Current Affairs | चालू घडामोडी | 31 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 31 JAN 2024

1) राष्ट्रीय महिला आयोग स्थापन = 31 जानेवारी 1992

  • राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार वैधानिक दर्जा
  • दिवाणी न्यायालयाचे अधिकार
  • पहिल्या अध्यक्ष = जयंती पटनाईक
  • सध्याच्या अध्यक्ष = रेखा शर्मा

2) देशात ‘हिम बिबट्यां’ची संख्या ७१८; पहिला अहवाल जाहीर.

  • भारतात आढळणाऱ्या ‘हिम बिबट्यां’चा पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर झाला असून भारतात सद्या:स्थितीत या प्रजातीचे ७१८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देशातील निम्म्यापेक्षा जास्त, ४७७ हिम बिबटे एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत.

3) लेखानुदानाचे महत्त्व काय?

  • नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल २०२४ पासून सुरू होईल. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होऊन नवीन संसद सदस्यांसह, नवे सरकार केंद्रात स्थानापन्न झालेले असेल. त्यामुळे लवकरच मावळत असलेल्या लोकसभेला संपूर्ण अर्थसंकल्पावर मतदान करता येत नाही. यासाठी सरकारला तात्पुरत्या अवधीसाठी देशाचा कारभार चालवता येण्यासाठी निधीची गरज लक्षात घेऊन, ही लेखानुदानाची घटनात्मक तरतूद आहे.
  • एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित असून, यंदा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प त्यानंतर म्हणजे जूनमध्ये सादर केला जाईल.

4) इंडिया अर्थात भारत!

  • आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये इंग्रजीत ‘इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे.
  • जवाहरलाल नेहरू यांनी ९ ऑगस्ट १९४६ रोजी संविधान सभेच्या अगदी प्रारंभी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यात देशासाठीचे संबोधन केवळ ‘इंडिया’ असे होते.
    • १ ऑक्टोबर १९४७ ला संविधान सभेचे सल्लागार बी. एन. राव यांनी सादर केलेल्या संविधानाच्या प्राथमिक मसुद्यातही फक्त ‘इंडिया’ होते.
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने ४ नोव्हेंबर १९४८ ला संविधान सभेत सादर केलेल्या संविधानाच्या मसुद्यातही देशाचे नाव ‘इंडिया’ एवढेच होते.
    • घटनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा या तिन्ही दस्तावेजांत ‘भारत’ हे नाव आलेले नव्हते. १७ सप्टेंबर १९४९ रोजी आपल्या मसुद्याच्या अनुच्छेद १ मध्ये दुरुस्ती करणारा प्रस्ताव डॉ. आंबेडकरांनी संविधान समितीत मांडला.
    • ‘इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ ऐवजी ‘इंडिया, दॅट इज, भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ असा हा दुरुस्ती प्रस्ताव होता. या दुरुस्तीत इंडियासह भारत शब्दाचा प्रथमच संविधानात समावेश झाला.

5) अशोक सराफ – महाराष्ट्र भूषण

  • पहिल्यांदाच अभिनेत्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे
  • 2023 चा 19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-
    • 2021 – आशा भोसले
    • 2022 – अप्पासाहेब धर्माधिकारी
    • 2023 – अशोक सराफ
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल :-
    • पुरस्काराची स्थापना : 1995
    • पुढील क्षेत्रसाठी : आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा.
    • पुरस्कार स्वरूप : 25 लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.
    • पहिला पुरस्कार : पू.ल.देशपांडे (साहित्य) 1996
    • महिला: आतापर्यंत एकूण 4 महिलांना महाराष्ट्र भूषण

6) निपुण भारत

  • नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारताचे माननीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशन हा कार्यक्रम सुरु केला.
  • निपुण (NIPUN) म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी,
  • भारत सरकारची हि तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे,
  • या योजनेच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित या विषयांचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे या योजनेचे ध्येय आहे.
  • उद्देश = देशातील प्रत्येक मुलाला 2026 – 27 पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित (संख्यात्मकता) कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचण्याची, लिहिण्याची शिकण्याची क्षमता प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे

7) मानवी मेंदूत प्रथमच ‘चिप’चे प्रत्यारोपण. मनातील विचारांतून हाताळता येणार संगणक.

  • एलोन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीकडून चाचणी
  • ‘चिप’चे वैशिष्‍ट्य आणि उपयोग
    • एका छोट्या नाण्याप्रमाणे आकार
    • कंपनीने या पहिल्या उपकरणाचे नाव ‘टेलिपथी’ असे ठेवले आहे
    • मानवी मेंदू आणि संगणकामध्ये थेट संपर्क होऊ शकेल
    • जर ही मानवी चाचणी यशस्वी ठरली तर भविष्यात ‘चिप’च्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींना पाहणे शक्य होईल
    • अर्धांगवायूचे रुग्ण चालू -फिरू शकतील आणि संगणकही हाताळू शकतील.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment