आदित्य विजय ब्राह्मणे याला विलक्षण साहसासाठी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला.
7) बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी काम करणारे कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
- उद्या 24 जानेवारी त्यांची जन्मशताब्दी सुरू होतेय त्याच्या पूर्वसंध्येला घोषणा
8) भारतीय डॉक्युमेंटरी फीचर फिल्म ‘To Kill A Tiger’ 96 व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) नामांकित झाली आहे.
9) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले. मागील ४ वर्ष हा पुरस्कार सोहळा झालाच नव्हता आणि आज हैदराबाद येथे ३ वर्षांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
- भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व फारुख इंजिनियर्स यांचा सीके नायुडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
10) BCCI अवॉर्ड 2022-23
- माधवराव सिंधिया पुरस्कार = मयंक अग्रवाल
- दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटीत सर्वाधिक धावा = यशस्वी जयस्वाल
- सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष = यशस्वी जयस्वाल
- पॉली उम्रिगर सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार (पुरुष) = शुभमन गील
- सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला = दीप्ती शर्मा
11) केंद्र सरकारकडून 2024 पद्म पुरस्कारांची घोषणा; 110 जणांना पद्मश्री
- पद्मविभूषण
- वैंकया नायडू
- चिरंजिवी
- वैजंयतीमाला बाली
- ब्रिंदेश्वर पाठक (मरणोत्तर)
- पद्मा सुब्रमण्यम
- पद्मभूषण (महाराष्ट्रातील मानकरी)
- हुरमुसजी कामा
- अश्विन मेहता
- राम नाईक
- दत्तात्रय मायायो उर्फ राजदत्त
- प्यारेलाल शर्मा
- कुंदन व्यास
- मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत.
- भारत सरकारने 1954 मध्ये पद्म पुरस्काराची सुरुवात केली. 1955 मध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशी वर्गवारी करुन पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
12) पद्म पुरस्कार यादी
- पद्मविभूषण (एकूण : 5)
1) माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
2) श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
3) चिरंजिवी (कला)
4) श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
5) बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
- पद्मभूषण (एकूण : 17)
महाराष्ट्रातून = 6
1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
- पद्मश्री (एकूण : 110)
महाराष्ट्रातून = 6
1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
13) कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र
- यंदा सहा जणांना कीर्तीचक्र जाहीर झाले असून त्यापैकी तिघांना तो मरणोत्तर जाहीर झाला आहे.
- कॅप्टन अंशुमन सिंह (पंजाब रेजिमेंट, २६ वी बटालियन),
- हवालदार अब्दुल माजिद (पॅराशूट रेजिमेंट, ९वी बटालियन) आणि
- शिपाई पवनकुमार (राष्ट्रीय रायफल्स, ५५ वी बटालियन)
यांना मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर झाला आहे. - मेजर दिग्विजयसिंह रावत ( पॅराशूट रेजिमेंट, २१ वी बटालियन, विशेष दल),
- मेजर दीपेंद्र विक्रम बसनेत ( शीख रेजिमेंटमधील चौथी बटालियन),
- हवालदार पवनकुमार यादव (महार रेजिमेंट २१ वी बटालियन)
यांना कीर्तीचक्र जाहीर झाला आहे.
- १६ जणांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. त्यातील दोघांना तो मरणोत्तर दिला जाईल.
- देशात शांतता काळात दिला जाणारा कीर्ती चक्र हा अशोक चक्रानंतरचा दुसऱ्या तर शौर्य चक्र तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.
14) आयसीसी पुरस्कार विजेते
- पुरुषांचे आयसीसी पुरस्कार:
- आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2023- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
- आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023- विराट कोहली (टीम इंडिया)
- आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर 2023- उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
- आयसीसी टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023- सूर्यकुमार यादव (टीम इंडिया)
- आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2023- रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
15) सुभेदार अविनाश साबळे = अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित
16) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारात ’12th फेल’ या चित्रपटाने मारली बाजी.
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (लोकप्रिय)- 12th फेल
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)- जोराम
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (ॲनिमल)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)- विक्रांत मेस्सी (12th फेल)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (डंकी)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
- सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम- ॲनिमल
17) ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते ‘अशोक सराफ’ यांना 2023 वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे
- पहिल्यांदाच अभिनेत्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे
- 2023 चा 19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-
- 2021 – आशा भोसले
- 2022 – अप्पासाहेब धर्माधिकारी
- 2023 – अशोक सराफ
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल :-
- पुरस्काराची स्थापना : 1995
- पुढील क्षेत्रसाठी : आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा.
- पुरस्कार स्वरूप : 25 लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.
- पहिला पुरस्कार : पू.ल.देशपांडे (साहित्य) 1996
- महिला: आतापर्यंत एकूण 4 महिलांना महाराष्ट्र भूषण
क्रीडा #sports
1) फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालिन सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक फ्रान्झ बेकेनबाउर यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
- खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या तीन व्यक्तींमधील बेकेनबाउर एक होते.
2) जयपूरची दिव्यकृती सिंग ठरली अश्वारूढ खेळांमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला
3) आशिया चषक फुटबॉल स्पर्धा
- यंदाचे १८ वे पर्व आशिया चषक फुटबॉल स्पर्धा २०२३ = कतार
- विश्वचषक स्पर्धेपाठोपाठ आता आशियातील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी कतारला मिळणार आहे.
- भारतीय संघ पाचव्यांदा आशिया चषक फुटबॉलमध्ये खेळणार आहे. भारताने १९६४ साली या स्पर्धेत पदार्पण केले होते आणि चार संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
4) महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन = 15 जानेवारी
- 2024 म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच हा दिवस साजरा होत आहे.
- हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती 15 जानेवारी हा दिवस या वर्षीपासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याची घोषणा मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
5) सुमित नागलने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.
- पहिल्या फेरीत त्याने जागतिक मानांकनात २७ व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुब्लीकला ६-४, ६-२, ७-६ असा पराभवाचा धक्का दिला.
- रमेश कृष्णन यांच्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी भारतीय खेळाडूने एकेरीत मानांकित खेळाडूला पराभूत केले आहे.
6) राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राला विजेतेपद
- 2024 युवा महोत्सव = नाशिक
7) रोहित शर्माने अफगाणिस्तान विरूद्ध शतक झळकावले
- T20 मध्ये सर्वाधिक 5 शतके – रोहित शर्मा
- 2024 मधील पहिले शतक – रोहित शर्मा
8) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मागील ४ वर्ष हा पुरस्कार सोहळा झालाच नव्हता आणि आज हैदराबाद येथे ३ वर्षांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
- भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व फारुख इंजिनियर्स यांचा सीके नायुडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
9) BCCI अवॉर्ड 2022-23
- माधवराव सिंधिया पुरस्कार = मयंक अग्रवाल
- दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटीत सर्वाधिक धावा = यशस्वी जयस्वाल
- सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष = यशस्वी जयस्वाल
- पॉली उम्रिगर सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार (पुरुष) = शुभमन गील
- सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला = दीप्ती शर्मा
10) ICC सर्वोत्तम कसोटी क्रिकेट संघ 2023
- नेतृत्व = पॅट कमिन्स
- भारतीय = रवींद्र जडेजा, आर आश्विन
11) आयसीसी सर्वोत्तम ODI संघ 2023
- नेतृत्व = रोहित शर्मा
- भारतीय = रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
12) ICC सर्वोत्तम T20 क्रिकेट संघ 2023
- नेतृत्व = सूर्यकुमार यादव
- भारतीय = यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग
13) 𝗜𝗖𝗖 𝗠𝗲𝗻’𝘀 𝗢𝗗𝗜 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗬𝗲𝗮𝗿 𝟮𝟬𝟮𝟯
- विराटने विक्रमी चौथ्यांदा एकदिवसीय सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे.
- २०१२, २०१७ आणि २०१८ मध्येही विराट ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’ बनला होता. विराट कोहलीचा हा १० वा आयसीसी पुरस्कार आहे.
- सर्वांत जास्त आयसीसी अवार्ड जिंकणारा खेळाडू = विराट कोहली (10 वेळा)
14) आयसीसी पुरस्कार विजेते
- पुरुषांचे आयसीसी पुरस्कार:
- आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2023- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
- आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023- विराट कोहली (टीम इंडिया)
- आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर 2023- उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
- .आयसीसी टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023- सूर्यकुमार यादव (टीम इंडिया)
- आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2023- रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
15) रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन (ऑस्ट्रेलिया) या जोडीने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद.
- रोहन बोपण्णा सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेता ठरला. 43 व्या वर्षी जेतेपद
16) इटलीचा यानिक सिन्नर ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चा नवा चॅम्पियन!
- अंतिम सामन्यात त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा 6-3, 6-3, 4-6, 4-6, 3-6 असा पराभव केला.
- ऑस्ट्रेलियन ओपनला तब्बल 10 वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला आहे.
17) ऑस्ट्रेलियन ओपनची महिला टेनिस विजेती = बेलारूस ची आर्यना सब्लेंका.
- तिने चीन च्या ‘क्यू झेंग’ ला पराभूत केले
18) 6 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा चेन्नई, 2023 = तामिळनाडू
19 जानेवारी ते 31 जानेवारी 2024
- स्पर्धा जरी 2024 मधे होत असल्या तरी त्या 2023 च्या स्पर्धा आहेत.
व्यक्तिविशेष #personality
1) रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक
2) उस्ताद रशीद खान यांचे निधन.
- पुरस्कार
- 2006 = पद्मश्री पुरस्कार
- 2006 = संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- 2010 = जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार (GIMA)
- 2022 = पद्मभूषण पुरस्कार
3) गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन
- हिंदुस्तानी संगीतातील ज्येष्ठ गायिका
- प्रभा अत्रे यांच्याविषयी
- रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आबासाहेब अत्रे आणि इंदिराबाई अत्रे यांच्या घरामध्ये १३ सप्टेंबर १९३२ रोजी प्रभा अत्रे यांचा जन्म झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या.
- संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान आणि आयएलएस विधी महाविद्यालयातून कायदा विषयांत पदवी संपादन केली.
- संगीतातील सरगम गानप्रकारावर संशोधन आणि प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. (डॉक्टर ऑफ म्युझिक) संपादन केली.
- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, नवनवीन बंदिशी रचणाऱ्या वाग्येयकार, मुक्तहस्ताने विद्यादान करणाऱ्या गुरू, संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री, संगीत विचारवंत, लेखिका, कवयित्री अशी बहुआयामी ओळख.
- डॉ. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’ या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये ‘पद्मश्री’, २००२ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार
4) शायर मुनव्वर राणा यांचे निधन
- मुनव्वर राणा यांचा जन्म १९५२ साली रायबरेली येथे झाला.
- उर्दू साहित्यातल्या अमूल्य योगदानासाठी २०१४ मध्ये राणा यांना त्यांच्या ‘शाहदाबा’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच २०१२ मध्ये त्यांना ‘माटी रतन सन्मान’ प्रदान करण्यात आला.
- त्यांची ‘मां’ ही गझल सर्वात प्रसिद्ध कवितांपैकी एक मानली जाते
5) कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’
- कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले पहिले बिगर काँग्रेसी समाजवादी नेते होते. त्यांनी डिसेंबर १९७० ते जून १९७१ आणि डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्री भूषवले. त्यांना ‘जननायक’ असेही संबोधले जाते.
- त्यांना देशातील ओबीसी आणि ईबीसी आरक्षणाचे प्रवर्तक मानले जाते. १९७८ मध्ये एकस्तरित आरक्षण व्यवस्था लागू केली होती. लागू केलेल्या २६ टक्के आरक्षणात ओबीसींना १२ टक्के, ओबीसींमधील आर्थिक मागासांना ८ टक्के, महिलांना ३ टक्के आणि उच्च जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना ३ टक्के आरक्षण अशी तरतूद त्यांनी केली होती.
- ठाकूर यांनी १९४२ ते १९४५ दरम्यान भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. समाजवादी चळवळीचे नेते राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या दिग्गजाकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती. जयप्रकाश नारायण यांच्याही ते निकटचे होते. सन १९८८मध्ये ठाकूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावाला कर्पुरी ग्राम असे नाव देण्यात आले.
- मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार असून कर्पूरी ठाकूर यांची 24 जानेवारी रोजी 100 वी जयंती होती. याच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने त्यांना हा सन्मान देण्याची घोषणा केली आहे.
- सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते बिहारमधील तिसरे व्यक्ती – त्यांच्या आधी हा सन्मान पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना देण्यात आला होता.
- भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आतापर्यंत 17 जणांना मरणोत्तर देऊन एकूण 49 जणांना प्रदान करण्यात आला आहे.
6) ATM चे जनक ‘प्रभाकर देवधर’ यांचे निधन
- बँकांना लागणारे देशातील पहिले एटीएम त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र साठी तयार केले होते.
- त्यांनी अद्ययावत स्वयंचलित पेट्रोल पंप सुद्धा तयार केले होते.
- केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे ते अध्यक्ष होते.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel