Current Affairs | चालू घडामोडी | 15 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 JAN 2024

1) 15 जानेवारी – भारतीय लष्कर दिन (Indian Army Day)

 • 1949 साली ब्रिटिश लष्कर प्रमुखांनी फिल्डमार्शल करिअप्पा यांच्याकडे भारतीय लष्कराची धुरा सोपवली.
 • भारतीय हवामान विभागाची स्थापना (IMD) = 15 जानेवारी 1875
  • मद्रास येथे सर्वप्रथम स्थापन
 • महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन = 15 जानेवारी
  • 2024 म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच हा दिवस साजरा होत आहे.
  • हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती 15 जानेवारी हा दिवस या वर्षीपासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याची घोषणा मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

2) मालदीवमध्ये तैनात केलेले भारतीय लष्कर 15 मार्च पर्यंत माघारी हटवण्यास सांगितले. 

 • मालदीवचे अध्यक्ष मोइझू यांनी आपला भारत विरोध कायम ठेवला आहे. त्यांनी निवडणूक याच मुद्द्यावर लढवून जिंकली होती.

3) भारतीय हवामान विभाग (IMD) स्थापनेचा 150 वा वर्धापनदिन = १५ जानेवारी .

 • 1875 मध्ये देशात पहिल्यांदा चेन्नई (मद्रास) येथे हवामान विज्ञान आणि खगोशास्त्रीय वेधशाळेची स्थापन करण्यात आली होती.
 • ब्रिटिश हवामान अभ्यासक हेन्री फ्रान्सिस ब्लँकफर्ड यांच्या नेतृत्वाखाली 15 जानेवारी 1875 रोजी IMD ची स्थापना करण्यात आली.
 • सुरुवातीला कोलकाता, त्यानंतर सिमला, पुणे, आणि नंतर दिल्ली येथील मुख्यालयातून IMD चे काम सुरू झाले.

4) संविधानभान – स्वराज्याचा आराखडा : कराची ठराव’

 • १९३१ कराची अधिवेशन= सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष
 • कराची अधिवेशनाच्या केवळ चार दिवस आधी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. दांडी यात्रेमुळे गांधीजी तुरुंगात होते. त्यांची या अधिवेशनाच्या आधी सुटका झाली आणि गांधी-आयर्विन करार होऊन सविनय कायदेभंग चळवळ संपली होती. फाशीच्या शिक्षेने अनेक ठिकाणी दंगे सुरू झाले.
 • आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपले स्वराज्य सरकार (भारतीयांचे सरकार) कसे असेल, याचा आराखडा मांडण्यासाठी ठराव केला गेला. कायद्याच्या परिभाषेत लिहिलेल्या या ठरावात चार भाग होते :
  1. मूलभूत हक्क आणि तत्त्वे
  2. श्रम
  3. कर आणि खर्च
  4. आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रम.
 • या ठरावाचा मसुदा लिहिला होता पं. नेहरूंनी. त्याचे संपादन केले होते महात्मा गांधींनी.
 • या ठरावामुळे पहिल्यांदाच मार्गदर्शक तत्त्वांचा मुद्दा पटलावर आला. स्वतंत्र भारताच्या संविधानातील चौथ्या भागात या मार्गदर्शक तत्त्वांची मांडणी करताना कराची ठराव महत्त्वाचा ठरला.

5) पहिली औद्याोगिक क्रांती

 • विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील नवनवीन शोधांमुळे जेव्हा उद्याोग, धंदे किंवा व्यवसाय यांच्यात, त्याचप्रमाणे आपली जीवनशैली, कार्यशैली, राहणीमान आणि विचारशैली हे जेव्हा आमूलाग्र बदलून जाते तेव्हा त्याला औद्याोगिक क्रांती म्हणतात.
 • त्यांच्यातील आमूलाग्र बदल हा सामाजिक व्यवस्थेत प्रचंड उलथापालथ घडवून आणतो.
 • पहिली औद्याोगिक क्रांती (१७६० – १८३०) = या क्रांतीला सुरुवात झाली साधारणपणे अठराव्या शतकाच्या मध्यापासून. तोपर्यंत अर्थव्यवस्थेचा पाया मुख्यत्वेकरून शेती आणि संबंधित छोटेमोठे धंदे हा होता.
 • ‘औद्याोगिक क्रांती’ असे नामकरण १७९९मध्ये लुई गियुम-ओटो या फ्रेंच राजदूताने केले.
 • या पहिल्या औद्योगिक क्रांतीचा पाया रचला वाफेच्या शक्तीने. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाने मानवजातीला ‘कृत्रिम शक्ती’ दिली! पूर्वी माणूस हाताने किंवा जनावरांच्या शक्तीच्या साहाय्याने करीत असलेली कामे आता या इंजिनाच्या साहाय्याने सहज आणि अत्यंत कमी वेळात होऊ लागली.
 • समाजरचनेचा आणि अर्थव्यवस्थेचा शेती हा पाया नष्ट होऊन त्याची जागा उद्याोगाने घेतली.

6) सेमीकंडक्टर चिपचं अंतरंग

 • सेमीकंडक्टर चिप = ‘इंटिग्रेटेड सर्किट’ किंवा ‘आयसी’
 • सेमीकंडक्टर किंवा अर्धसंवाहक हा काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या धातूसदृश पदार्थांचा (ज्यांना ‘मेटलॉइड’ असं संबोधलं जातं) एक गट आहे.
 • सामान्यत: पृथ्वीवर आढळणारे धातू किंवा इतर मूलद्रव्य दोन गटांत मोडतात :
  • (१) ज्यातून विद्याुतप्रवाह मुक्तपणे वाहू शकतो (उदा. तांब्याची तार) किंवा
  • (२) जे विद्याुतप्रवाहाला संपूर्णपणे अटकाव करतात (उदा. काच).
  • पण सेमीकंडक्टरचं काम मात्र थोड्या वेगळ्या प्रकारे चालतं. सामान्य परिस्थितीत कोणताही सेमीकंडक्टर पदार्थ (सिलिकॉन किंवा जर्मेनियम इत्यादी) आपल्यामधून विद्युतप्रवाहाचं वहन होऊ देत नाही. पण सेमीकंडक्टर पदार्थांत जर फॉस्फरससारखा अधातू (नॉन-मेटल) मिसळला आणि त्याभोवती विद्याुत क्षेत्र तयार केलं, तर मात्र त्यातून विद्युतप्रवाह मुक्तपणे वाहण्यास सुरुवात होते.
 • संगणक किंवा गणना करू शकणारं कोणतंही उपकरण विदेचं (डेटा) संकलन, पृथक्करण किंवा साठवणुकीसाठी द्विमान (बायनरी) गणन पद्धतीचा वापर करतं.
  • १९४० – ५०च्या दशकातील प्राथमिक संगणकापासून आजच्या युगातल्या सुपर कॉम्प्युटरलादेखील सर्व आज्ञा द्विमान पद्धतीतच द्याव्या लागतात.
  • आपल्या संगणक किंवा मोबाइल फोनवर कोणत्याही स्वरूपात (ई-मेल, फोटो, व्हिडीओ अथवा कोणतीही फाइल) उपलब्ध असलेली विदा ही अखेरीस कोट्यवधी ‘०’ व ‘१’ अंकांचा वापर करूनच साठवलेली असते.
 • सेमीकंडक्टरच्या गुणधर्माचा गणनयंत्रांमध्ये ‘०’ किंवा ‘१’ साठविण्याकरिता एक ‘ट्रान्झिस्टर स्विच’ म्हणून उपयोग करता येईल ही नावीन्यपूर्ण कल्पना अमेरिकेतल्या ‘बेल लॅब्स’ प्रयोगशाळेत काम करणाऱ्या विल्यम शॉकली या शास्त्रज्ञाला सर्वप्रथम सुचली.
  • १९४५ मध्ये त्यानं सिलिकॉनचा वापर करून त्याच्या विद्याुत संवाहनासंदर्भात केलेल्या प्रयोगांनुसार ‘स्विच’ची संकल्पना मांडली.
  • याच संकल्पनेनं प्रेरित होऊन त्याचे बेल लॅब्समधले सहकारी शास्त्रज्ञ वॉल्टर ब्रॅटन आणि जॉन बार्डीन यांनी शॉकलीनं मांडलेल्या सिद्धान्ताचा वापर केला आणि जर्मेनियम या अर्धसंवाहक पदार्थापासून एक ‘स्विच’ बनवला.
 • सेमीकंडक्टर पदार्थांमध्ये काही विशिष्ट मूलद्रव्यांचं मिश्रण करून (ज्याला ‘डोपिंग’ असंही म्हटलं जातं) आणि या मिश्रणाला विद्याुत क्षेत्राची जोड देऊन जो ‘स्विच’ तयार झाला तो एक वैज्ञानिक प्रयोग म्हणून दखलपात्र
 • १९५५ मध्ये शॉकलीनं या शोधाचा व्यावहारिक वापर करून नफा कमविण्यासाठी ‘शॉकली सेमीकंडक्टर’ या कंपनीची अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात स्थापना केली.
 • पुढे १९५६ सालात शॉकली, ब्रॅटन आणि बार्डीन या एकेकाळच्या बेल लॅब्समधल्या सहकारी त्रिकुटाला ट्रान्झिस्टर स्विचच्या शोधासाठी भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं!

7) HRD 2.11 = आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना Chronology

7.1) दूरसंचार संघ = 1865 = जिनिव्हा

7.2) World Meteorological Organisation (WMO) = 1873 = जिनिव्हा

7.3) International Postal Union= 1874 = बर्न

7.4) Indian Meteorological Department (IMD) = 1875 = मद्रास

7.5) International Labour Organisation (ILO) = 1919 = जिनिव्हा

 • व्हर्साली ट्रिटी

7.6) UN = 24 ऑक्टोबर 1945 = न्यूयॉर्क

7.7) UNESCO = 1945 = पॅरिस

7.8) वर्ल्ड बँक = 1945 = वॉशिंग्टन डीसी

7.9) IMF = 1945 = वॉशिंग्टन डीसी

7.10) UNICEF = 1946 = न्यूयॉर्क

7.11) WHO = 1948 = जिनिव्हा

7.12) Commonwealth = 1949 = लंडन

7.13) UNHCR (Refugee) = 1950 = जिनिव्हा

7.14) युरोपियन युनियन (EU) = 1958 = ब्रुसेल्स

 • 1993 ला नाव दिले

7.15) ओपेक (OPEC) = 1960 = व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)

7.16) NAM ची पहिली परिषद = 1961 = बेलग्रेड (युगोस्लाव्हिया)

 • त्याअगोदर 1955 ला 5 देशांची बाडुंग परिषद

7.17) आफ्रिकन एकता संघ = 1963 = आदिस अबाबा (इथिओपिया)

 • 2002 मधे याचे नाव ‘आफ्रिकन युनियन’ झाले

7.18) UNCTAD = 1964 = जिनिव्हा

7.19) UNDP = 1965 = न्यूयॉर्क

7.20) ASEAN = 1967 = जकार्ता

7.21) WIPO = 1967 = जिनिव्हा

7.22) सार्क = 1985 = काठमांडू

 • भारताने 2009 मधे हा करार संमत

7.23) APEC = 1989 = सिंगापूर

7.24) NAFTA = 1 जानेवारी 1994

 • ट्रम्प यांच्या पुढाकाराने याचे नाव आता USMCA ( US-MEXICO-CANADA)

7.25) SAFTA = 6 जानेवारी 2004

7.26) Human Right Council (HRC) = 2006

 • UNHRC (1946) च्या जागी याची स्थापना

7.26) ब्रिक्स = 2006

 • पाहिली परिषद = 2009 = रशिया
 • 2010 = साऊथ आफ्रिका चा समावेश
 • 2014 = न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) ची ब्राझीलच्या परिषदेत स्थापना

7.27) International Solar Alliance (ISA) = 2015 = गुरूग्राम (हरयाणा)


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment