Current Affairs | चालू घडामोडी | 10 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 10 JAN 2024

1) 10 जानेवारी = जागतिक हिंदी दिवस

 • प्रारंभ = 2006
 • प्रथम विश्व हिंदी संमेलन, नागपूर 1975 च्या आयोजनानिम्मित साजरा केला जातो.

2) हिवाळ्यातील पाऊस

 • का पडला पाऊस?
  • वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. तेथून थंड वाऱ्याबरोबर बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने.
  • बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे मध्य भारताच्या दिशेने वाहत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण.
  • वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणारे थंड आणि बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे महाराष्ट्राच्या उत्तर भागात एकत्र.
  • महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला समांतर द्रोणीय स्थिती निर्माण.

3) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील चढउतार.

 • १९६१ साली ‘युनिमेट’ नावाचा पहिला औद्याोगिक रोबॉट जॉर्ज डेव्होल यांनी तयार केला. जनरल मोटरच्या असेंब्ली लाइनमध्ये तो वापरत.
 • १९६४ साली ‘एलिझा- १’ ही पहिली चॅटबॉट जोसेफ वाईजेनबॉम यांनी तयार केली. कॉम्प्युटर चॅटच्या माध्यमातून संवाद करू लागला.
 • १९७२ साली स्टॅन्फर्ड विद्यापीठात ‘मायसिन’ नावाची एक्स्पर्ट सिस्टीम टेड शॉर्टलिफ यांनी तयार केली. रक्तातील जंतू- संसर्गाचे निदान आणि उपचार ती करू शकत असे.
 • १९८६ साली ‘नेटटॉक’ प्रणाली तयार झाली. संगणक बोलून संवाद साधू लागला.
 • १९९७ साली आयबीएम कंपनीच्या डीप ब्ल्यू संगणकाने त्या वेळचा जगज्जेता गॅरी कॅस्पारोव्ह याला बुद्धिबळाच्या खेळात हरवले! मानवी बुद्धीपेक्षा संगणकीय बुद्धी वरचढ ठरली. सगळ्या जगाचे लक्ष या घटनेने वेधून घेतले.

4) शपथ मंत्रिपदाची

 • राज्यघटनेतील अनुच्छेद ७४ आणि १६३ नुसार उपपंतप्रधान, उपमुख्यमंत्री अशी पदे अस्तित्वात नाहीत. परिणामी त्यांच्या शपथांचाही संविधानातील परिशिष्ट अथवा तिसऱ्या अनुसूचीत समावेश नाही.
 • अनुच्छेद १८८ नुसार तिसऱ्या परिशिष्टात दिलेली शपथ कुठल्याही विधानसभा अथवा परिषदेच्या सदस्याला घेणे अनिवार्य आहे.
 • राज्यघटनेतील शपथेची कलमे
  • कलम 60  : राष्ट्रपती पदाची शपथ
  • कलम 69 : उपराष्ट्रपती पदाची शपथ
  • कलम 74 : राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रीपरिषद
  • कलम 99  : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
  • कलम 159 : राज्यपाल पदाची शपथ
  • कलम 163 : राज्यपालास सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ
  • कलम 188 : विधिमंडळातील सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे

5) अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने खेळाडूंचा गौरव.

 • राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्टला पार पडतो. मात्र, गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाल्याने पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे हा सोहळा मंगळवारी संपन्न झाला. या वेळी पॅरा खेळाडूंसह एकूण २६ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल ध्यानचंद जीवनगौरव, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अशा पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
 • खेलरत्नसाठी पदक आणि रोख २५ लाख, तर अर्जुनसाठी वीर अर्जुनाचा कांस्य पुतळा आणि रोख १५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

6) उस्ताद रशीद खान यांचे निधन = 9 जानेवारी 2024

 • पुरस्कार
  • 2006 = पद्मश्री पुरस्कार
  • 2006 = संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • 2010 = जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार (GIMA)
  • 2022 = पद्मभूषण पुरस्कार

7) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सत्तासंघर्षाचा निकाल देताना शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे.

8) सासवड, लोणावळा नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सर्वोत्तम

 • केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सासवड (ता. पुरंदर) आणि लोणावळा (ता. मावळ) या दोन्ही नगरपालिका सलग दुसऱ्यांदा देशात सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत.
 • सासवड व लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त

9) ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी-चिंचवड अव्वल पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचे सर्वेक्षण

 • मुंबई द्वितीय तर कोल्हापूरला तृतीय क्रमांक
 • पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे महापालिकांच्या ‘ई-गव्हर्नन्स’च्या सद्यस्थितीबाबत अभ्यास करण्यासाठी हा निर्देशांक तयार केला. या निर्देशांकाचे हे तिसरे वर्ष होते.

10) कॅस्पियन समुद्राला लागून असलेले देश

 • Trick = TARIK
  • T = तुर्कमेनिस्तान
  • A = अझरबैजान
  • R = रशिया
  • I = इराण
  • K = कझाकिस्तान
Caspian Sea

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment