Current Affairs | चालू घडामोडी | 01 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 01 JAN 2024

1) ‘एक्सपोसॅट’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण

  • या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
  • ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल.
  • ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल.
  • PSLV-C58 या प्रक्षेपकडवरे आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडले जातील.
  • अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्राो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे.
  • ‘इस्राो’व्यतिरिक्त, अमेरिकन संस्था ‘नासा’ने डिसेंबर २०२१ मध्ये ‘सुपरनोव्हा’ स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.

2) अरविंद पानगढिया १६ व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी.

  • ३१ ऑक्टोबर २०२५ = वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची तारीख
  • अहवालाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
  • आयोगाच्या जबाबदाऱ्या
    • करमहसुलाची केंद्र आणि राज्यांदरम्यान विभागणी
    • त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा
    • भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदानरूपी मदत
    • राज्यांच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावयाचा निधी
    • सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेणे.

3) भारतात स्त्री शिक्षणातून स्त्री मुक्तीची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या फुले दाम्पत्याच्या कार्याला आजच्या ऐतिहासिक दिनी वंदन!

  • जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली़ या घटनेला १७६ वर्षे पूर्ण झाली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment