Current Affairs | चालू घडामोडी | 23 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 23 JAN 2024

1) 23 जानेवारी

 • पराक्रम दिवस (2021 पासून)
 • सुभाषचंद्र बोस जयंती = 23 जानेवारी 1897
  • राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष- 1938= हरिपुरा, 1939= त्रिपुरी
  • फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना = 1939
 • आयएनएस वागीर नौदलात दाखल = 23 जानेवारी 2023

2) समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप तरी निर्णय नाही.

 • राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

3) मराठा समाजाचे 23 जानेवारी पासून राज्यभर सर्वेक्षण.

 • राज्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतलेल्या सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ होत आहे.

4) अयोध्या लवकरच सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र.

 • धार्मिक पर्यटन केंद्रे
  • अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात वर्षाला अंदाजे ३ ते ३.५ कोटी तर तिरुपती बालाजी मंदिराला २.५ ते ३ कोटी पर्यटक भेट देतात.
  • जागतिक स्तरावर व्हॅटिकन सिटीला दरवर्षी ९० लाख पर्यटक येतात. सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी दोन कोटी पर्यटक भेट देतात.
 • धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधांतील अडथळे असूनही वर्षाला एक ते तीन कोटी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच पायाभूत सुविधांसह नवे धार्मिक पर्यटन केंद्र तयार केल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पर्यटनामुळे अयोध्येत आर्थिक व धार्मिक स्थलांतर वाढेल, असा अंदाज असून हॉटेल, हवाई वाहतूक, आदरातिथ्य, पर्यटन यांसह विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे.

5) पंतप्रधान सूर्योदय योजना

 • या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे.

6) ‘झी’शी विलीनीकरण करार ‘सोनी’कडून रद्दबातल.

 • सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड यांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी दोन वर्षांच्या मुदतीत विलीनीकरण मार्गी लावण्यासाठी निश्चित करार केला होता.

7) ‘विकसित भारता’ची ‘ई-वाहनांद्वारे’ स्वप्नपूर्ती!

 • देशाला २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यात ई-वाहनांकडे होऊ घातलेले वेगवान स्थित्यंतर महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरणार आहे.
 • अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सरकारने १०० टक्के थेट परकीय गंतवणुकीला परवानगी दिली आहे.
 • भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत भारत विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यात विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. त्यात आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन या बाबींचा समावेश आहे.

8) राष्ट्रपतींकडून बाल पुरस्कार प्रदान

 • महाराष्ट्रातील 12 वर्षीय आदित्य विजय ब्राह्मणे याला विलक्षण साहसासाठी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला.

9) प्राप्तिकर तसेच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) मासिक संकलनात उत्साही वाढ सुरू असल्याने सरकारच्या कर महसुलात अपेक्षेपेक्षा सरस वाढ.

 • हंगामी अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आणि सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
 • हंगामी अर्थसंकल्पात भर कशावर?
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा)
  • ग्रामीण भागात रस्ते विकास
  • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीला मुदतवाढ
  • पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी वाढीव तरतूद

10) संविधानभान
संविधानासाठी मशागत

 • कराची ठरावाने (१९३१) सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे, हा मुद्दा मांडला
  • १८८२ साली महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी केली
  • त्यानंतर राजर्षि शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सर्वांसाठी प्राथमिक शिक्षणाची तरतूद केली
  • एम. एन. रॉय आणि श्रीमन नारायण अग्रवाल यांनी मांडलेल्या मसुद्यातही प्राथमिक शिक्षणाबाबत ही तरतूद आहे. पुढे स्वतंत्र संविधानात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्याचा समावेश झाला
  • गर्भवतींना हक्काची सुट्टी मिळाली पाहिजे, हे कराची ठरावात म्हटले होते.
  • एम. एन. रॉय यांचा मसुदा तर पूर्ण कामगारकेंद्री होता
  • गर्भवतींना आणि बाळाचा जन्म झाल्यानंतरही स्त्रियांना हक्काची रजा असली पाहिजे, याकरता ‘मॅटर्निटी बेनेफिट अॅक्ट’ लागू व्हावा म्हणून डॉ. आंबेडकरांनी मजूरमंत्री असताना प्रयत्न केले
  • पेरियार रामास्वामी यांनी आत्मसन्मान आणि समाजवाद याबाबतचा ठराव मांडणारी परिषद १९३३ साली इरोड येथे आयोजित केली होती
  • त्याच वेळी काँग्रेसमध्ये सुभाषचंद्र बोस आणि पं. नेहरू समाजवादी मूल्यांचा आग्रह धरत होते.

11) सुभाषचंद्र बोस यांची जयंती = 23 जानेवारी

 • जन्म 23 जानेवारी 1897
 • 1918 = कलकत्ता विद्यापीठाच्या स्कॉटिश कॉलेजमधून तत्त्वज्ञानात बीए पदवी
 • 1921 = इंग्लंडला जाऊन नेताजींनी इंडियन सिविल एक्झाम दिली.
 • 1939 = फॉरवर्ड ब्लॉक संघटनेची स्थापना केली.
 • 1940 = मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट
 • 1941 = नजर कैदेत ठेवण्यात आलेल्या घरातून वेशांतर करून स्वतःची सुटका करून घेतली.
 • 1943 = 21 ऑक्टोबर रोजी नेताजींनी सिंगापुरात ‘अर्जी हुकूमत आझाद हिंद’ ची स्थापना केली.

12) 🎥 भारतीय डॉक्युमेंटरी फीचर फिल्म ‘To Kill A Tiger’ 96 व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) नामांकित झाली आहे.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment