Current Affairs | चालू घडामोडी | 11 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 11 JAN 2024

1. लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी

  • लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी = 11 जानेवारी 1966
    • भारत – पाकिस्तान 1965 चे युद्ध संपल्यानंतर रशियाने शांतता करार घडवून आणण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
    • ताश्कंदमध्ये 1966 साली भारताचे पंतप्रधान शास्त्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आयुब खान यांची भेट झाली.
    • ताश्कंद करारानुसार दोन्ही देशांनी आपापल्या फौजा 5 ऑगस्ट 1965 रोजी ज्या स्थितीत होत्या त्या स्थितीला आणून ठेवणे अनिवार्य होते.
    • या करारावर सह्या झाल्या नंतर त्याच रात्री शास्त्रींचे रहस्यमयरित्या निधन झाले.
    • लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते (1964-66)
    • जय जवान जय किसान चा नारा त्यांनी दिला होता.
  • कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची स्थापना = 11 जानेवारी 1911
    • अध्यक्ष = भास्करराव जाधव
  • वि.स. खांडेकर हे मराठीतील पहिले ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते साहित्यिक. जीवनासाठी साहित्य ही भूमिका घेणाऱ्या खांडेकर यांची सव्वाशेवी जयंती. = 11 जानेवारी 1898
    • ‘ययाती’ या कादंबरीला १९७४ साली ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला.
    • शिवाजी विद्यापीठानं खांडेकरांना सन्मानानं ‘डी. लिट.’ प्रदान केली.5
lal bahadur shastri

2) मूलभूत हक्कांची पूर्वपीठिका : नेहरू अहवाल

  • १९१९ च्या भारत सरकार कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी १९२७ ला सायमन आयोग नेमला. कायदा भारतासाठी, मात्र त्यात एकही भारतीय व्यक्ती नव्हती, त्यामुळे राष्ट्रीय चळवळीने सायमन आयोगावर टीका केली.
  • त्याआधीच १९२५ साली लॉर्ड बर्कनहेड यांनी संसदेत वक्तव्य केले होते, की भारतीयांनी स्वत: संविधान तयार करावे, जे सर्वांना मान्य असेल. एकप्रकारे त्यांनी भारतीयांना संविधान निर्मितीचे आव्हान दिले.
  • राष्ट्रीय चळवळीतील लोकांनी सायमन आयोगावर केवळ बहिष्कारच टाकला नाही, तर त्यांनी संविधाननिर्मितीचे आव्हान स्वीकारले.
  • १९ मे १९२८ रोजी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली.
    • अध्यक्ष = मोतीलाल नेहरू
    • सचिव = पं. जवाहरलाल नेहरू
    • सदस्य = सर अली इमाम, तेज बहाद्दूर सप्रू आणि सुभाषचंद्र बोस, अॅनी बेझंट आणि एम. आर. जयकर
  • नेहरू अहवाल = २२ प्रकरणांमध्ये विभागलेल्या या अहवालामध्ये ८७ कलमे होती.
    • नागरिकत्व, मूलभूत हक्क ते मार्गदर्शक तत्त्वे या सर्व बाबींचा समावेश या अहवालात होता.
    • मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी ज्या मतदारसंघात मुस्लीम अल्पसंख्य आहेत, तिथे त्यांना आरक्षण देण्यात आले.
    • संसदीय लोकशाहीचे प्रारूप या अहवालातून स्वीकारले गेले.
    • तसेच सर्वांना मतदानाचा हक्क असेल, अशी तरतूदही केली गेली.
  • मुस्लीम लीगने या अहवालात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले नाहीत, या मुद्द्यावरून पाठिंबा काढून घेतला.
  • नेहरू अहवालावर मत
    • ग्रॅनवील ऑस्टिन = या अहवालाने मूलभूत हक्कांची पूर्वपीठिका निर्माण केली असे म्हणाले

3) कृत्रिम बुद्धिमत्तेची घोडदौड

  • २०१० मध्ये गूगलने ‘आयफोन’मध्ये ‘अँड्रॉइड’ची नवीन आवृत्ती काढली. त्यात ‘स्पीच रेक्गनिशन’ ही प्रणाली घातली. त्यामुळे टाइप करण्याऐवजी आपण बोलून मोबाइल फोनला सूचना देऊ लागलो!
  • २०११ साली ‘आयबीएम’ या कंपनीने ‘वॅटसन’ नावाचा संगणक तयार केला. आपल्या बोलीभाषेत प्रश्न विचारणारी, उत्तरे देणारी ही यंत्रणा आहे.
  • २००९ मध्ये गूगलने चालकविरहित गाडीचा प्रकल्प सुरू केला आणि २०१३ ला त्यांच्या गाडीने सर्व चाचण्या उत्तीर्ण होऊन ड्रायव्हिंगचा परवानाही मिळवला!
  • २०१४ साली ‘अॅलेक्सा’ सुरू केले. अॅलेक्सा बऱ्याच गोष्टी करू शकते. ती माहिती देते, बातम्या सांगते, क्रिकेटचा स्कोअर सांगते, हवामान सांगते, गाणी ऐकवते.
  • २०१६ साली हॅन्सेन रोबोटिक्स कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मानवसदृश यंत्रमानव तयार केली. तिचा चेहरा हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखा दिसतो. तिचे नाव ठेवले सोफिया. बोलताना तिच्या चेहऱ्यावर माणसासारखे सर्व भाव उमटतात! सौदी अरेबियाने या सोफियाला आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले!

4) मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वाती राजे यांची निवड.

  • बारामती येथे होणाऱ्या संमेलनाचे अजित पवार उद्घाटक
Swati Raje

5) सन 2023 सर्वात उष्ण वर्ष: रिपोर्ट

6) 34 वर्षीय शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे.

  • गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत.

7) लोकशाही या मराठी न्यूज चॅनलचे लायसन्स निलंबित.

  • माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे.
  • 15 August 1947 ला हे मंत्रालय स्थापन करण्यात आले.त्याला 75 वर्ष पूर्ण झाले.

8) भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे उड्डाण

  • अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस च्यावतीने भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे हैदराबाद येथे अनावरण.

9) जयपूरची दिव्यकृती सिंग ठरली अश्वारूढ खेळांमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला.

10) केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने घोषित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ द्वारे इंदोर आणि सुरत यांना भारतातील सर्वात स्वच्छ शहरे म्हणून घोषित केले आहे.

  • स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार क्रमवारी
    • इंदोर आणि सुरत
    • नवी मुंबई
  • स्वच्छ शहर (1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या)
    • सासवड
    • पाटण
    • लोणावळा
  • महाराष्ट्राला स्वच्छ राज्याचा पुरस्कार.

11) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) / अटल सेतू

  • शिवरी ते नाव्हाशेवा (मुंबई ते नवी मुंबई)
  • भारताचा सर्वात लांब समुद्री पुल (22 किमी)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment