Current Affairs | चालू घडामोडी | 29 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 JAN 2024

1) बंगाल गॅझेट प्रकाशित = 29 जानेवारी 1780

  • भारतातील प्रथम वृत्तपत्र
  • स्थळ = कलकत्ता
  • संपादक = जे. हिक्की

2) ऑस्ट्रेलियन ओपनची महिला टेनिस विजेती = आर्यना सब्लेंका

3) बिहारचे नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू पुन्हा एनडीए मध्ये.

  • विक्रमी 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ
  • बिहारमध्ये आता 2 उपमुख्यमंत्री
  • NDA (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) मधील घटक पक्ष
    • BJP, JDU , HAM (हिंदुस्तानी आवाम मोर्चा)
  • सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे
  1. नितीश कुमार (JDU) = 9 वेळा
  2. जयललिता (AIADMK) = 6 वेळा
  3. वीरभद्र सिंग (काँग्रेस) = 6 वेळा

4) ATM चे जनक ‘प्रभाकर देवधर’ यांचे निधन

  • बँकांना लागणारे देशातील पहिले एटीएम त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र साठी तयार केले होते.
  • त्यांनी अद्ययावत स्वयंचलित पेट्रोल पंप सुद्धा तयार केले होते.
  • केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे ते अध्यक्ष होते.

5) सुप्रीम कोर्ट स्थापनेला 75 वर्ष पूर्ण (28 January 1950)

  • मुख्यालय नवी दिल्ली
  • सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पंतप्रधान मोदींना भेट दिला

6) जगातील सर्वात मोठे क्रुझ निघाले पहिल्या सफारीवर.

  • नाव = आयकॉन ऑफ द सीज
  • 7 दिवसांची कॅरिबियन सफर करणार

7) आशियाई देशांत आयात शुल्क लावल्याने नागपुरी संत्र्यांची निर्यात ठप्प.

  • नागपुरी संत्री
    • 200 वर्षांचा इतिहास
    • मराठा साम्राज्याचे राजे रघुजीराव भोसले यांनी नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यातून आणलेल्या संत्र्यांच्या कलमांची नागपुरात लागवड केली होती.
    • नागपूरची संत्री मॅंडरिन गटात मोडते
    • GI टॅग देखील प्राप्त

8) संविधानभान
संविधान आणि बी एन राव

  • कॅबिनेट मिशन योजनेने संविधान सभेच्या निर्मितीला मान्यता दिली
  • ब्रिटिश सरकारने गव्हर्नर सचिवालयात काँग्रेस आणि मुस्लीम लीगला स्वीकारार्ह असा मसुदा तयार करण्याचे काम बी. एन. राव यांच्यावर सोपवले होते
  • संविधानिक सल्लागार = बी एन राव
  • बी एन राव यांनी १९ पानांचा मसुदा लिहीत जानेवारी १९४६ मध्ये एक संवैधानिक चौकट मांडली.
    • यानुसार नवा भारत कॉमनवेल्थचा भाग असेल. यात तीन प्रमुख घटक असतील
      1. हिंदुस्तान संघराज्य
      2. पाकिस्तान संघराज्य
      3. भारतीय संस्थाने आणि आदिवासी प्रदेश
    • या तीनही घटकांना सार्वभौमत्व असेल, स्वातंत्र्य असेल; मात्र त्यांचे संरक्षण, परराष्ट्र संबंध आणि संज्ञापन याबाबत समान धोरण असेल
    • राव यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला टाळत एक स्वतंत्र प्रांतिक संघटन म्हणून रचना करण्याचा प्रयत्न केला होता.
  • राव यांनी म्हटले की
    • (१) भारतात आणि भारताबाहेर शांतता प्रस्थापित करणे
    • (२) पोषणमूल्याची पातळी वाढवणे आणि एकुणात भारतीयांचे जीवनमान उंचावणे
    • (३) सर्वांना समान शैक्षणिक संधी देणे
    • (४) सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे

9) कृत्रिम बुद्धिमत्तेचे पायाभूत घटक : शिकणे ते समस्या सोडवणे

  • कृत्रिम बुद्धिमत्तेचे पाच मूलभूत घटक असे आहेत.
    1. शिकणे,
    2. कारणमीमांसा करणे,
    3. समस्या सोडवणे,
    4. बोध घेणे,
    5. भाषा समजणे

10) कायद्याचे (नवे) हात…!

  • 3 नवीन कायद्यांची नावे
    • भारतीय न्याय संहिता, 2023 (भारतीय दंडविधान संहिता IPC च्या जागी)
    • भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 (फौजदारी दंडविधान कायदा CRPC च्या जागी)
    • भारतीय साक्ष कायदा, 2023 (भारतीय पुरावा कायद्याच्या जागी)
  • भारतीय न्याय संहिता, २०२३ (बीएनएस)
    • यामध्ये आता नवीन ३५८ तरतुदींचा समावेश केला जाईल (भादंवि च्या ५११ तरतुदी सोडून).
    • या कायद्यात नवीन २० गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यामधील ३३ गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे.
    • लैंगिक स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी, कलम ६९ नुसार एका नवीन खंडाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, ज्याद्वारे एखाद्या स्त्रीस लग्नाचे वचन देणे, जेव्हा असे वचन पाळण्याचा कोणताही उद्देश नसेल आणि त्याद्वारे सदर स्त्रीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करणे, हा या कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
  • प्रथमच ‘दहशतवादा’ची व्याख्या करण्यात आली आहे.
  • ‘राजद्रोह’ हा गुन्हा नवीन कायद्यातून वगळण्यात आलेला आहे. समुदायाद्वारे हत्या (मॉब लिंचिंग) हा बीएनएस च्या कलम १०३ (२) द्वारे नवीन गुन्हा म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे, ज्यासाठी कमाल शिक्षा म्हणून देहांत शासन दिले जाऊ शकते. यापूर्वी समुदायाद्वारे हत्या या गुन्ह्यासाठी कोणतीही वेगळी शिक्षा दिली जात नसे.
  • बीएनएसच्या तरतूदींनुसार ‘नियोजित गुन्हा’ ही व्याख्या प्रथमतःच करण्यात आली असून त्यामध्ये आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्ह्यांचाही अंतर्भाव आहे. याद्वारे प्रथमतःच आर्थिक गुन्ह्यांवर कडक कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. नियोजित गुन्ह्याकरीता देहांतशासन आणि किमान दहा लाख रुपयांचा दंड कमाल शिक्षा ठरविण्यात आलेली आहे. आता प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ही इलेक्ट्रॉनिक / संगणकीय पद्धतीद्वारे नोंदविली जाऊ शकते आणि ‘शून्य एफआयआर’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.
  • आता पीडित व्यक्ती कोणत्याही पोलिस चौकीशी संपर्क करू शकते, त्यासाठी सदर पोलिस चौकीचे कार्यक्षेत्र विचारात घेण्याची आवश्यकता नाही.
  • बीएनएसएस कायद्याच्या कलम २५० प्रमाणे अथवा कलम २६२ (१) प्रमाणे, यातील आरोपी सदर गुन्हा घडल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत मुक्त होण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. यापूर्वी, असा अर्ज दाखल करण्यासाठी अशी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती.
  • फौजदारी दंडसंहितेच्या कलम २३५ शी निगडीत बीएनएसएस कायद्याच्या कलम २५८ नुसार, एखादा युक्तिवाद संपल्यानंतर, न्यायाधिशाने खटल्याचा निकाल ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे, हा कालावधी विशेष कारणांचा उल्लेख केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. पूर्वी निकाल देण्यासाठीची कोणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली नव्हती.
  • बीएनएसएस, २०२३ च्या कलम ४७९(१) अन्वये, कच्च्या कैद्याला किती मुदतीपर्यंत बंधक बनवून ठेवता येईल, याची कमाल कालमर्यादा निश्चित केली आहे. गुन्हेगार हा प्रथमवेळ गुन्हेगार असेल तर तो त्यास होऊ शकणाऱ्या एकूण शिक्षेच्या एक तृतीयांश काळ शिक्षा भोगल्यानंतर जामीन मिळण्यास पात्र ठरू शकतो. सराइत गुन्हेगारांसाठी जामीन कालमर्यादा ही त्यांच्या पात्र शिक्षेच्या निम्मा काळ शिक्षा भोगल्यानंतर अशी राहील. अशा पात्र कैद्यांना जामिनावर सोडण्याकरीता अर्ज करण्याची जबाबदारी ही त्या कारागृह अधीक्षकाची असेल.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment