Current Affairs | चालू घडामोडी | 16 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 16 JAN 2024

1) 16 जानेवारीराष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस

 • राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस
  • 2022 पासून साजरा करण्यास सुरुवात
  • स्टार्ट अप इंडिया = 16 जानेवारी, 2016 रोजी प्रारंभ
  • प्रमुख उद्दिष्ट = नाविन्यता, शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे असे आहे.
  • घोषवाक्य= ‘स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया’
  • स्टार्टअप ना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत ‘अटल इनोवेशन मिशन’ आणि ‘स्वयंरोजगार व सेतू’ अशी दोन अभियाने सुरू करण्याची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने २४ फेब्रुवारी २०१६ ला दिली.
 • म. गो. रानडे यांची पुण्यतिथी = 16 जानेवारी 1901
  • जन्म = निफाड
  • भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळख
  • 1865 = विधवा विवाह उत्तेजक मंडळ
  • 31 डिसेंबर 1867 = ‘प्रार्थना समाजाची’ आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या घरी स्थापना
  • 1882 = पुण्यात फिमेल हायस्कूल ची स्थापना = हुजूरपागा
  • 1887 = भारतीय सामाजिक परिषद दरवर्षी भरवण्यास सुरुवात
   (1st= मद्रास)
  • 1889 मधे ‘Industrial association of western India’ ची स्थापना
  • मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती
  • 1896 = डेक्कन सभा at पुणे (1st चिटणीस= गोखले)
  • मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, वक्तृत्वोत्तेजक सभा, वसंत व्याख्यनमाला या सर्वांची सुरुवात रानडे यांनी केली.
  • ‘एकेश्वरनिष्ठेची कैफियत’ हा ग्रंथ लिहिला
  • इतर ग्रंथ = राईज ऑफ मराठा पॉवर, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी

2) निपाह प्रतिबंधक लशीची ऑक्सफर्ड कडून निर्मिती.

 • निपाह विषाणू विरोधात असलेली जगातील पहिली लस
 • ‘सीएचएडीओएक्स1 निपाह बी’ असे या लशीचे नाव आहे.
 • वटवाघूळ, डुक्कर अथवा अन्य बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचा संसर्ग होतो.

3) जगात आर्थिक विषमता वाढत आहे : ऑक्सफॅम चा अहवाल

 • जागतिक आर्थिक मंचाच्या(WEF) बैठकीत ऑक्सफॅम ने ‘इनइक्वालिटी इंक’ नावाचा अहवाल मांडला. त्यात खालील गोष्टी नमूद केल्या आहेत.
 • जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती २०२०पासून दुप्पट झाली असून तब्बल पाच अब्ज लोक अधिक गरीब झाले आहेत.
 • मागील दशकभरात पाच अब्ज लोक गरिबीत
 • संपूर्ण गरिबी संपविण्यासाठी २२९ वर्षांची प्रतीक्षा

4) शायर मुनव्वर राणा यांचे निधन.

 • मुनव्वर राणा यांचा जन्म १९५२ साली रायबरेली येथे झाला.
 • उर्दू साहित्यातल्या अमूल्य योगदानासाठी २०१४ मध्ये राणा यांना त्यांच्या ‘शाहदाबा’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच २०१२ मध्ये त्यांना ‘माटी रतन सन्मान’ प्रदान करण्यात आला.
 • त्यांची ‘मां’ ही गझल सर्वात प्रसिद्ध कवितांपैकी एक मानली जाते

5) संविधानभान
१९३५ चा भारत सरकार कायदा
आणि संविधान

 • लॉर्ड लिनलिथगो यांच्या नेतृत्वातील संयुक्त निवड समितीने १९३५ चा भारत सरकार कायदा तयार केला.
  • ब्रिटिशांच्या प्रशासकीय इतिहासातला हा कायदा सर्वांत मोठा लिखित दस्तावेज आहे.
 • तरतुदी
  • या कायद्याने भारताला संघराज्याच्या प्रारूपाची (फेडरल मॉडेल) दिशा दिली.
  • संघराज्यवादामध्ये सत्तेचे उभे विभाजन अपेक्षित असते. याचा अर्थ केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन
  • या कायद्याने केंद्र पातळीवरील कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ तयार करावे, असे म्हटले तर प्रांतिक मंडळे आणि संस्थाने ही दुसरी पातळी निर्धारित करण्यात आली.
  • केंद्रीय पातळीवर विधिमंडळाची दोन सभागृहे असावीत, असे सुचवले गेले. सत्तेच्या या उभ्या विभाजनात केंद्राकडे अधिक अधिकार होते. संरक्षण, परराष्ट्र धोरण यांसारखे प्रमुख विषय गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीत होते.
  • याच कायद्यान्वये फेडरल कोर्टाची स्थापना झाली.
  • रिझर्व्ह बँकेची स्थापनाही याच कायद्याअंतर्गत झाली.
  • केंद्रीय (फेडरल) लोकसेवा आयोगाचीही स्थापना करण्यात आली.
  • मुस्लीम आणि शिखांना स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद
 • तुलनेने एक बरी म्हणावी अशी बाब म्हणजे, निवडणूक प्रक्रियेत पात्र मतदारांची संख्या वाढली.
 • त्याचा परिणाम १९३७ सालच्या निवडणुकांमध्ये दिसला. त्यातून काँग्रेस हा जनतेने मान्य केलेला पक्ष म्हणून प्रस्थापित होऊ लागला.
 • संघराज्याचा पाया अधिक बळकट होण्याकरता या कायद्याची मदत झाली. संघराज्यवाद हा भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशासाठी सोयीचा होताच शिवाय संघराज्यवादातून विविधतेचे समायोजन करण्याची एक पद्धत विकसित होते.
 • हा कायदा म्हणजे ‘भारताचे आर्थिक शोषण करणारे गुलामीचे संविधान आहे’, अशा शब्दात काँग्रेसने टीका केली होती.

6) दुसरी औद्याोगिक क्रांती (१८७० ते १९१४)

 • पहिल्या औद्याोगिक क्रांतीचा उगम ग्रेट ब्रिटनमध्ये झाला तर दुसरी औद्याोगिक क्रांती मुख्यत्वेकरून ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, इटली आणि जपान या देशांमध्ये सुरू झाली.
 • दुसरी औद्याोगिक क्रांती ही तंत्रज्ञानाधारित क्रांती होती असे मानले जाते. विशेषत: पोलाद, वीजनिर्मिती आणि रसायन या तीन क्षेत्रांनी या काळात फार मोठी झेप घेतली.
 • ज्या ज्या क्षेत्रांमध्ये पोलादाचा वापर होत होता त्या सर्व क्षेत्रांमध्ये एकदम तेजी आली. उदाहरणार्थ, दोन क्षेत्रे म्हणजे रेल्वे आणि जहाजबांधणी. दोन्हींमध्ये तेजी निर्माण झाली.
 • विद्यूतनिर्मिती आणि पारेषणामध्ये सुधारणा झाल्यामुळे विजेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होऊ लागला. तारायंत्राच्या साहाय्याने संदेशवहन (टेलिग्राफी), दूरध्वनी (टेलिफोन) आणि रेडिओ यांमुळे माहितीची देवाणघेवाण आणि संदेशवहन यांच्यात आमूलाग्र बदल झाला.
 • १८७९ मधील विजेच्या दिव्याच्या शोध = एडिसन
 • रसायननिर्मितीमध्ये विविध कृत्रिम रसायने, रासायनिक खते, कृत्रिम रंगद्रव्ये, स्फोटके, अॅस्पिरीनसारखी औषधी द्रव्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध लागले आणि उत्पादनात मोठी वाढ झाली.
 • १९०७ मधील प्लास्टिकचा शोध लागला. त्या वेळी आणि अगदी आतापर्यंत वरदान वाटणारा आणि आता प्रदूषणाच्या भस्मासुराचा मोठा भाग असणारा हा शोध.
 • दुसऱ्या औद्याोगिक क्रांतीमुळे समाजव्यवस्थेत मोठे बदल झाले. लोकांचे शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले, शहरे ही रोजगाराची आणि अर्थव्यवस्थेची केंद्रे झाली आणि शहरीकरणाच्या भेडसावणाऱ्या समस्यांची सुरुवात झाली.

7) भारतीय टेनिससाठी मोठी बातमी. सुमित नागलने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

 • पहिल्या फेरीत त्याने जागतिक मानांकनात २७ व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुब्लीकला ६-४, ६-२, ७-६ असा पराभवाचा धक्का दिला.
 • रमेश कृष्णन यांच्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी भारतीय खेळाडूने एकेरीत मानांकित खेळाडूला पराभूत केले आहे.

8) जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum -WEF)

 • जागतिक आर्थिक परिषदेची स्थापना क्लाऊस श्वॅब यांनी १९७१ मध्ये केली.
 • जागतिक पातळीवर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य वाढावे, असा त्यांच्या परिषदेच्या स्थापनेमागील हेतू होता. आता या परिषदेचे मुख्यालय जिनिव्हामध्ये आहे. जागतिक समस्यांवर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून चर्चा घडविण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जाते.
 • ‘जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध’ असे या परिषदेचे ब्रीदवाक्य आहे.
 • केवळ २००२ चा अपवाद वगळता दावोसमध्ये (स्वित्झर्लंड ) ही परिषद झाली आहे. त्यावेळी ९/११ च्या हल्ल्यानंतर न्यू यॉर्कमध्ये ही परिषद झाली होती.
 • या परिषदेत २००० मध्ये जागतिक लसीकरण सहकार्य गटाची (गावी) स्थापना झाली. यामुळे अनेक देशांना विविध रोगांवरील लशी उपलब्ध होऊ लागल्या. या गटामुळे जगभरात ७६ कोटी मुलांचे लसीकरण होऊ शकले आहे.

9) प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत (पतंप्रधान जनमन योजना) ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत एक लाख आदिवासी लाभार्थ्यांना ५४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरित.

10) ‘ब्रिक्स’ अध्यक्षपदासाठी रशियाला पाठिंबा.

 • रशियाने १ जानेवारी २०२४ पासून ‘ब्रिक्स’चे अध्यक्षपद स्वीकारले.
 • 2023 = साऊथ आफ्रिका कडे अध्यक्षपद

11) ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट

 • ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वत:चे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे.
 • वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी आणि मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment