Current Affairs | चालू घडामोडी | 06 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 06 JAN 2024

1) 6 जानेवारी = पत्रकार दिन

 • बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनानिम्मित (1812)
 • मराठी पत्रकारितेचे जनक
 • स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते
 • एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर
 • अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक. तेथेच कानडी भाषा अवगत.
 • कुलाबा वेधशाळेचे संचालक
 • श्रीपती शेषाद्री प्रकरणात शुद्धीकरण करून श्रीपती यांना स्वधर्मात परत आणले.
 • पाक्षिक = दर्पण
 • मासिक = दिग्दर्शन
 • 6 जानेवारी 1832 = दर्पण वृत्तपत्राची (पाक्षिक) सुरुवात
 • मराठीतील हे पहिले वृत्तपत्र
 • मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ते प्रकाशित व्हायचे.
 • पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र
 • संपादक = बाळशास्त्री जांभेकर
Balshastri Jambhekar

2) 100 व्या नाट्य संमेलनाचा पुण्यात शुभारंभ

 • 100 व्या संमेलनाचे अध्यक्ष = डॉ. जब्बार पटेल
 • 99 व्या संमेलनाचे अध्यक्ष = प्रेमानंद गज्वी

3) देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ७.३ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने वर्तवला.

 • सन २०२२-२३ या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.२ टक्के होता, त्याहून सरस असा हा चालू वर्षाचा अंदाज आहे.
 • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय = ‘एनएसओ’

4) अपहृत जहाजावरून २१ कर्मचाऱ्यांची सुटका

 • अरबी समुद्रात अपहरण करण्यात आलेल्या लायबेरियन व्यावसायिक जहाजावर ताबा मिळवून भारतीय नौदलाच्या कमांडोंनी त्यावरील २१ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. त्यांत १५ भारतीयांचा समावेश आहे.
 • लायबेरियाच्या ‘एमव्ही लिला नॉरफोक’ या जहाजावर सुमारे पाच ते सहा शस्त्रधारी असल्याचा संदेश गुरुवारी संध्याकाळी यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) या संस्थेला पाठवण्यात आला होता.
 • ही संस्था जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवते. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौथी दहशतवाद्यांनी हल्ले वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर हे जहाज अपहरण चिंतेत टाकणारे होते.
MV LILA NORfolk SHip

5) स्वच्छतेबाबत पुणे महापालिकेला राष्ट्रीय पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला.

 • शहराचे मानांकन तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी पोहोचले आहे.

6) ‘आदित्य-एल १’ यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना.

 • आदित्य-एल१ पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवर अंतरावरील, सूर्य-पृथ्वीदरम्यानच्या ‘लगरेंज पॉइंट १’च्या आसपास त्रिमितीय ‘प्रभामंडल’ कक्षेत पोहोचेल.
 • ‘लॅंगरेंज पॉइंट’ हा असा समतोल बिंदू आहे जिथे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होते.
 • ‘हॅलो’ कक्षा ही ‘एल१’, ‘एल२’ किंवा ‘एल३’ या ‘लॅंगरेज पॉइंट’जवळील एक नियमित-त्रिमितीय कक्षा आहे.
 • ‘एल१ पॉइंट’च्या चारही बाजूंनी ‘हॅलो’ कक्षेतून उपग्रह सूर्याचे निरीक्षण करू शकतो. यामध्ये सौर प्रक्रियांचे निरीक्षण करता येईल, तसेच त्याचे थेट अवकाशीय हवामानावर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण-नोंदी करता येतील.
 • पीएसएलव्ही सी५७ ने श्रीहरिकोटा येथुन २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपण
 • ‘आदित्य एल १’ काय करणार?
  • सौर वातावरणातील गतिशीलता, सौर वादळे, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंपांचा अभ्यास
  • सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रभामंडल वस्तुमानाच्या उत्सर्जन (कोरोनल मास इजेक्शन) प्रक्रियांचा अभ्यास करणे
  • सौर वातावरणातील घडामोडींच्या पृथ्वीच्या जवळील अवकाशातील हवामानावरील परिणामांचा अभ्यास करणे
Aditya L1

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment