Current Affairs | चालू घडामोडी | 12 JAN 2024
1) 12 जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती (1863)
- राष्ट्रीय युवा दिन = स्वामी विवेकानंद जयंती (1863)
- 1893 = सर्वधर्म परिषद शिकागो येथे भाषण
- 1897 = रामकृष्ण मिशन स्थापना
- वीर जिजामाता जयंती (1598)
- जन्मस्थळ = सिंदखेडराजा, बुलढाणा
2) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0
- स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार = महाराष्ट्राचे यश
- राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर
- नवी मुंबई महानगरपालिका = स्वच्छ शहर तिसरा क्रमांक आणि सेवन स्टार दर्जा
- सासवड नगरपरिषद = (एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या) पहिला क्रमांक
- लोणावळा नगरपरिषद = (एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या) तिसरा क्रमांक
- पुणे महानगरपालिका = स्वच्छ शहर दहावा क्रमांक
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका = फाईव्ह स्टार मानांक वॉटर प्लस मानांकन व स्वच्छ शहर तेरावा क्रमांक
- गडहिंग्लज नगर परिषद = (50000 पेक्षा कमी लोकसंख्या) विभागीय पुरस्काराने सन्मानित
- पाचगणी नगर परिषद = (15 हजारापेक्षा कमी लोकसंख्या) विभागीय पुरस्काराने सन्मानित
- कराड नगरपरिषद = (एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या) विभागीय पुरस्काराने सन्मानित
3) पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पुरस्कार
- रेडिओ उद्घोषक अमीन सयानी, दिग्दर्शक व अभिनेते गौतम घोष आणि ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्य कलाकार लीला गांधी यांना यंदाचा ‘पिफ पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
- तर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल गीतकार, गायक एम. एम. कीरवानी यांना ‘संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
4) आशिया चषक फुटबॉल स्पर्धा आजपासून
- यंदाचे १८ वे पर्व आशिया चषक फुटबॉल स्पर्धा २०२३ = कतार
- विश्वचषक स्पर्धेपाठोपाठ आता आशियातील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी कतारला मिळणार आहे.
- भारतीय संघ पाचव्यांदा आशिया चषक फुटबॉलमध्ये खेळणार आहे. भारताने १९६४ साली या स्पर्धेत पदार्पण केले होते आणि चार संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
5) सामूहिक श्रमदानाचे दर्शन घडवणाऱ्या ‘इर्जिक’ पद्धतीने सांगलीतील चिखलगोठणच्या (ता. तासगाव जि. सांगली) महिलांनी यंदा भुईमूग लागवड करून जोमदार उत्पादन काढले.
- ‘इर्जिक’ म्हणजे काय?
- मनुष्यबळाच्या अभावातून समूह शेतीची परंपरा तयार झाली. शेती करणाऱ्यांचा एक समूह बनवून त्यातील सर्वांनी एकमेकांच्या शेतावर काम करायचे या पद्धतीला ‘इर्जिक’ परंपरा म्हटले जाते. ही ‘इर्जिक’ परंपरा गावोगावी रुजली होती. मात्र शेतीचे यांत्रिकीकरण आणि अधिक कष्टदायक पिकांपासून शेतकऱ्यांनी घेतलेली फारकत यामुळे ही परंपरा हळूहळू मागे पडली.
6) राज्यात ६२ वसतिगृहांना मंजुरी. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १० जिल्ह्यांत सुविधा.
- संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांत मिळून ६२ वसतिगृहे बांधली जाणार आहेत
- राज्य शासनाच्या निर्णयानुसार बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, लातूर या जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी मिळून ६२ वसतिगृहे उभारली जाणार
- महत्त्व ?
- शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य आहे.
- दरवर्षी ऊसतोड कामगार ऑक्टोबर ते एप्रिल या ऊसतोडणीच्या हंगामात स्थलांतरित होतात. या कामगारांबरोबर त्यांची मुलेही स्थलांतरित होत असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट होते.
- या मुलांच्या शिक्षण गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिक्षणाअभावी ते बालमजुरीकडे ओढले जातात.
- ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा भविष्यातील मार्ग सुकर करण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आली आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel