Current Affairs | चालू घडामोडी | 25 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 25 JAN 2024

1) 25 जानेवारी

 • राष्ट्रीय मतदार दिन (2011 पासून)
  • भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना (कलम 324) = 25 जानेवारी 1950
  • पहिले निवडणूक आयुक्त = सुकुमार सेन
  • 25 वे निवडणूक आयुक्त = राजीव कुमार
  • व्ही.एस.रमादेवी = भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त बनणाऱ्या पहिल्या महिला .
 • राष्ट्रीय पर्यटन दिन = 25 जानेवारी

2) ताडोबा-अंधारी, पेंच व्याघ्रप्रकल्पात गिधाड संवर्धन

3) राष्ट्रीय मतदार दिन = २५ जानेवारी

 • 2011 पासून दरवर्षी भारतात हा दिवस साजरा केला जातो
 • भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना (कलम 324) = 25 जानेवारी 1950 रोजी झाली त्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो
 • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी मतदार शिक्षण व निवडणूक साक्षरतेचे अभ्यासक्रम तयार केले असून त्यासाठी आवश्यक श्रेयांक देण्यात येणार आहेत.
 • निवडणूक साक्षरतेसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

4) राष्ट्रीय पर्यटन दिवस = 25 जानेवारी

 • प्रवास हा स्वत:बद्दल अधिक जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रवासात समस्या आणि संधी दोन्ही असतात. ज्या पद्धतीने तुम्ही ते हाताळता त्यावरून तुम्ही कोण आहात, याची जाणीव होते. हिमालयात योगा शिकणे, स्पेनला जाऊन स्पॅनिश शिकणे, लॉर्ड्सवर क्रिकेट मॅच बघणे किंवा कांजिरंगात जाऊन गेंडा बघणे, असे जे आपण घरी करू शकत नाही, ते अनुभव प्रवासातच घेऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडा आणि जग अनुभवा. सर्वांना पर्यटन दिनाच्या शुभेच्छा.

5)लोणार सरोवराला लवकरच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा.

 • 2020 साली रामसर स्थळाचा दर्जा

6) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर (‘मनरेगा’)

 • यंदा ‘मनरेगा’च्या मजुरीचा दर २५६ रुपये आहे. या योजनेत हजेरीपत्रक बंद झाल्यावर १५ दिवसाच्या आत मजुरी मजुराच्याबँक किंवा पोस्टातील खात्यात जमा करण्याची सक्ती आहे. अन्यथा ०.५ टक्के प्रतिदिन विलंब आकार सरकारला द्यावा लागतो.

7) संविधानभान
विविध राजेशाही संस्थानातील संविधान

 • इंदौरचे दिवाण सर तंजोर माधवराव यांनी १८७४ साली संविधान लिहिले होते.
  • प्रभावी प्रशासनासाठी हे संविधान उपयुक्त होते.
  • या संविधानाने कायद्याचे राज्य स्थापित केले होते.
  • अभिव्यक्तीचे आणि सभेचे स्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य मान्य केले होते.
  • अगदी खासगी संपत्तीचा हक्कही असला पाहिजे, अशी तरतूद त्यात होती.
  • धार्मिक सहिष्णुतेच्या तत्त्वाला महत्त्व दिले होते.
 • म्हैसूर संस्थान
  • या संस्थानात लोकशाही होती. वडियार राजांनी कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा तिथे प्रयत्न केला होता.
  • १८८१ पासून या संस्थानात निवडणुका होऊ लागल्या.
  • येथे प्रजा प्रतिनिधी सभा हे लोकप्रतिनिधींचे सभागृह स्थापित केले होते. काँग्रेस या संस्थानात सक्रिय होती.
  • तिथे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. जिल्हा मंडळ, तालुका मंडळ आणि महापालिका अशा त्रिस्तरीय पद्धतीने पंचायतराज रचना अस्तित्वात आली होती.
  • १९३८ साली म्हैसूर संस्थानात ‘ध्वज सत्याग्रह’ सुरू झाल्यावर पोलिसांनी गोळीबार केला आणि तीव्र संघर्ष सुरू झाला.
 • कोल्हापूर संस्थान आणि शाहू महाराज
  • शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला.
  • राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते असावेत.
  • अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहू महाराजांनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला.
  • १९१८-१९ मध्ये त्यांनी त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले आणि अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले.
  • तसेच महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी’ पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले.
  • १९१८ साली खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही बलुतेपद्धतीतून मुक्त केले. समाजातील सर्व उद्याोगधंदे त्यांच्यासाठी खुले केले.
  • १९२० साली जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा केला.
  • सर्वांना समान व मोफत शिक्षणाचा हक्क शाहू महाराजांनी दिला. सामाजिक न्यायाचे तत्त्वच शाहू महाराजांनी अमलात आणले.

8) 𝗜𝗖𝗖 𝗠𝗲𝗻’𝘀 𝗢𝗗𝗜 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗬𝗲𝗮𝗿 𝟮𝟬𝟮𝟯

 • विराटने विक्रमी चौथ्यांदा एकदिवसीय सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे.
 • २०१२, २०१७ आणि २०१८ मध्येही विराट ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’ बनला होता. विराट कोहलीचा हा १० वा आयसीसी पुरस्कार आहे.
 • सर्वांत जास्त आयसीसी अवार्ड जिंकणारा खेळाडू = विराट कोहली (10 वेळा)

9) केंद्र सरकारकडून 2024 पद्म पुरस्कारांची घोषणा; 110 जणांना पद्मश्री

 • पद्मविभूषण
  • वैंकया नायडू
  • चिरंजिवी
  • वैजंयतीमाला बाली
  • ब्रिंदेश्वर पाठक (मरणोत्तर)
  • पद्मा सुब्रमण्यम
 • पद्मभूषण (महाराष्ट्रातील मानकरी)
  • हुरमुसजी कामा
  • अश्विन मेहता
  • राम नाईक
  • दत्तात्रय मायायो उर्फ राजदत्त
  • प्यारेलाल शर्मा
  • कुंदन व्यास
 • मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत.
 • भारत सरकारने 1954 मध्ये पद्म पुरस्काराची सुरुवात केली. 1955 मध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशी वर्गवारी करुन पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment