Current Affairs | चालू घडामोडी | 02 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 02 JAN 2023

1) PSLV C58 चे यशस्वी प्रक्षेपण.

 • श्रीहरिकोटा येथून इस्राोच्या ‘पीएसएलव्ही-सी५८’ द्वारे ‘एक्सपोसॅट’ उपग्रहासह १० अभ्यास उपकरणे यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आली.
 • ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’ = एक्सपोसॅट (XPoSat)
 • या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास केला जाणार आहे.
 • या मोहिमेद्वारे अशा खगोलीय घटकांचा अभ्यास करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरणार आहे.

2) हिंगणघाटात राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट.

3) गुंड गोल्डी ब्रार UAPA अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित.

4) संविधानाची गरज काय?

 • जिथं सर्वांसाठी समान, संतुलित विधान केलं जाईल, असं मैदान संविधानाने तयार केलं आहे. असे हे संविधान नियमांचे आणि कायद्याचे पुस्तक आहे. संविधान सम्यक दस्तावेज आहे. या सम्यक दस्तावेजाने सर्वांना समान वागणूक मिळेल, अशी समतेची भूमी तयार केली आहे.
 • संविधान हा शब्दच मुळी तयार झाला आहे दोन पदांपासून. सम्+विधान = संविधान. सम म्हणजे सम्यक, संतुलित, निर्दोष. विधानमधील धा हा धातू आहे तर वि हा उपसर्ग. एखाद्या गोष्टीची मांडणी करणे, नियम, कायदा अशा अर्थाने विधान शब्द आला आहे.

5) पतमानांकन संस्था

 • सार्वभौम पतमानांकन म्हणजे काय?
  • कोणत्याही देशाचे पतमानांकन ठरवताना त्या देशाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, विविध वित्तसंस्था, संशोधन संस्था यांच्याकडून वेळोवेळी प्रकाशित होत असलेली आकडेवारी, कंपन्यांचे वार्षिक-तिमाही अहवाल अशा सर्वाचा अभ्यास करून मानांकन दिले जाते.
  • यात देशाच्या कर्जाची पातळी, कर्जफेडीचा इतिहास, अर्थव्यवस्थेचा दरडोई उत्पन्नाचा स्तर, महागाई दर, व्याजदर, व्यापार तूट, विकासदर आदी अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शविणाऱ्या पैलूंचा विचार असतो.
  • याचबरोबर बऱ्याचदा अर्थतज्ज्ञ, उद्याोजक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चाही केली जाते.
  • राजकीय स्थैर्य, भ्रष्टाचाराचे प्रमाण, देशाची संस्थात्मक आणि प्रशासनात्मक व्यवस्था या बाबींचा देखील सार्वभौम पतमानांकन निश्चित करताना विचार होतो.
 • मुख्य पतमानांकन संस्था कोणत्या?
  • मूडीज = ही सर्वात जुनी संस्था = स्थापना १९००
  • स्टँडर्ड अँड पुअर्स = स्थापना १९२० .
  • फिच रेटिंग्स ही एक अमेरिकी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. तिची स्थापना जॉन नोल्स फिच यांनी २४ डिसेंबर १९१४ रोजी न्यूयॉर्क शहरात फिच प्रकाशन कंपनी म्हणून केली होती.

6) श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून, यातून आतापर्यंत समाविष्ट असलेल्या सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले आहे.

 • यात कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

7) कोटक महिंद्र बँकेच्या प्रमुखपदी अशोक वासवानी

8) जीएसटी संकलन १.६४ लाख कोटींवर

 • एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीत सरासरी मासिक जीएसटी संकलन हे १.६६ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारे राहिले. हेच आधीच्या वर्षातील याच कालावधीतील मासिक सरासरी १.४९ लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेतही १२ टक्क्यांची वाढ दर्शवणारी आहे.

9) येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान मांडले जाईल.

 • निवडणूक-वर्षात केवळ खर्चाला मंजुरी देणाऱ्या या लेखानुदानात कोणताही महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.

10) वाहतूकदारांचे आंदोलन

 • केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार (New Motor Vehicle Act) यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे.
 • दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे.
 • तर, हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा (Petrol-Diesel Supply) करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. ज्यात 1 ते 3 जानेवारीदरम्यान टँकरचालक संपावर जाणार आहे.
 • हिट अँड रन कायदा काय?
  • 1)अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षा
  • 2) ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला, अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेल्यास दहा वर्षांचा कारावास, सात लाखांचा दंड
  • 3)अपघात झाला आणि ड्रायव्हरने पोलिसांना कळवलं , जखमींची मदत केली तर दंडासह 5 वर्षांचा कारावास
  • 4) गुन्हा?
   • आधी: जामीनपात्र गुन्हा
   • आता: अजामीनपात्र गुन्हा

11) ई-रुपी

 • ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (CBDC) चे ‘ई रुपी’ हे संक्षिप्त रूप आहे. ही मुळात एक डिजिटल पावती आहे जी लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा QR कोड संदेश रुपात मिळेल.
 • हे आभासी चलनांप्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
 • ही एक प्री-पेड पावती (व्हाऊचर) आहे, जे तो/ती (लाभार्थी) कोणत्याही केंद्रात-जिथे ते स्वीकारले जाईल, तिथे जाऊन, ते दाखवून त्याच्या बदल्यात पैसे मिळवू शकेल.
 • ई-रुपी म्हणजे डिजिटल चलन नाही. उलट ई-रुपी हे व्यक्ती-विशिष्ट, तसेच निश्चित उद्दिष्टासाठी जारी केले जाणारे डिजीटल व्हाउचर आहे.
 • RBI ने 1 डिसेंबर 2022 रोजी ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (CBDC) रिटेल जरी केले.

12) संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील महत्वाच्या परिषदा

 1. मराठी साहित्य संमेलन, 1908 पुणे
  • अध्यक्ष = चिंतामणराव वैद्य
  • महाराष्ट्राच्या एकीकरणाचा उल्लेख
 2. मराठी साहित्य संमेलन, 1939 at अहमदनगर
  • ठराव संमत = मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवा
 3. संयुक्त महाराष्ट्र सभा, 1940 at मुंबई
  • अध्यक्ष = रामराव देशमुख
 4. महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1940
  • अध्यक्ष = TJ केदार
 5. महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1942
  • अध्यक्ष = TJ केदार
 6. संयुक्त महाराष्ट्र समिती, 1946 at बेळगाव
  • ग.त्र्यं. माडखोलकर
 7. महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1946 at मुंबई
  • शंकरराव देव
 8. अकोला करार, 8 ऑगस्ट 1947
 9. दार कमिशन, 17 जून 1948
 10. JVP समिती, 29 डिसेंबर 1948
  • जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारमय्या
 11. नागपूर करार, 28 सप्टेंबर 1953
  • भाऊसाहेब हिरे यांची महत्वाची भूमिका
 12. राज्य पुनर्रचना आयोग ( एस फजल अली कमिशन) 29 डिसेंबर 1953
  • अहवाल = 10 ऑक्टोबर 1955
 13. संयुक्त महाराष्ट्र सभा, 1956 at टिळक स्मारक मंदिर, पुणे
  • केशवराव जेधे
  • सभेमध्ये एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
 14. संयुक्त महाराष्ट्र समिती, 1956
  • अध्यक्ष = श्रीपाद अमृत डांगे
  • उपाध्यक्ष = त्र्यं. रा. नरवणे
  • सेक्रेटरी= एस. एम. जोशी

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment