Current Affairs | चालू घडामोडी | 14 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 14 DEC 2023

1) ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन.

  • अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते.

2) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’.

  • ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ व सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या ‘बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या’ धर्तीवर शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी ही योजना आहे.
  • योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
  • प्रत्येक जिल्ह्यातून 600 प्रमाणे एकूण 21 हजार 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल
  • इतर मागास बहुजन कल्याण विभाग ही महत्त्वकांक्षी योजना राबवेल.

3) त्सुनामी

  • त्सुनामी म्हणजे समुद्राखालील तीव्र भूकंप, स्फोट किंवा ज्वालामुखी यांच्यामुळे उद्भवणाऱ्या तीव्र लहरींची मालिका. ‘त्सुनामी’ हा शब्द जपानी भाषेतला असून त्याचा अर्थ ‘बंदरावरील लाटा’ असा आहे. खोल समुद्रात त्सुनामीच्या लहरी या जेट विमानाच्या वेगाने म्हणजे ताशी ८०० किलोमीटर प्रवास करतात.
  • हिंदी महासागरात २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या ९.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या त्सुनामीमुळे सुमात्रा, इंडोनेशिया, अंदमान, थायलंड, श्रीलंका, मालदीव इत्यादी बेटांवर आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात मनुष्य व वित्तहानी झाली होती.
  • नॉयडा येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि हैदराबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र कोणत्याही भागातील भूकंप व त्सुनामीच्या लहरींचा तपास लागून त्यांची नोंद होऊन एका यंत्रणेद्वारे सर्व प्रसारमाध्यमांमार्फत भूकंप व त्सुनामीबद्दलची आगाऊ माहिती देशभर पुरवली जाते. तसेच ‘इंडिया क्वेक’ नावाचे मोबाइल फोनमधील अॅप देखील आहे.

4) संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ साली घोषित केलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी चौदावे ध्येय हे पाण्याखालील जीवनाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी मांडले गेले. एकूण १७ ध्येये ठरवण्यात आली आहेत, त्यातील क्रमांक १३, १४ आणि १५ ही पर्यावरण रक्षणासाठीची आहेत.

  • तेरावे ध्येय हवामान बदलांचा वेग कमी राखणे हे आहे. तर पंधराव्या ध्येयात जमिनीवरच्या जीवांची जपणूक हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात वनांचा नाश थांबवणे हे प्रमुख ध्येय आहे.
  • २०३० पर्यंत ही ध्येये साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला होता. परंतु, मध्यंतरी आलेल्या कोविडच्या संकटामुळे ही कालमर्यादा आता काहीशी बदलली आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment