Current Affairs | चालू घडामोडी | 24 JAN 2024
1) 24 जानेवारी
- संविधानावर स्वाक्षरी = 24 जानेवारी 1950
- राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गाणे यांचा स्वीकार = 24 जानेवारी 1950
- राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड = 24 जानेवारी 1950
- होमी भाभा पुण्यतिथी = 24 जानेवारी 1966
- भारतीय अणुशास्त्रज्ञ
- BARC (1954) स्थापनेत सहभाग
2) कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’
- कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले पहिले बिगर काँग्रेसी समाजवादी नेते होते. त्यांनी डिसेंबर १९७० ते जून १९७१ आणि डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्री भूषवले. त्यांना ‘जननायक’ असेही संबोधले जाते.
- त्यांना देशातील ओबीसी आणि ईबीसी आरक्षणाचे प्रवर्तक मानले जाते. १९७८ मध्ये एकस्तरित आरक्षण व्यवस्था लागू केली होती. लागू केलेल्या २६ टक्के आरक्षणात ओबीसींना १२ टक्के, ओबीसींमधील आर्थिक मागासांना ८ टक्के, महिलांना ३ टक्के आणि उच्च जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना ३ टक्के आरक्षण अशी तरतूद त्यांनी केली होती.
- ठाकूर यांनी १९४२ ते १९४५ दरम्यान भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. समाजवादी चळवळीचे नेते राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या दिग्गजाकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती. जयप्रकाश नारायण यांच्याही ते निकटचे होते. सन १९८८मध्ये ठाकूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावाला कर्पुरी ग्राम असे नाव देण्यात आले.
- बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा.
- मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार असून कर्पूरी ठाकूर यांची 24 जानेवारी रोजी 100 वी जयंती आहे. याच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने त्यांना हा सन्मान देण्याची घोषणा केली आहे.
- सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते बिहारमधील तिसरे व्यक्ती – त्यांच्या आधी हा सन्मान पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना देण्यात आला होता.
- भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आतापर्यंत 17 जणांना मरणोत्तर देऊन एकूण 49 जणांना प्रदान करण्यात आला आहे.
3) शिक्षण हक्क कायद्यानुसार वाहतूक भत्त्यासाठी १९ हजार विद्यार्थी पात्र
- या निर्णयामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
- शिक्षण हक्क कायद्यानुसार (2009)
- पहिली ते पाचवीच्या स्तरावर एक किलोमीटरच्या आत शाळा
- सहावी ते आठवीच्या स्तरावर तीन किलोमीटरच्या आत शाळा
- तसेच पाच किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा, वाहतूक भत्ता देण्यात येतो.
- गेल्या काही महिन्यांत राज्यात समूह शाळांची निर्मिती करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. आता शासन निर्णयात कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असे याच शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
4) संविधानभान
‘संविधान आणि औंध संस्थान’
- औंध संस्थान = इतर संस्थानांच्या तुलनेत ते छोटे म्हणजे ७२ खेड्यांचे होते. ही खेडी सलग नव्हती. ती सांगली, सातारा, सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यात विभागलेली होती. कऱ्हाडला असलेली गादी इंग्रजांच्या ताब्यामुळे औंधला गेली.
- या संस्थानाचे शेवटचे राजे होते भवानराव पंतप्रतिनिधी. ते महात्मा गांधींच्या विचारांनी भारावलेले होते. स्वयंपूर्ण खेडे आणि स्वराज्य या कल्पना प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होते.
- मॉरिस फ्रीडमन हे भवानरावांचे पुत्र आप्पासाहेब यांचे मित्र. फ्रीडमन यांच्या सल्ल्यानुसार भवानरावांनी वर्ध्यामध्ये गांधींची भेट घेतली. स्वराज्य या विचाराविषयी चर्चा झाली. त्यानुसार १९३८ साली भवानराव पंतप्रतिनिधींनी सत्तेचा त्याग केला आणि लोकांची सत्ता स्थापन करण्याची घोषणा केली. २१ जानेवारी १९३९ रोजी त्यांनी औंध संस्थानाचे नवे संविधान लागू केले.
- १९१७ पासून त्यांनी औंध संस्थानांमधील गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली होती. आरोपींना मुक्त तुरुंगात राहून स्वसंयमाने स्वत:त बदल घडवून आणणे त्यांना अपेक्षित होते.
- या नव्या संविधानानुसार सर्व लोकांना मतदानाचा हक्क देण्यात आला मात्र साक्षर लोकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा असे गांधींनी ‘हरिजन’मध्ये लिहिले. त्यामुळे भवानरावांनी औंध संस्थानातील निरक्षरता कमी करण्यासाठी २० हून अधिक शाळांची स्थापना केली.
- संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण समान व मोफत असेल, अशी तरतूद केली.
- पंचायत राज व्यवस्थेचा अनोखा प्रयोग या संस्थानात सुरू झाला. ग्रामस्वराज्य आणि सामाजिक एकता यांवर आधारलेले संविधान लागू झाले.
- संस्थानात निवडणुका झाल्या आणि आप्पा पंत हे नवे पंतप्रधान झाले. पुढे १९४३ मध्ये रामाप्पा बिद्री पंतप्रधान झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औंध संस्थान स्वतंत्र भारतात सामील झाले.
- छोटे संस्थान असले तरी त्यांनी राबवलेला प्रयोग अनोखा होता म्हणूनच पं. नेहरू हा प्रयोग पाहण्यासाठी औंध संस्थानात आले होते. शिवाय ‘चले जाव’ चळवळ आणि प्रतिसरकार स्थापना यामध्ये सक्रिय असणाऱ्या क्रांतिकाऱ्यांना या संस्थानाची मदत झाली होती.
- आप्पा पंतांनी ‘मुलुखावेगळा राजा’ असे पुस्तक भवानराव पंतप्रतिनिधींविषयी लिहिले.
- सर्वांना योगा, सूर्यनमस्कार करायला लावून शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवायला सांगणारे बहुआयामी भवानराव १९३५ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते.
5) संगणक = हुशार सांगकाम्या
- संगणकाचे पाच प्रमुख घटक असतात.
- इनपुट-आउटपुट युनिट्स,
- स्मृती युनिट,
- आकडेमोड आणि तार्किक युनिट,
- बॅकिंग स्टोअर युनिट,
- नियंत्रण युनिट (Control Unit)
- इनपुट युनिट माणसांना कळणाऱ्या माहितीचे, म्हणजे मुद्रित मजकूर, रेखाचित्रे किंवा आवाज इत्यादीचे संगणकास कळणाऱ्या बायनरी कोडमध्ये रूपांतर करतात. उदा. संगणकाचा कीबोर्ड, माउस, मायक्रोफोन, स्कॅनर
- आउटपुट युनिट संगणकाने निर्माण केलेल्या बायनरी कोडचे माणसांना कळणाऱ्या माहितीत रूपांतर करतात. उदा. प्रिंटर, स्पीकर आणि संगणकाचा स्क्रीन
- इनपुट युनिट्सद्वारा संगणकात दोन प्रकारची माहिती भरली जाते. आज्ञावली आणि विदा.
- नियंत्रण युनिटद्वारे या आज्ञावलीतील प्रत्येक आज्ञेला कार्यान्वित केले जाते. त्या आज्ञेनुसार इनपुट युनिटकडून माहिती घेणे किंवा आउटपुट युनिटकडे माहिती पाठवणे
- संगणकाला सर्व आज्ञावली अशा प्रकारे संग्रहित केल्या जाणे आवश्यक असते, की त्या गरज पडल्यास वेगाने संगणकाच्या स्मृतीमध्ये हस्तांतरित केल्या जाऊ शकतील. हे काम बॅकिंग स्टोअर युनिट करते. उदा. हार्ड डिस्क, फ्लॅश ड्राइव्ह
6) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले.
- मागील ४ वर्ष हा पुरस्कार सोहळा झालाच नव्हता आणि आज हैदराबाद येथे ३ वर्षांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
- भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व फारुख इंजिनियर्स यांचा सीके नायुडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
- BCCI अवॉर्ड 2022-23
- माधवराव सिंधिया पुरस्कार = मयंक अग्रवाल
- दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटीत सर्वाधिक धावा = यशस्वी जयस्वाल
- सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष = यशस्वी जयस्वाल
- पॉली उम्रिगर सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार (पुरुष) = शुभमन गील
- सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला = दीप्ती शर्मा
7) आयसीसी पुरस्कार 2023
- टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर = सूर्यकुमार यादव (सलग दुसऱ्या वर्षी)
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel