Current Affairs | चालू घडामोडी | 17 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 17 JAN 2024

1) नेताजींचे जर्मनीला प्रयाण = 17 जानेवारी 1941

  • झियाउद्दिन नाव धारण करून अफगाण – रशिया मार्गे बर्लिनला पोहोचले.

2) राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राला विजेतेपद.

3) मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी आणखी एका नामिबियन चित्त्याचा (शौर्य) मृत्यू झाला.

4) संविधानभान

एम एन रॉय आणि संविधान

  • संविधान मसुद्यातून पर्यायी जगाचे संकल्पचित्र मांडण्याचा कम्युनिस्ट नेते एम. एन. रॉय यांचा प्रयत्न
  • रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीची स्थापना = 1940 = एम. एन. रॉय
  • १९४४ साली त्यांनी स्वत:च ‘स्वतंत्र भारताचे संविधान : मसुदा’ या शीर्षकासह एक दस्तावेज प्रकाशित केला. त्यांच्या मते, या मसुद्यातून तीन बाबी होणे अपेक्षित होते.
    1. ब्रिटिशांकडून भारताकडे सत्तेचे हस्तांतर होत असताना राजकीय पक्षांची मध्यस्थी असता कामा नये.
    2. स्वतंत्र भारताच्या संविधानाचे संकल्पचित्र यातून साकारले जाईल.
    3. सत्तांतराच्या प्रक्रियेला वेग येईल.
  • त्यांनी तयार केलेल्या या मसुद्यामुळे स्वतंत्र भारताच्या संविधानात समाजवादी तत्त्वांचा अंतर्भाव होण्यास मदत झाली, असे ग्रॅनवील ऑस्टिन यांनी म्हटले आहे.
  • मुळात स्वतंत्र भारताच्या नव्या संविधानासाठी संविधानसभा असली पाहिजे, ही कल्पनाच सर्वप्रथम रॉय यांनी मांडली.

5) तिसरी औद्याोगिक क्रांती डिजिटल क्षेत्रात!

  • या क्रांतीचा मूलाधार होता ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान’ (इनफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी- आयसीटी) आणि अणुऊर्जा.
  • पण मुख्य भर इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘आयसीटी’वर असल्याने हिला ‘अंकीय क्रांती’ म्हणजे डिजिटल रेव्होल्युशन असेही म्हणतात.
  • तिसऱ्या औद्याोगिक क्रांतीची सुरुवात दुसरे महायुद्ध संपल्यानंतर म्हणजे १९५०च्या दशकात झाली.
  • १९४७ मध्ये बेल लॅबोरेटरीने लावलेला ट्रान्झिस्टरचा शोध, त्यानंतर १९५९मध्ये एकात्मिक परिपथ (इंटिग्रेटेड सर्किट) चिपचा शोध आणि नंतरच्या अशा अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्रीमधील (हार्डवेअर) शोधांनी संगणक आणि संदेशवहनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती घडवून आणली.
  • १९६९मध्ये ‘अर्पानेट’ च्या स्वरूपात सुरू झालेल्या इंटरनेटने संगणक एकमेकांशी जोडले जाऊन विदेची देवाणघेवाण करू लागले. नंतर कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने संदेशवहन सुरू झाले.
  • १९८९मध्ये वर्ल्ड वाईड वेबचा (WWW) शोध लागला आणि माहितीची देवाणघेवाण सुरू झाली.
  • या क्रांतीमुळे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून गेल्या.

6) महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

6.1 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (1968)

  • साखर, ज्वारी

6.2 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (1969)

  • कापूस, गहू

6.3 वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी (1972)

  • गहू, ज्वारी

6.4 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी (1982)

  • फळांचे संशोधन

6.5 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (2000)

7) T20 मध्ये सर्वाधिक 5 शतके – रोहित शर्मा

  • 2024 मधील पहिले शतक – रोहित शर्मा

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment