Current Affairs | चालू घडामोडी | 13 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 13 DEC 2023

1) ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना.

 • कशासाठी ?
  • महाराष्ट्र राज्य देशात सर्वात जास्त धरणे, जलसाठे असलेले राज्य आहे. या धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या पाणी साठवण क्षमतेत झपाट्याने घट होत आहे.
  • धरणांमध्ये साचलेल्या गाळाचा उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची साठवण क्षमता पूर्ववत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होऊ शकते. त्यामुळे शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना यंदा नव्या स्वरूपात आणली आहे.
 • महत्त्व
  • ‘अल- निनो’च्या प्रभावाने पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची वारंवारता वाढली आहे. त्यामुळे या योजनेचा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्हे आणि आकांक्षित जिल्ह्यांना लाभ होऊ शकतो.
  • २०१७ ते २०२१ दरम्यान ही योजना प्रथम राबवली गेली. जलस्राोतात गाळ साठणे ही क्रिया कायम स्वरूपाची आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राबवण्याचे सरकारने ठरवले आहे.
 • योजनेत नवे काय
  • पूर्वीच्या योजनेत स्वयंसेवी संस्थांना केवळ इंधन खर्च देण्यात येत होता. मात्र सदर योजनेला गती देण्यासाठी सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर योजना नव्याने राबवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे.
 • योजना कशी राबवली जाते?
  • गाळ काढण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थांना ग्रामसभांच्या ठरावासह प्रस्ताव सादर करावा लागतो.
  • लाभधारक शेतकऱ्याचा ७/१२ आणि गाळ पसरवल्याचा पंचनामा करण्यात येतो. तो ‘अवनी’ अॅपवर अपलोड होतो.
  • गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यास ग्रामसभेची मान्यता घेण्यात येते.
  • गाळाची शेतकऱ्यास विक्री करता येत नाही. गाळ काढण्यासाठी ६०० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या १० वर्षांपेक्षा जुन्या जलसाठ्यांना प्राधान्य देण्यात येते.
  • गाळ काढण्यापूर्वीची व नंतरची छायाचित्रे काढली जातात. गाळाच्या ट्रॉलींची संख्या मोजली जाते. शेतकरी व त्याचे भूक्षेत्र, काढलेल्या गाळाचे प्रमाण, गावनिहाय जलसाठे याची माहिती ठेवली जाते. उत्खनन यंत्राच्या कामाचे तास मोजले जातात.
  • हा सर्व ताळमेळ समजण्यासाठी दैनंदिन डेटा एंट्री आणि एमबी रेकॉर्डिंग ठेवले जाते.
  • गाळ उपसलेल्या कामांचे ‘जिओ टॅगिंग’ही केले जाते.
  • ही सर्व माहिती ‘अवनी’ अॅपवर साठवली जाते.

2) कृषी उडान योजना २.०

 • शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश आणि विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राने राज्यातील पुणे, नाशिक विमानतळांसह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला आहे.
 • शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२० मध्ये ‘कृषी उडान’ योजना सुरु करण्यात आली. आता ‘कृषी उडान योजना २.०’ ही घोषणा २७ ऑक्टोबरला सादर करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने डोंगराळ प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातून विमानतळांद्वारे विविध प्रकारच्या शेतीमाल (फळे, भाज्या, मांस, मासे, डेअरी उत्पादने इत्यादी) वाहतुकीवर भर देण्यात आला आहे.
 • या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पशुपालन आणि डेअरी विभाग, मत्स्य विकास विभाग, अन्न प्रक्रिया उद्याोग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी विकास मंत्रालय आणि पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालय अशी आठ केंद्रीय मंत्रालये समन्वयाने काम करणार आहेत.

3) राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांचा राजीनामा.

 • यापूर्वीही 3 सदस्यांनी विविध कारणांमुळे राजीनामा दिला आहे.
 • सध्या आयोगाच्या रिक्त जागी न्या. सुनील शुक्रे यांची निवड.

4) निवडणूक आयुक्तांचा दर्जा कायम. राज्यसभेत आवाजी मतदानाने विधेयक मंजूर.

 • मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा सर्वोच्च न्यायाधीशाच्या समकक्ष असलेला वेतनाचा दर्जा कायम ठेवण्याबाबतचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.
 • आयुक्त निवडीची नवीन प्रक्रिया.
  • निवडणूक आयुक्तांची निवड आधी केंद्र सरकारकडून केली जात असे. मात्र आता निवड समितीच्या माध्यमातून आयुक्तांची निवड केली जाणार आहे.
  • पाच सदस्यांच्या शोध समितीचे अध्यक्ष केंद्रीय कायदा मंत्री असतील. शोध समितीमधील किमान दोन सदस्य सचिव स्तरावरचे असतील.
  • निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतील. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेला कॅबिनेट मंत्री यांचा त्यात समावेश असेल. सरन्यायाधीशांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.
  • १९९१ मधील कायद्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत ठोस तरतूद नव्हती.
  • सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिलेल्या निकालात कायदा अमलात येईपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता व सरन्यायाधीश यांच्या समितीमार्फत या नियुक्त्या करण्याचे आदेश दिले होते.

5) लोकसभेच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह.

 • सभागृहाचे कामकाज पाहायला आलेल्या दोन तरूणांकडून सभागृहात उडी
 • घोषणा देत ते लोकसभा अध्यक्षांच्या चेअरकडे धावत होते
 • गॅस उत्सर्जित करणारे काही पदार्थही त्यांनी आणले होते अशी माहिती
 • संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण झाले असताना आजची ही घटना घडली. (13 डिसेंबर 2001 = संसदेवरील हल्ला)

6) अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना २६ जानेवारी रोजी भारतात साजरा केला जाणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते असे त्यांच्या राजदूताकडून सांगण्यात आले होते. परतुं, बायडेन यांनी हा भारत दौरा रद्द केला आहे.

 • भारत पुढच्या वर्षी क्वाड देशांच्या शिखर परिषदेचंही आयोजन करणार आहे. ही बैठक जानेवारी महिन्यात होणार होती जी आता बायडन यांच्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

7) COP 28 परिषदेचा मसुदा दक्षिण जगाला(ग्लोबल साऊथ) अमान्य.

 • ग्लोबल स्टॉकटेक (GST) बाबत विकसनशील आणि गरीब देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जागतिक पर्यावरण परिषदेचा मसुदा सर्वानुमते सहमत होणार नाही.
 • दुबईत सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषद 2023 (COP28) मध्ये एका भारतीय मुलीने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला होता. अवघ्या 12 वर्षांची लिसिप्रिया कंगुजम ही मणिपूरची रहिवासी आहे. ती एक हवामान कार्यकर्ता आहे. COP28 च्या एका कार्यक्रमादरम्यान ती पोस्टर घेऊन स्टेजवर चढली होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment