Current Affairs | चालू घडामोडी | 09 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 09 JAN 2023

1) 9 जानेवारी

 • प्रवासी भारतीय दिवस
  • महात्मा गांधी 1915 साली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले त्या निमित्ताने हा दिवस साजरा होतो.
  • 2023 चा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार = तिरू शिवकुमार नादसेन (श्रीलंका)
 • हरगोविंद खुराणा यांची आज जयंती = 1922
  • आनुवंशिक अभियांत्रिकीचे जनक.
  • 1968 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला.

2) २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले.

3) कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स = AI)

 • जॉन मॅकार्थी यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शब्द सर्वप्रथम वापरला.
 • १९६३ साली स्टॅन्फर्ड विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
 • अनेक अभ्यासक जॉन मॅकार्थी यांच्या या क्षेत्रातील बहुमोल योगदानामुळे त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानतात

4) मालदीव सरकारातील 3 मंत्र्यांचे निलंबन.

 • मालदीवमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होऊन सत्तांतर झाले. यातून अध्यक्षपदी मोहम्मद मुईझ्झू यांची निवड झाली. ते प्रोग्रेसिव्ह अलायन्सकडून निवडणूक लढले आणि इब्राहीम सोली या तत्कालीन अध्यक्षांचा त्यांनी पराभव केला. प्रोग्रेसिव्ह अलायन्सचे सर्वेसर्वा आहेत अब्दुल्ला यामीन. त्यांना भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही.
 • पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप येथे भेट दिली व या भेटीच्या निमित्ताने मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमी व्यासपीठावर तेथील छायाचित्रे प्रसृत केली. या लघुसंदेशांमध्ये कुठेही मालदीवचा उल्लेखही नव्हता. परंतु मालदीवमधील बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर मोदींवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली
 • मुईझ्झू मंत्रिमंडळातील मरियम शिउना, माल्शा शरीफ, माहझूम माजिद या 3 मंत्र्यांनी भारतावरील चिखलफेकीत सहभागी झाले. लक्षद्वीपची तुलना मालदीवशी कधीही होऊ शकत नाही, हा युक्तिवाद पुढे अत्यंत घाणेरड्या पातळीवर घसरला. पंतप्रधान मोदी यांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत निर्भर्त्सना करण्यात आली.
  यामुळेच त्यांचे निलंबन करण्यात आले.

5) फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालिन सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक फ्रान्झ बेकेनबाउर यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

 • खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या तीन व्यक्तींमधील बेकेनबाउर एक होते.

6) बिल्किस बानो बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ११ दोषींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवितानाच सर्व दोषींना दोन आठवड्यांच्या आत पुन्हा तुरुंगात डांबण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

 • २००२ साली झालेल्या गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींदरम्यान, पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून ११ जणांना दोषी ठरवण्यात आले होते.
 • गुजरात सरकारने या सर्वांची शिक्षा माफ करून १५ ऑगस्ट २०२२ रोजी तुरुंगातून सुटका केली.
 • शिक्षामाफीचा अधिकार महाराष्ट्र शासनाचा: सर्वोच्च न्यायालय
 • दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारला अधिकार नव्हता. हा खटला मुंबईमध्ये चालला होता. त्यामुळे कायद्यानुसार दोषींच्या शिक्षामाफी याचिकेवर निर्णय घेण्याचा अधिकार गुजारात सरकारला नव्हे, तर महाराष्ट्र शासनाला होता.
 • शिक्षामाफी देऊन गुजरात सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, अशा शब्दांत खंडपीठाने ताशेरे ओढले.
 • कायदा असे सांगतो की ज्या राज्यात मूळ खटला चालला त्याच राज्य सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे.
 • बिल्किस बानोवर अत्याचार जरी गुजरात राज्यात झाले होते तरी त्या राज्यात हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले जाणार नाही, असे वाटल्याने या प्रकरणाचा खटला महाराष्ट्रात चालवला गेला.
 • याचा अर्थ बिल्किसवर अत्याचार करणाऱ्यांची शिक्षा माफ करायची असेल तर तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवा.

7) पहिली स्वदेशी असाॅल्ट रायफल तयार.

 • ‘उग्रम’ ची ‘एआरडीई’कडून निर्मिती; चाचण्यानंतर संरक्षण दलांना उपलब्ध होणार
  • प्रकार:-7.62 बाय 51 मिलिमीटरची असाॅल्ट रायफल
  • मारक क्षमता:- 500 मीटर
  • चालवण्याची पद्धत:- स्वयंचलित
  • वजन:- 4 किलोग्रॅम पेक्षा कमी
  • मॅगझीन:- 20 गोळ्या

8) ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार कॅलिफोर्निया, अमेरिका.

 • पुरस्कार यादी
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – ओपनहाइमर
  • सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट – पुअर थिंग्ज
  • दूरचित्रवाणी मालिका – सक्सेशन
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- लिली ग्लॅडस्टोन
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ड डाउनी (ओपनहाइमर)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – डा वाइन जॉय रैंडोल्फ 
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्रिस्तोफर नोलन
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन सिनेमा – द बॉय अँड द हेरॉन
  • सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अॅचिवमेंट अवॉर्ड – बार्बी

9) बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार.

 • त्यांचा पक्ष अवामी लीगनं 300 जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. 2009 पासून बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या.

10) 50 वर्षांनंतर अमेरिकेची चंद्रमोहिम

 • अमेरिकेतील ‘युनायटेड लाँच अल्लायन्स’ या कंपनीच्या ‘व्हल्कन’ या रॉकेटचे प्रक्षेपण. ‘अस्ट्रोबाॅटिक टेक्नॉलॉजी’ या खाजगी कंपनीचे लॅंडर‌ अवकाशात पाठवण्यात आले.
 • दोन्ही खाजगी कंपन्यांना नासा चे सहाय्य.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

1 thought on “Current Affairs | चालू घडामोडी | 09 JAN 2024”

Leave a Comment