Current Affairs | चालू घडामोडी | 27 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 27 JAN 2024

1) 27 जानेवारी

  • पृथ्वी 2 क्षेपणास्त्र चाचणी = 1996
    • जमिनीवरून जमिनीवर मारा
    • पल्ला = 250 ते 350 किमी
  • बालभारती स्थापना = 27 जानेवारी 1967
    • महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
  • पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची जयंती

2) न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांची न्यायमूर्ती पदी नियुक्ती.

  • सर्वोच्च न्यायालयात आता 34 न्यायाधीश.
  • प्रथमच दलीत समाजातील 3 वर्तमान न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात असतील.

3) अधिसूचना – मराठा आरक्षण

  • मनोज जरांगे-पाटलांच्या मागणीनुसार अधिसूचना
  • सगेसोयरे व्याख्या.
    • जर एखाद्याचे कुणबी प्रमाणपत्र निघालेले असेल तर त्याच्या नात्यातील सर्वांना (मामा,आत्या,मावशी, ई.)त्याचा लाभ घेता येईल.
    • यासाठी एक शपथपत्र दिल्यानंतर गृह चौकशी अहवाल(शक्यतो ग्रामीण भागात तलाठी करेल) प्राप्त झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल.

4) मराठीस ज्ञानभाषा बनविणारे क्रियाशील पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची २७ जानेवारीस १२३ वी जयंती

  • धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे २७ जानेवारी १९०१ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म झाला.
  • काशी येथे शिक्षण घेऊन १९२३ ला कोलकत्याच्या शासकीय महाविद्यालयातून (आताचे संस्कृत विद्यापीठ) ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली
  • धर्मसुधारणा करण्यात १९२३ पासून अग्रभागी असलेले तर्कतीर्थ यांनी विविध ब्राह्मण, ज्ञाती सभा, धर्म परिषदा, ब्राह्मण महासंमेलनांमधून हिंदू धर्म सुधारणांचा आग्रह धरत मानवकल्याणाची भूमिका मांडली.
  • बागलाण सत्याग्रह, ज्यांचे वर्णन ब्रिटिश इंटिलिजन्स रिपोर्टमध्ये ‘मिनी बारडोली सत्याग्रह’ असे केले होत. त्याचे संघटक व नेतृत्व तर्कतीर्थ यांचे होते. यात गोळीबार झाला होता. तर्कतीर्थ ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले होते. पुढे फितुरीने त्यांना अटक झाली व सहा महिने कैद झाली.
  • कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांच्या संपर्कात येऊन तर्कतीर्थ जोशी मार्क्सवादी विचारांशी जोडले गेले. रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘रॅडिकल डेमॉक्रेटिक पार्टी’चे महाराष्ट्र प्रांतिक चिटणीस बनले. १९४८ पर्यंत तर्कतीर्थ रॉयवादी होते.
  • १९४४ ला या पक्षाच्या विसर्जनानंतर ते १९५० च्या दरम्यान स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले व यशवंतराव चव्हाण यांचे खंदे समर्थक बनले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आक्रमक वळण मिळाले. गोळीबारात १०५ जणांनी प्राणार्पण केले.
  • पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले तसे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीचे कर्णधार बनले. पुढे आयुष्यभर कोशसंपादन, ग्रंथनिर्मिती, प्रबोधन, इत्यादीद्वारे यांनी मराठी ज्ञानभाषा बनविण्यासाठी उर्वरित आयुष्य समर्पित केले.
  • १९२३ मध्ये ‘धर्मसंशोधनाची दिशा’ शीर्षकाचा लेख लिहून तर्कतीर्थ जोशी यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ केला. याच विषयावर संस्कृतमध्ये लिहिलेला ‘गु‌द्धिसर्वस्वम्’ प्रबंध बहुचर्चित झाला. त्यांच्या ‘आनंद‌मीमांसा’ (१९२८) आणि ‘जडवाद अर्थात् अनिश्वरवाद’ (१९४१) या नवविचार मांडणी करणाऱ्या विचारांचे, प्रबंधांचे स्वागत होऊन ते मराठी समीक्षेत दाखल झाले.
  • १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या ३७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. ‘हिंदुधर्माची समीक्षा’ (१९४१) ग्रंथ मार्क्सवादी दृष्टीने केलेल्या लेखनामुळे बहुचर्चित झाला.
    • १९५१ ला प्रसिद्ध झालेल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ ग्रंथास साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. तर्कतीर्थ ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळालेले पहिले मराठी साहित्यकार होत.
  • मानवेंद्रनाथ रॉय त्यांना ‘मॅन ऑफ इंडियन रेनासान्स’ म्हणून गौरवत असत. तर महात्मा गांधींनी त्यांचा गौरव ‘मॅन ऑफ ग्रेट लर्निंग अँड स्पॉटलेस कॅरॅक्टर’ अशा शब्दांत केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींनी संस्कृत, मराठीत अनेक प्रबंध, चरित्रे, व्यक्तिलेख लिहिले.
  • त्यांचा ‘ज्योति-निबंध’ महात्मा फुले यांच्यावरील प्रारंभिक लेखनापैकी एक होय. त्यांनी लिहिलेले ‘ज्योतिचरित्र’ मराठीसह हिंदी, इंग्रजीत प्रसिद्ध झाल्याने महात्मा फुले यांचे जीवनकार्य विश्वपटलावर पोहोचले.
  • ‘मराठी विश्वकोश’ (२० खंड), मीमांसा कोश (सातवा खंड), धर्मकोश (२० खंड), पदनाम कोश-३०चे संपादन म्हणजे मराठी कोशनिर्मितीचे सुवर्णयुगच.

5) रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन (ऑस्ट्रेलिया) या जोडीने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद.

  • रोहन बोपण्णा सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेता ठरला. 43 व्या वर्षी जेतेपद

6) सध्या महाराष्ट्रात कुणाला किती आरक्षण?

  1. SC. = 13%
  2. ST = 7%
  3. OBC = 19%
  4. VJ & NT = 11%
  5. SBC = 2%
  6. EWS = 10%
    एकूण = 62%

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment