Current Affairs | चालू घडामोडी | 14 JAN 2024
1) 14 जानेवारी
- तिसरे पानिपतचे युद्ध = 14 जानेवारी 1761
- मराठा वि. अहमदशाह अब्दाली
- पहिले पानिपत युद्ध (1526) = बाबर वि. इब्राहिम लोदी
- दुसरे पानिपत युद्ध (1556) = अकबर वि. हेमू
2) गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन (1932 – 2024)
- हिंदुस्तानी संगीतातील ज्येष्ठ गायिका
- रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आबासाहेब अत्रे आणि इंदिराबाई अत्रे यांच्या घरामध्ये १३ सप्टेंबर १९३२ रोजी प्रभा अत्रे यांचा जन्म झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या.
- संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान आणि आयएलएस विधी महाविद्यालयातून कायदा विषयांत पदवी संपादन केली.
- संगीतातील सरगम गानप्रकारावर संशोधन आणि प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. (डॉक्टर ऑफ म्युझिक) संपादन केली.
- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, नवनवीन बंदिशी रचणाऱ्या वाग्येयकार, मुक्तहस्ताने विद्यादान करणाऱ्या गुरू, संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री, संगीत विचारवंत, लेखिका, कवयित्री अशी बहुआयामी ओळख.
- डॉ. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’ या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
- संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये ‘पद्मश्री’, २००२ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार
3) युद्धसराव प्रात्यक्षिकात प्रथमच स्वदेशी बनावटीच्या ‘स्वार्म’ ड्रोनचा वापर.
- स्वदेशी बनावटीचे ‘स्वार्म’ ड्रोन झुंड युद्धतंत्रासाठी, शत्रूवर पाळत ठेवणे तसेच आक्रमण मोहिमांसाठी यांत्रिकी पायदळात दाखल केले आहे. त्याचे नोडल सेंटर म्हणून नगरमधील यांत्रिकी पायदळ केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.
4) तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपी) उमेदवार लाई चिंग-ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel