Current Affairs | चालू घडामोडी | 03 JAN 2024
1) राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्तीची निवड ठरली. अरुण योगीराज यांनी साकारालं श्रीरामाचं लोभस रुप
2) स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती
- 3 जानेवारी :- बालिका दिन
- 3 जानेवारी :- महिला शिक्षण दिन
3) सावित्रीबाई फुले
जन्म = 3 जानेवारी 1831
- 1840 = ज्योतिराव फुले यांच्याबरोबर विवाह
- 1847 = अध्यापनाचे शिक्षण पूर्ण
- 1 जानेवारी 1848 = भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू
- 1849-50 = पुणे-सातारा या जिल्ह्यांत शाळेची स्थापना
- 1849 = ज्योतिरावांसोबत सोबत गृहत्याग
- 1852 = महिला सेवा मंडळाची स्थापना
- 1854 = प्रौढ साक्षरता अभियान
- 1855 = रात्रशाळेची स्थापना
- 1856 = ज्योतिबांची भाषणे संपादन
- 1863 = विधवा पुनर्विवाहास सहाय्य
- 1863 = बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना
- 1868 = घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला
- 1873 = सत्यशोधक समाजाची स्थापना
- 1875-77 = दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व
- 1890 = महात्मा फुले यांचे निधन
- 1896-97 = प्लेग पिडीतांसाठी दवाखाना
- निधन= 10 मार्च 1897
- पुस्तके= काव्यफुले, बावन्नकशी सुबोध रत्नाकर
- 2014 = पुणे विद्यापीठाचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नामांतर
4) मनोधैर्य योजनेचा विस्तार.
- अत्याचार, लैंगिक शोषण तसेच Acid हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनाचा विस्तार करण्यात आला आहे.
- राज्यात 2013 मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली
- कायमचे अपंगत्व आल्यास अशा पीडित व्यक्तीस 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.
5) संविधान = देशाचा स्वप्ननकाशा
- संविधानाने आपणा भारतीयांना दिलेली ‘ओळख’ कुणाच्या अस्मितेवर आधारित नसून मूल्यांवर आधारलेली आहे.
- आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत आपण जे जे नाकारले, ते ते पाकिस्तानने त्यांच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेत घातले : अल्लाचे स्मरण, जिनांप्रति कृतज्ञता आणि इस्लामी सामाजिक न्यायावर आधारित देश हे उल्लेख पाकिस्तानी राज्यघटनेच्या उद्देशिकेत आहेत. आपल्या व पाकिस्तानच्या उद्देशिकांतील हा फरक केवळ शब्दांचा नव्हे, तर भूमिकांचा आहे.
- एका धर्माला, एका अल्लाला मानत असूनही पाकिस्तान फुटतो आणि भारत सर्वधर्मसमभाव मानून यशस्वी घोडदौड करतो आहे. हा फरक प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायला हवा.
6) उद्देशिका : संविधानाचे तत्त्वज्ञान
- ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होणारी ही उद्देशिका केवळ एका वाक्याची आहे. या एका वाक्यात भारत देशाची भूमिका सुबद्धपणे विशद केली गेली आहे.
- दिवंगत विधिज्ञ नानी पालखीवाला यांनी उद्देशिकेला ‘संविधानाचे ओळखपत्र’ म्हटले आहे.
- उद्देशिका संविधानाच्या सुरुवातीला असली तरी ती संविधान सभेच्या शेवटच्या टप्प्यात १७ ऑक्टोबर १९४९ रोजी चर्चेला आली. संविधानाच्या एकूण तरतुदींशी सुसंगत राहावी म्हणून ती शेवटी चर्चेला घेतल्याचे संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले आहे.
- मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्देशिका जशी मांडली तशीच ती मंजूर झाली. मात्र दरम्यान खूप दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. मात्र सर्व सुचवलेल्या दुरुस्त्यांचा मतदानात पराभव झाला आणि आहे तशी उद्देशिका स्विकारण्यात आली.
- १९२८ च्या मोतिलाल नेहरू समितीच्या अहवालात धर्मस्वातंत्र्य नमूद करण्यात आले होते. १९३१ च्या कराची अधिवेशनात मूलभूत अधिकारांचा ठराव संमत झाला. त्यात धर्मस्वातंत्र्य हे व्यक्तीला असेल; तथापि सरकार धर्माबाबत तटस्थ असेल असे म्हटले होते.
7) 27 ते 29 जानेवारीदरम्यान विश्व मराठी संमेलन नवी मुंबईतील वाशी मधे.
8) वाहतूकदारांचा संप मागे
- ‘हिट अँड रन’ प्रकरणांमध्ये शिक्षेच्या कठोर तरतुदींविरोधात ट्रक वाहतूकदारांना तूर्त अभय देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर वाहतूकदारांनी देशव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
9) गुगल पे आणि पेटीएमशी स्पर्धा करण्यासाठी आता बाजारात येणार टाटा पे, RBI ने दिली मंजुरी.
10) Mediterranean Sea
1) African countries- METAL
( Morocco, Egypt, Tunisia, Algeria, Libya);
2) Asian countries- C.LIST
( Cyprus, Lebanon, Israel, Syria, Turkey );
3) European countries-
MAMMI.G.SC.BSF ( Mammi G Salutes Commander of BSF)
(Malta, Albania, Monocco, Montenegro, Italy, Greece, Slovenia, Croatia, Bosnia Herzegovina, Spain, France.)
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel