Current Affairs | चालू घडामोडी | 05 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 05 JAN 2024

1) United Nation ने 2024 हे उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.

Internatioanl year of CAMELIDS

2) रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक.

Rashmi Shukla

3) राज्यातील रेशीम उद्योगासाठी ‘सिल्क समग्र -2’ योजना राबविणार.

 • योजना कार्यकाळ = 2021-22 ते 2025-26

4) मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.

 • मंत्रालय बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय.

5) ओडिशातील 7 उत्पादकांना GI मानांकन

6) कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक = अॅलन ट्युरिंग

 • अॅलन ट्युरिंग (२३ जून १९१२ ते ७ जून १९५४) या ब्रिटिश गणितज्ज्ञाला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ जनक मानले जाते, कारण त्यांनी सर्वप्रथम या संकल्पनेला मूर्त औपचारिक बैठक दिली. ती त्यांनी १९५० साली ‘माइंड’ या तत्त्वज्ञानविषयक जर्नलमध्ये ‘कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स’ या शोधलेखात मांडली होती.
 • यंत्र माणसाइतकेच हुशारीने कृती करू लागल्यास ते बुद्धिमान मानले जावे असे त्यांनी सुचवले. हे तपासण्यासाठी ट्युरिंग यांनी एक पद्धत सादर केली, जिला त्यांनी ‘नकलीचा खेळ’ (इमिटेशन गेम) असे संबोधले. आता ती ‘ट्युरिंग चाचणी’ म्हणून जगप्रसिद्ध आहे.
Allen Turing

7) 5 जानेवारी दिनविशेष

7.1= 1955 = भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापना

7.2 = 2023 = बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उद्घाटन

 • देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम
 • स्थळ = रुरकेला, ओडिशा

8) ऊसतोड कामगारांना ३४ टक्के दरवाढ

 • शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय घेतला.

9) अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत १३.५ गिगावॉटने वाढ

 • जागतिक आघाडीवर भारताला चौथ्या क्रमांका नेणारी ही कामगिरी आहे.
 • पवन ऊर्जानिर्मितीत भारत चौथ्या, तर सौरऊर्जा निर्मितीत पाचव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिली.
 • केंद्र सरकारने जानेवारी २०२३ मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली असून, त्यासाठी १९ हजार ७४४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
 • भारताला जगातील हरित हायड्रोजनचा सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनविण्यासाठी देशात ४ लाख ५० हजार हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment