Current Affairs | चालू घडामोडी | 13 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 JAN 2024

1) 13 जानेवारी

 • मराठ्यांचा वडगाव येथे विजय = 13 जानेवारी 1779
  • प्रथम इंग्रज मराठा युद्ध = 1775-82
  • सालबाईचा तह
 • PM फसल बिमा योजना सुरुवात (PMFBY) = 13 जानेवारी 2016
  • हप्ता = खरीप 2% , रब्बी 1.5% , नगदी 5%
  • शेतकर्यांना त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी विमा संरक्षण दिले जाते.
  • शेतकऱ्यांना केवळ 50 टक्केच विम्याचा हप्ता भरावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे भूस्खलन, गारपीट, पूर, दुष्काळ, इ. उत्पादनाचे नुकसान करणाऱ्या आपत्ती. कीटकांचा प्रादुर्भाव ज्यामुळे उत्पादनाचे नुकसान होते ते देखील PMFBY द्वारे कव्हर केले जाते.

2) सारथी आता उद्योजकता विकास केंद्र सुरू करणार.

 • छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भाऊ इंक्युबॅशन संस्थेमार्फत सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास योजना कार्यान्वित झाली आहे.

3) केंद्राच्या निवडणूक आयुक्त संदर्भातील कायद्याला स्थगिती नाही.

 • मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकी संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
 • आयुक्तांच्या नेमणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीत त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना वगळण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी केंद्र सरकारमधील एक मंत्री समितीत असतील असे सरकारने स्पष्ट केले होते. याच तरतुदीला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती आता फेटाळण्यात आली
 • निवडणूक आयुक्त नेमणुकीसाठीची समिती
  • अध्यक्ष= पंतप्रधान
  • सदस्य 1 = संसदेतील विरोधी पक्षनेता
  • सदस्य 2 = केंद्र सरकारमधील एक मंत्री

4) विशाखा विश्वनाथ = मराठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार

 • ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना’ या कवितासंग्रहासाठी पुरस्कार

5) 27 वे राष्ट्रीय युवा महोत्सव = नाशिक

 • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

6) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’ चे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

 • पुलाची लांबी = 21.8 किमी

7) ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 • ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्यायावत ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेतली.

8) संविधानभान

 • नेहरू अहवालात ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वतंत्र वसाहत (डॉमिनियन स्टेटस्) असा दर्जा मिळावा, ही मागणी होती.
 • लॉर्ड आयर्विन यांनी असा दर्जा देण्याचे सुरुवातीला कबूल केले, तसे घोषितही केले; मात्र इंग्लंडमध्ये भारताला स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्याबाबतचा रोष पाहून त्यांनी भूमिका बदलली.
 • १९ डिसेंबर १९२९ रोजी झालेेल लाहोर अधिवेशन = अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू = पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला गेला.
 • पूर्ण स्वराज्याच्या ठरावात भारतीयांनी २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहनही केले होते. पुढे याच दिवशी संविधान लागू करून हाच दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून १९५० साली घोषित झाला.
 • २६ जानेवारी १९३० ला जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करताना भारताचा तिरंगा फडकला तेव्हा या तिरंग्याच्या मधोमध असलेल्या सुताच्या चरख्यातून कातल्या जाणाऱ्या धाग्यांमधून भारतीय स्वातंत्र्याचे आणि एकतेचे वस्त्र विणले जात होते.

9) क्लाऊड कॉम्प्युटिंग प्रणालीची नांदी

 • जॉन मॅकार्थी संगणक शास्त्रातील एक अग्रणी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य संशोधक.
 • संगणक वापरकर्त्यांना त्यांचे संगणक एका मध्यवर्ती संगणकाशी जोडून माहितीची देवाण-घेवाण सुलभपणे करता येऊ शकेल अशी संगणक जोडणी संकल्पना त्यांनी १९६० च्या दशकात विकसित केली. ही संकल्पना हे आंतरजालाच्या विकासात महत्त्वाचे योगदान ठरले. आज प्रचलित झालेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग प्रणालीची, सर्व्हरमध्ये माहितीचे संचय करण्याची ती नांदी ठरली.
 • १९७०च्या दशकात, मॅकार्थी यांनी संगणकाद्वारे खरेदी आणि विक्री करण्याबाबत एक पथदर्शी शोधलेख सादर केला. आज ज्याला ई-कॉमर्स म्हणतात ती ही संकल्पना होती.
 • ‘सेरेब्रल मेकॅनिजम्स इन बिहेवियर’ या परिषदेत भाग घेऊन आल्यावर माणसाप्रमाणे विचार करू शकणाऱ्या यंत्रांची निर्मिती करायची या एकाच ध्येयाने त्यांना पछाडले आणि त्यातूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म झाला.

10) Non Constitutional Bodies Appointing Committe

(A) NHRC = 6 member committee

 1. PM
 2. Home Minister
 3. Speaker of Loksabha
 4. Dy. Speaker of Rajyasabha
 5. Leader of opposition of Loksabha
 6. Leader of opposition of Rajyasabha

(B) CIC

 1. PM
 2. Leader of Opposition of Loksabha
 3. Cabinet minister appointed by PM

(C) CVC

 1. PM
 2. Home Minister
 3. Leader of Opposition of Loksabha

(D) CBI

 1. PM
 2. Leader of Opposition
 3. CJI/ Judge appointed by SC

(E) Lokpal

 1. PM
 2. Leader of Opposition of Loksabha
 3. Loksabha Speaker
 4. CJI
 5. One Eminent Jurist

(F) Election Commission (2023)(फार महत्वाची)

 1. PM
 2. Leader of Opposition
 3. Cabinet minister appointed by PM

(Clue = सर्व members जरी लक्षात नसले तरी यावरून options eliminate करायला मदत होईल.

 1. PM आणि Leader of Opposition= सगळीकडे आहेत
 2. Home minister= NHRC आणि CVC मधे आहे
 3. Cabinet minister appointed by PM= CIC आणि EC मधे आहे
 4. CJI= CBI आणि lokpal मधे आहे
 5. Loksabha Speaker = NHRC आणि lokapal मधे आहे
 6. Rajyasabha dy. Speaker फक्त NHRC मधे आहे)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment