Current Affairs | चालू घडामोडी | 22 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 JAN 2024

1) 22 जानेवारी

  • वयोश्रेष्ठ सन्मान योजनेला सुरुवात = 22 जानेवारी 2013
    • ही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय पुरस्कारांची योजना आहे.
  • बेटी बचाव बेटी पढाव योजना जाहीर = 22 जानेवारी 2015
    • अगोदर निवडक 100 जिल्ह्यांत. 2018 नंतर सर्व जिल्ह्यांत लागू
  • सुकन्या समृद्धी योजना = 22 जानेवारी 2015
    • बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत ही योजना.
    • 10 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या नावाने विशेष बचत खाते

2) कॅनडा देशाचा महत्त्वाचा निर्णय 22 जानेवारी हा दिवस ‘अयोध्या राम मंदिर दिन’ म्हणून साजरा करणार.

3) प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा भारत उत्सुक.

  • सुमारे पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिराची निर्मिती होऊन त्यात रामलल्ला पुन्हा विराजमान होणार आहेत.

4) ‘सुट्टीचा निर्णय धर्मनिरपेक्षता तत्त्वाशी सुसंगत’

  • राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय धोरणात्मक बाब आहे. देशातील विविधतेच्या वैशिष्ट्यांचा विचार करता हा निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाशी सुसंगत आहे, असे उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने स्पष्ट केले.

5) संविधानभान
हिंदू राष्ट्राचा विचार

  • १९२५ साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही सहभागी नव्हता. उलटपक्षी, लोकांनी ‘चले जाव’ चळवळीत सामील होऊ नये, असे संघाचे म्हणणे होते
  • स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नसला तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नव्या राष्ट्राविषयीचा विशिष्ट विचार होता. हा विचार संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी लिहिलेल्या ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड’ या १९३९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसतो
  • गोळवलकरांच्या मते, हिंदुस्तान हिंदूंचे आहे आणि त्यामुळे इतर अल्पसंख्याकांना येथे राहायचे असल्यास त्यांनी हिंदूंचे वर्चस्व स्वीकारले पाहिजे. गोळवलकरांच्या साऱ्या मांडणीवर वि. दा. सावरकर यांचे ‘हिंदुत्व’ (१९२३) आणि बाबाराव सावरकरांचे ‘राष्ट्रमीमांसा’ (१९३४) या पुस्तकांचा प्रभाव आहे
  • समता हे मूल्य मानणाऱ्या बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील विषमतेवर बोट ठेवले. हिंदू म्हणून जन्माला आलो, मात्र हिंदू म्हणून मरणार नाही, अशी ऐतिहासिक घोषणा बाबासाहेबांनी १९३६ साली केली.

6) ‘इंटिग्रेटेड सर्किट’चा जन्म!

  • ट्रान्झिस्टरचा शोध लावणाऱ्या वॉल्टर ब्रॅटन आणि जॉन बार्डिन या दोघाही शास्त्रज्ञांनी ट्रान्झिस्टरला व्यावसायिक वापरायोग्य बनविण्याच्या कामात फारशी रुची दाखवली नाही.
  • ट्रान्झिस्टरचे व्यावसायिक स्तरावर उपयोजन सर्वात पहिल्यांदा अमेरिकास्थित टेक्सास इन्स्ट्रूमेन्टस् (टीआय) या कंपनीनं केला. टीआय ही ‘अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स’ क्षेत्रात आजही जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. अमेरिकेनं इराक युद्धात वापरलेल्या ‘पेव्ह-वे’ या लेसर गायडेड बॉम्बसाठी सेमीकंडक्टर चिपचं तंत्रज्ञान टीआयनंच पुरवलं होतं.
  • १९५८ साली जॅक किल्बी हा निष्णात विद्युत (इलेक्ट्रिकल) अभियंता टीआयमध्ये दाखल झाला.
  • सिलिकॉन किंवा जर्मेनियम अशा अर्धसंवाहकाच्या एकसंध अशा पट्टीवर अनेक ट्रान्झिस्टर्सचं एकत्रीकरण करून चिप आरेखनाचं एकात्मिक मॉडेल तयार केलं. किल्बीनं आपल्या या नवनिर्मित आरेखनाच्या शोधाला ‘इंटिग्रेटेड सर्किट’ असं चपखल नाव दिलं. आज याच इंटिग्रेटेड सर्किट किंवा ‘आयसी’ला आपण अनौपचारिकपणे ‘चिप’ असं संबोधतो.
  • १९६०च्या दशकात एका चिपमध्ये १०० ते जास्तीत जास्त १००० ट्रान्झिस्टर्स असत. १९७१ मध्ये इंटेलनं जेव्हा आपली पहिली मायक्रोप्रोसेसर चिप (इंटेल ४००४) बाजारात आणली, तेव्हा २३०० ट्रान्झिस्टर्स असलेली ती त्या काळची अत्याधुनिक चिप होती. आजघडीला उपलब्ध असलेल्या कोणत्याही संगणक किंवा मोबाइल फोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या मायक्रोप्रोसेसर चिपमधल्या ट्रान्झिस्टर्सची संख्या ही काही शे कोटी (किंवा अत्याधुनिक चिपच्या बाबतीत काही हजार कोटी) एवढी भरेल.
  • किल्बीच्या शोधाच्या आसपासच त्याला दूरान्वयानंही न ओळखणाऱ्या दुसऱ्या एका अभियंत्यानंही इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लावला होता (जरी त्यानं हे नाव त्या शोधाला दिलं नव्हतं). रॉबर्ट किंवा बॉब नॉइस हे त्या अभियंत्याचं नाव!
  • नॉइसनं शोधलेली पद्धत (ज्यात ट्रान्झिस्टर्स व त्यांना जोडणाऱ्या तारांना अर्धसंवाहक पट्टीच्या विविध प्रतलांवर रचलं जात असल्यानं तिला ‘प्लेनर पद्धत’ असं म्हटलं जातं) ही किल्बीच्या संरचनेपेक्षा तांत्रिकदृष्ट्या नक्कीच श्रेष्ठ होती. चिपच्या रचनेतच तारांची जोडणीही अंतर्भूत असल्याने एकतर उत्पादनाला सुटसुटीतपणा आला होता, ज्याचा उपयोग चिपचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यास नक्कीच होणार होता.त्याचबरोबर नॉइसच्या प्लेनर पद्धतीमुळे कमीत कमी जागेत अधिकाधिक ट्रान्झिस्टर्सना बसवणंही शक्य होत होतं ज्यामुळे चिपच्या कार्यक्षमतेत उत्तरोत्तर वाढ होणं शक्य होणार होतं.
  • पुढील अनेक दशकं एका बाजूला जरी चिपचा आकार लहान होत गेला तरी दुसऱ्या बाजूला त्याची कार्यक्षमता भूमितीश्रेणीनं वाढत गेली आणि त्याचबरोबर त्याची किंमतही कमी होत गेली.
  • इंटिग्रेटेड सर्किटच्या क्रांतिकारी शोधासाठी किल्बीला २००० सालचं भौतिकशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक मिळालं

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment