Current Affairs | चालू घडामोडी | 30 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 30 JAN 2024

1) महात्मा गांधी पुण्यतिथी = 30 जानेवारी 1948

  • महात्मा गांधी यांचा स्मृतीदिन हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.
  • काँग्रेस बेळगाव अधिवेशन अध्यक्ष (1924)
  • वृत्तपत्र = इंडियन ओपिनियन (द. आफ्रिका) , यंग इंडिया, हिंद स्वराज, नवजीवन

2) सार्वत्रिक लसीकरणात गर्भाशयाच्या कर्करोगाची लस

  • सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मार्फत निर्मिती
  • ह्युमन पाॅपीलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रकारातील कार्वाव्हॅक नावाची लस
  • महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक लस

3) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारात ’12th फेल’ या चित्रपटाने मारली बाजी.

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (लोकप्रिय)- 12th फेल
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)- जोराम
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (ॲनिमल)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)- विक्रांत मेस्सी (12th फेल)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (डंकी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
  • सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम- ॲनिमल

4) भारतीय राज्यघटनेच्या कलम 139A अन्वये सर्वोच्च न्यायालयाला प्रकरणे स्वतःकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे.

  • खटले हस्तांतरित करण्यासाठी न्यायालय कलम 32 अंतर्गत रिटच्या आपल्या Extraordinary अधिकारांचा वापर करू शकते

5) 6 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा, 2023 = तामिळनाडू

  • 19 जानेवारी ते 31 जानेवारी 2024
  • स्पर्धा जरी 2024 मधे होत असल्या तरी त्या 2023 च्या स्पर्धा आहेत.
  • पहिल्यांदाच दक्षिण भारतात या स्पर्धा होत आहेत.

6) संविधानभान
संविधान सभेची रचना

  • संविधान सभेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे सदस्य असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात आला. डिसेंबर १९४६ मध्ये समित्या गठित करण्यात आल्या.
  • नव्या भारताची संविधान सभा ही निवडून आलेले सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य यांची असेल, असे ठरवले गेले. त्यानुसार ब्रिटिश भारतातून सदस्य निवडले जातील तर संस्थानांचे राजे सदस्यांचे नामनिर्देशन करतील, अशी तरतूद केली गेली.
  • गव्हर्नरच्या अखत्यारीतील ११ प्रांतिक विधिमंडळे आणि चार मुख्य आयुक्तांच्या प्रांतातील प्रत्येकी एक सदस्य असे ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी असणार होते. त्यानुसार २९६ सदस्य ब्रिटिश भारतातील निवडणुकांच्या आधारे तर ९३ सदस्य संस्थानांमधून नामनिर्देशित करण्याचे ठरले. अशा प्रकारे एकूण ३८९ सदस्यांच्या संविधानसभेचे नियोजन झाले.
  • काँग्रेसचे सदस्य २०८ जागांवर तर मुस्लीम लीगचे ७३ जागांवर निवडून आले. पुढे फाळणीमुळे लीगचे सदस्य कमी झाले आणि एकूण संविधानसभाच २९९ सदस्यांची झाली. ही सदस्य संख्या ठरवताना लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा मानला गेला होता. तसेच शीख, मुस्लीम यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद करण्यात आलेली होतीच.

7) या वर्षी आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey) मांडला जाणार नाही.

  • वित्त मंत्रालयाने ‘भारतीय अर्थव्यवस्था : अवलोकन’ नावाचे टिपण प्रसिद्ध केले. ते ‘आर्थिक पाहणी अहवाल’ नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  • या वर्षी पासूनच्या नवीन तरतुदी
    • यंदा १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प अर्थात पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अल्पावधीसाठी सादर होणारे केवळ लेखानुदान असेल.
    • त्यामुळे अर्थसंकल्पपूर्व देशाच्या प्रगतीचा आलेख मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार नाही.
    • या सामान्य प्रथेपासून फारकत घेत, वित्त मंत्रालयाने ‘भारतीय अर्थव्यवस्था : अवलोकन’ नावाचे हे टिपण सादर करून नवा पायंडा पाडल्याचे मानले जात आहे.
    • मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांची याला प्रस्तावना आहे.
  • येत्या तीन वर्षांत भारत पाच लाख कोटी (पाच ट्रिलियन) डॉलरच्या सकल देशांतर्गत उत्पादनासह (जीडीपी) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय वित्त मंत्रालयाने व्यक्त केला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment